पोटशूळ, इसब आजारांवर उपयुक्त काटेमाठ

काठे माठ
काठे माठ
  •  स्थानिक नाव    : काटेमाठ, काटेरी माठ        
  •    शास्त्रीय नाव    :  Amaranthus  spinosus        
  •    इंग्रजी नाव     : Prickly Amaranthus, Edlebur, Needle burr, Spiny Amaranth,  Thorny Amaranth.       
  •    संस्कृत नाव     : तंडूलीय        
  •    कुळ : Amaranthaceae       
  •    उपयोगी भाग    : कोवळी पान, कोवळी देठ          
  •    उपलब्धीचा काळ    : कोवळी पान – जुलै – ऑगस्ट,           कोवळे देठ – ऑगस्ट - ऑक्टोबर        
  •    झाडाचा प्रकार    :  झुडूप        
  •    अभिवृद्धी     : बिया        
  •    वापर     : भाजी
  • आढळ 

  • पावसाळ्यात पडीक, ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेला, शेतात, परसबागेत तण म्हणून वाढणारी काठे माठ ही रोपवर्गीय वनस्पती वाढलेली आढळते.
  • वनस्पतीची ओळख 
  •  काठेमाठ ही वनस्पती चांगल्या जागी ३० ते १०० सें.मी पर्यंत वाढू शकते. याचे खोड गोलाकार, सरळ उंच वाढणारे असून पांढरट हिरव्या रंगाचे, तर कधी लालसर छटा असणारे असते. 
  •  फांद्या अनेक सरळ तसेच आडव्या वाढणाऱ्या असून पानांच्या बेचक्यातून ०.५ ते १ सें.मी लांबीचे हिरव्या रंगाचे काटे येतात. 
  •  पाने साधी, एक आड एक येणारी ५ ते १० सें.मी लांब व १.५ ते ४ सें.मी. रुंद, लांबट किंवा अंडाकृती टोकाशी टोकदार व पानाच्या शिरा अधिक रेखीव असतात. पानाचे देठ ३ ते ७  सें.मी लांब, फुले लहान, एकलिंगी, नियमित, पांढरट हिरवी, प्रत्येक फांदीच्या टोकाशी लांबट पुष्पमंजिरीत येतात.
  •  बिया अनेक काळ्या रंगाच्या, चकाकणाऱ्या गोल असतात. साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात फुले येऊन बिया तयार होतात. झाड वाळल्यानंतर बिया वाऱ्यासोबत जमिनीवर तसेच इतरत्र पडतात व पुढच्या वर्षी पावसाळ्यात याच बिया रुजल्या जातात. त्यामुळे वनस्पती रस्त्याच्या कडेला पावसाळ्यात काटेमाठाची अनेक झुडूप वाढलेली दिसतात.  
  • औषधी उपयोग 

  •  काठेमाठ ही वनस्पती भूक वाढवणारी आहे, म्हणून याची भाजी पावसाळ्यात आवर्जून खाल्ली जाते. 
  •  काटेमाठाची मुळे मासिक अतिस्त्राव, परमा, पोटशूळ, इसब इत्यादींवर उपयुक्त.
  •  बाळंतीणबाईला दूध कमी असल्यास तुरीच्या डाळीबरोबर पाने आणि कोवळी देठे शिजवून आहारात देतात.
  • टीप ः तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधी उपचार करावेत.

    पाककृती

    कोवळ्या पानाची भाजी   साहित्य ः  २ काटेमाठाच्या पानाच्या जुड्या, २-३ बारीक चिरलेले कांदे, २-४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ५-८  ठेचलेल्या लसूण पाकळ्या, फोडणीसाठी जिरे, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ.    कृती: प्रथम काटेमाठाच्या फाद्यांतून कोवळी पाने तोडून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. कढईत तेल गरम करून जिरे-मोहरी टाकून बारीक चिरलेला कांदा लालसर परतून घ्यावा. नंतर लसूण आणि बारीक चिरलेल्या मिरच्या व काठेमाठाची पाने टाकून परतून घ्यावे. भाजी ५ मिनिट झाकण ठेऊन शिजवून घ्यावी. चवीप्रमाणे मीठ घालावे.   टीप ः  गणपती ते दसऱ्याच्या दरम्यान कोवळ्या देठाची भाजी केली जाते. तसेच, काही ठिकाणी ही देठे सुक्या मच्छीसोबतही शिजवली जातात. 

     इमेल - ashwinichothe7@gmail.com, (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com