agriculture news in Marathi, article regarding health importance of  Amaranthus  spinosus   | Agrowon

पोटशूळ, इसब आजारांवर उपयुक्त काटेमाठ
अश्विनी चोथे
शनिवार, 3 ऑगस्ट 2019
 •  स्थानिक नाव    : काटेमाठ, काटेरी माठ        
 •    शास्त्रीय नाव    :  Amaranthus  spinosus        
 •    इंग्रजी नाव     : Prickly Amaranthus, Edlebur, Needle burr, Spiny Amaranth,  Thorny Amaranth.       
 •    संस्कृत नाव     : तंडूलीय        
 •    कुळ : Amaranthaceae       
 •    उपयोगी भाग    : कोवळी पान, कोवळी देठ          
 •    उपलब्धीचा काळ    : कोवळी पान – जुलै – ऑगस्ट,           कोवळे देठ – ऑगस्ट - ऑक्टोबर        
 •    झाडाचा प्रकार    :  झुडूप        
 •    अभिवृद्धी     : बिया        
 •    वापर     : भाजी
 •  स्थानिक नाव    : काटेमाठ, काटेरी माठ        
 •    शास्त्रीय नाव    :  Amaranthus  spinosus        
 •    इंग्रजी नाव     : Prickly Amaranthus, Edlebur, Needle burr, Spiny Amaranth,  Thorny Amaranth.       
 •    संस्कृत नाव     : तंडूलीय        
 •    कुळ : Amaranthaceae       
 •    उपयोगी भाग    : कोवळी पान, कोवळी देठ          
 •    उपलब्धीचा काळ    : कोवळी पान – जुलै – ऑगस्ट,           कोवळे देठ – ऑगस्ट - ऑक्टोबर        
 •    झाडाचा प्रकार    :  झुडूप        
 •    अभिवृद्धी     : बिया        
 •    वापर     : भाजी

 

आढळ 

 • पावसाळ्यात पडीक, ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेला, शेतात, परसबागेत तण म्हणून वाढणारी काठे माठ ही रोपवर्गीय वनस्पती वाढलेली आढळते.
 • वनस्पतीची ओळख 
 •  काठेमाठ ही वनस्पती चांगल्या जागी ३० ते १०० सें.मी पर्यंत वाढू शकते. याचे खोड गोलाकार, सरळ उंच वाढणारे असून पांढरट हिरव्या रंगाचे, तर कधी लालसर छटा असणारे असते. 
 •  फांद्या अनेक सरळ तसेच आडव्या वाढणाऱ्या असून पानांच्या बेचक्यातून ०.५ ते १ सें.मी लांबीचे हिरव्या रंगाचे काटे येतात. 
 •  पाने साधी, एक आड एक येणारी ५ ते १० सें.मी लांब व १.५ ते ४ सें.मी. रुंद, लांबट किंवा अंडाकृती टोकाशी टोकदार व पानाच्या शिरा अधिक रेखीव असतात. पानाचे देठ ३ ते ७  सें.मी लांब, फुले लहान, एकलिंगी, नियमित, पांढरट हिरवी, प्रत्येक फांदीच्या टोकाशी लांबट पुष्पमंजिरीत येतात.
 •  बिया अनेक काळ्या रंगाच्या, चकाकणाऱ्या गोल असतात. साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात फुले येऊन बिया तयार होतात. झाड वाळल्यानंतर बिया वाऱ्यासोबत जमिनीवर तसेच इतरत्र पडतात व पुढच्या वर्षी पावसाळ्यात याच बिया रुजल्या जातात. त्यामुळे वनस्पती रस्त्याच्या कडेला पावसाळ्यात काटेमाठाची अनेक झुडूप वाढलेली दिसतात.  

औषधी उपयोग 

 •  काठेमाठ ही वनस्पती भूक वाढवणारी आहे, म्हणून याची भाजी पावसाळ्यात आवर्जून खाल्ली जाते. 
 •  काटेमाठाची मुळे मासिक अतिस्त्राव, परमा, पोटशूळ, इसब इत्यादींवर उपयुक्त.
 •  बाळंतीणबाईला दूध कमी असल्यास तुरीच्या डाळीबरोबर पाने आणि कोवळी देठे शिजवून आहारात देतात.

टीप ः तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधी उपचार करावेत.

 

पाककृती

कोवळ्या पानाची भाजी
साहित्य ः  २ काटेमाठाच्या पानाच्या जुड्या, २-३ बारीक चिरलेले कांदे, २-४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ५-८  ठेचलेल्या लसूण पाकळ्या, फोडणीसाठी जिरे, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ. 
कृती: प्रथम काटेमाठाच्या फाद्यांतून कोवळी पाने तोडून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. कढईत तेल गरम करून जिरे-मोहरी टाकून बारीक चिरलेला कांदा लालसर परतून घ्यावा. नंतर लसूण आणि बारीक चिरलेल्या मिरच्या व काठेमाठाची पाने टाकून परतून घ्यावे. भाजी ५ मिनिट झाकण ठेऊन शिजवून घ्यावी. चवीप्रमाणे मीठ घालावे. 
 टीप ः  गणपती ते दसऱ्याच्या दरम्यान कोवळ्या देठाची भाजी केली जाते. तसेच, काही ठिकाणी ही देठे सुक्या मच्छीसोबतही शिजवली जातात. 

 इमेल - ashwinichothe7@gmail.com, (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

टॅग्स

इतर औषधी वनस्पती
सूज, अतिसारावर मायाळू उपयोगी स्थानिक नाव    : मायाळू, भजीचा वेल...
पोटशूळ, इसब आजारांवर उपयुक्त काटेमाठ  स्थानिक नाव    : काटेमाठ...
दमा, खोकल्यावर गुणकारी घोळ स्थानिक नाव    :   ...
बहुगुणी तेलबिया पीक लक्ष्मीतरूलक्ष्मीतरू (शास्त्रीय नाव - Simarouba glauca...
त्वचारोगावर टाकळा उपयुक्त स्थानिक नाव    :  ...
अशक्तपणावर उपयुक्त हुम्भ स्थानिक नाव    :   ...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
आरोग्यदायी पुदिनापुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून,...
अशी करा अडुळसा लागवडअडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर...
अशी करतात गवती चहाची लागवड गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी...
अपचन, त्वचारोगावर उपयुक्त मोखा स्थानिक नाव     ः मोखा, मोकडी,...
औषधी, अन्न प्रक्रियेसाठी पुदिना उपयुक्तपुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, पाचक...
जुलाब, हगवणीवर टेंभुरणी उपयुक्तटेंभुरणीचे झाड शेताच्या बांधावर तसेच माळरानावर...
अशक्तपणा, त्वचा रोगावर उंबर उपयुक्त स्थानिक नाव    : उंबर, औदुंबर...
पोटदुखीवर गुणकारी वाघेटीवाघेटीच्या काटेरी वेली जंगलात डोंगरकपारीला मोठ्या...
औषधी करटोली१. शास्त्रीय नाव :- Momordica dioica Roxb.ex....
कोवळी भाजी- एक पौष्टिक रानभाजीशास्त्रीय नाव : Chlorophytum borivilianum...