राज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे.
कृषिपूरक
आंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे
आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना होतो. या आजारामुळे अशक्तपणा येतो, जनावरे थरथर कापतात. प्लेग आजार सर्वच वयोगटांतल्या शेळ्यांत होत असला तरी करडांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.
आंत्रविषार
- आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना होतो. लहान करडे कोणतीही लक्षणे दाखवण्यापूर्वीच मरतात.
- मोठ्या जनावरांनासुद्धा आजार होतो.
- सुदृढ कोकरे व वासरांना आजाराचा प्रादुर्भाव दिसतो.
लक्षणे
आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना होतो. या आजारामुळे अशक्तपणा येतो, जनावरे थरथर कापतात. प्लेग आजार सर्वच वयोगटांतल्या शेळ्यांत होत असला तरी करडांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.
आंत्रविषार
- आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना होतो. लहान करडे कोणतीही लक्षणे दाखवण्यापूर्वीच मरतात.
- मोठ्या जनावरांनासुद्धा आजार होतो.
- सुदृढ कोकरे व वासरांना आजाराचा प्रादुर्भाव दिसतो.
लक्षणे
- आजार लहान वयोगटातील तसेच मोठ्या शेळ्या, मेंढ्यात आढळतो.
- भरपूर गवत पोटात गेल्यानंतर केवळ काही तासातच लक्षणे दिसण्यास सुरवात होते. कोकरात दोन ते चार तासांत लक्षणे दिसतात.
- भरपूर ताप येतो, पोटात तीव्र वेदना होतात. हिरवी अर्धवट घट्ट व पातळ संडास होणे, अशक्तपणा येतो, जनावरे थरथर कापतात.
प्रतिबंधात्मक उपाय
- पावसाळ्याच्या सुरवातीस लसीकरणाच्या दोन मात्रा (तीन ते चार आठवडे अंतराने) दिल्यास शेळ्या, मेंढ्यांचा या आजारापासून प्रतिबंध होतो.
शेळ्यांचा प्लेग
- शेळ्या, मेंढ्यांना आजार होतो. आजार सर्वच वयोगटातल्या शेळ्यांत होत असला तरी सध्या तो करडांमध्ये अधिक प्रमाणात होतो.
लक्षणे
- जनावरास भयंकर ताप येतो. नाकपुड्यांच्या बाहेरील भाग कोरडा होतो. हिरड्या व जिभेवर व्रण तयार होतात. अशक्तपणा येतो.
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. नाकातून स्त्राव येतो, सर्दी होते, खोकला येतो, न्युमोनिया होतो.
उपचार
- आजार विषाणूजन्य असल्यामुळे खात्रीशीर उपाय नाही. परंतु लक्षणाप्रमाणे उपाय केला तर मृत्युचे प्रमाण कमी होते.
- प्रतिबंधात्मक उपाय
- पी.पी.आर. लस चार महिन्यांपेक्षा जास्त वय असलेल्या करडांना व शेळ्यांना द्यावी. लस दिल्यानंतर त्याची रोगप्रतिकारक शक्ती तीन वर्षांपर्यंत राहते.
लाळ्या खुरकूत
- गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्यांमध्ये हा आजार दिसतो. अतिशय तीव्र स्वरुपाचा संसर्गजन्य आजार आहे.
- आजार प्रामुख्याने संसर्गीत पाणी व खाद्य खाल्ल्याने होतो.
लक्षणे
- साधारणतः ३ ते ६ दिवसांत जनावरास खूप ताप येतो. जनावरे चारा खाणे, रवंथ करणे बंद करतात.
- दूध कमी होते, जनावरे मलूल बनतात.
- तोंडातील जखमांमुळे जनावरे चारा खाऊ शकत नाही. तोंडातून दोऱ्यासारखी लाळ गळते. जनावर लंगडते. खंगत जाते.
उपचार
- आजार विषाणूजन्य असल्याने तातडीचा उपचार नाही.
- प्रथम तोंड व पाय २ ते ४ टक्के खाण्याच्या सोड्याने धुवून घ्यावेत.
- तोंडामधील जखमांवर उपचार करण्यासाठी शिफारशीत जंतूनाशक औषध लावावे.
प्रतिबंधात्मक उपाय
- लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. सर्व जनावरांना लसीकरण केल्यास हा आजार शक्यतो होत नाही.
- गरजेनुसार लसीकरणाची पहिली मात्रा सप्टेंबर व दुसरी मात्रा मार्चमध्ये द्यावी.
- डॉ. फेरोझ सिद्दिकी, ९९६०१४७१७१
(पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)
- 1 of 22
- ››