agriculture news in Marathi, article regarding horn cancer in animals | Agrowon

शिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष
डॉ. सुरज बोराखडे, डॉ. संजीव पिट्टलावार
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील जनावरांच्यामध्ये दिसतो. खच्ची केलेल्या तसेच शेती कामातील बैलांमध्ये हे प्रमाण गाईपेक्षा जास्त आढळते. लक्षणे ओळखून तातडीने उपचार करावेत.

जनावरांची शिंगे ही संरक्षणासोबत शरीराची शोभा वाढवतात. म्हणून शिंगांची निगा राखणे महत्त्वाचे असते. त्यासाठी दैनंदिन सवयी किंवा शेती कामामुळे होणारे आजार लक्षात घ्यायला हवे. शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५  ते १० वर्ष वयोगटातील जनावरांच्यामध्ये  दिसतो. खच्ची केलेल्या तसेच शेती कामातील बैलांमध्ये हे प्रमाण गाईपेक्षा जास्त आढळते. 

कर्करोगाची कारणे 

शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील जनावरांच्यामध्ये दिसतो. खच्ची केलेल्या तसेच शेती कामातील बैलांमध्ये हे प्रमाण गाईपेक्षा जास्त आढळते. लक्षणे ओळखून तातडीने उपचार करावेत.

जनावरांची शिंगे ही संरक्षणासोबत शरीराची शोभा वाढवतात. म्हणून शिंगांची निगा राखणे महत्त्वाचे असते. त्यासाठी दैनंदिन सवयी किंवा शेती कामामुळे होणारे आजार लक्षात घ्यायला हवे. शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५  ते १० वर्ष वयोगटातील जनावरांच्यामध्ये  दिसतो. खच्ची केलेल्या तसेच शेती कामातील बैलांमध्ये हे प्रमाण गाईपेक्षा जास्त आढळते. 

कर्करोगाची कारणे 

 • शिगांस तैलरंग लावल्यामुळे त्यातील विषारी घटक शिंगात शोषले जाऊन शिंगात जळजळ होऊन कर्करोग होतो. 
 • शिंगे साळणे किंवा घासणे. शिंगाला सतत इजा होणे. 
 • उन्हात काम करीत असताना सूर्याच्या अतिनील किरणांमुळे कर्करोग होते. 
 • शेतात काम करीत असताना सतत शिंगाला जू घासणे.  शिंगांस सतत दोर बांधून ठेवणे.

 
  कर्करोग कसा ओळखावा ?
पहिल्या टप्प्यातील लक्षणे 

 •  टणक, कडक जागेवर शिंग घासणे. 
 •  असमांतरीत शिंगे. 
 •  कर्करोग झालेल्या बाजुच्या नाकपुडीतून रक्तमिश्रीत स्त्राव येतो. 
 •  शिंगाचे बुड मऊ, गरम होते. शिंगाला वेदना होतात. 

दुसऱ्या टप्यातील लक्षणे 

 •  शिंग हळूहळू खाली झुकत जाते. 
 •  शिंगांच्या बुडास जखम होते. 
 •  जखमेतून रक्त, पू व घाण वास येतो, तसेच त्याच बाजूच्या नाकातून रक्तमिश्रित स्राव येतो.
 •  कर्करोग झालेल्या शिंगास मारून पाहिल्यास आवाजातील फरक लक्षात येतो. 

तिसऱ्या टप्पातील लक्षणे 

 •  शिंग पूर्णतः एक बाजूस झुकते. आपोआप तुटून पडते. 
 •  शिंगाच्या बुडास कर्करोगाची वाढ झालेली दिसते. 
 •  अशक्तपणा, तणाव येतो. भूक मंदावते.

शिंगाच्या कर्करोगावर उपचार 

 •  लक्षणे दिसताच त्वरित पशुवैद्यकाकडून उपचार करावेत. 
 •  शस्त्रक्रियाकरून कर्करोग बाधित शिंग बुडापासून काढून टाकावे. 
 •  कर्करोगविरोधी औषधांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा. 

शिंगांचा कर्करोग होऊ नये म्हणून घ्यायची काळजी 

 •  शिंगे साळू किंवा घासू नये. 
 •  विषारी घटक असलेला रंग लावू नये. 
 •  बैलांना कडक उन्हात जास्त वेळ काम लावू नये. 
 •  शिंगाला सतत इजा होणाऱ्या गोष्टींना प्रतिबंध करावा. 
 •  जू वर आवरण घालावे.
 •  शिंगांवर सतत मारणे अथवा टोचणे बंद करावे. 
 •  वेळोवेळी पशुवैद्यकांचे मार्गदर्शन घ्यावे. 

-डॉ. सुरज बोराखडे, ९४०३९०६४३६,

- डॉ. संजीव पिट्टलावार,८६०५५३४८६४ 
(पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर )

 

इतर कृषिपूरक
नावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...
चावणाऱ्या माश्या, कृमींपासून जनावरांचे...सध्याच्या काळात रक्त शोषण करणाऱ्या कीटकवर्गीय...
विषारी वनस्पती, कीडनाशकांची जनावरांना...ॲस्परजीलस बुरशीची वाढ झालेला मका जनावरांच्या...
शेळ्यांसाठी गोठ्याची रचनागोठ्याचा आकार, शेळ्यांच्या संख्येनुसार ठरवावा. ऊन...
संगोपन रेशीम कीटकांचेएक एकर तुती लागवड क्षेत्रासाठी बाल्य अवस्थेसाठी...
फळे पिकवणे, धान्य साठवणुकीच्या पारंपरिक...शहादा तालुक्यात गेली तीसेक वर्षे आदिवासींसोबत काम...
परसबागेतील कोंबड्यांसाठी आरोग्य, खाद्य...केंद्रीय पक्षी संशोधन संस्था विकसित केलेल्या...
पट्टा पद्धतीनेच करा तुती लागवडतुती लागवडीसाठी सपाट, काळी, कसदार, तांबडी,...
शिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...
आंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...
संसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा...
पूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...
दुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...
जनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा...
शेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...
गाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...
जनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्षपोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते....
जनावरांना होते घाणेरीची विषबाधा मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती...
‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची...परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर...
गोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...