agriculture news in Marathi, article regarding importance of frog in pest control | Agrowon

कीड-रोग व्यवस्थापन : शेतीमध्ये बेडकांचे संवर्धन ठरते फायद्याचे
उत्तम सहाणे
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

सध्याच्या काळात कीडनाशके, रासायनिक खते आणि तणनाशकाच्या बेसुमार वापरामुळे बेडकांचे जीवन धोक्‍यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा मित्र दुरावत चालला आहे. बेडूक शेतातील लहान-मोठ्या किडी, अळ्या, गोगलगायी, नाकतोडे अशा कितीतरी हानिकारक किडींना खातो. त्यामुळे कीडनियंत्रणासाठी बेडकाची मदत होते.

बेडकांची पीक व्यवस्थापनात होणारी मदत लक्षात घेऊन भारतीय कृषी संशोधन परिषदेने जून ते सप्टेंबर या कालावधीत भातशेताच्या आजूबाजूच्या क्षेत्रात बेडूक पकडण्यावर प्रतिबंध घालावा, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे. 

बेडकाची भक्ष्य पकडण्याची पद्धती  

सध्याच्या काळात कीडनाशके, रासायनिक खते आणि तणनाशकाच्या बेसुमार वापरामुळे बेडकांचे जीवन धोक्‍यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा मित्र दुरावत चालला आहे. बेडूक शेतातील लहान-मोठ्या किडी, अळ्या, गोगलगायी, नाकतोडे अशा कितीतरी हानिकारक किडींना खातो. त्यामुळे कीडनियंत्रणासाठी बेडकाची मदत होते.

बेडकांची पीक व्यवस्थापनात होणारी मदत लक्षात घेऊन भारतीय कृषी संशोधन परिषदेने जून ते सप्टेंबर या कालावधीत भातशेताच्या आजूबाजूच्या क्षेत्रात बेडूक पकडण्यावर प्रतिबंध घालावा, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे. 

बेडकाची भक्ष्य पकडण्याची पद्धती  

  •     बेडकाच्या जबड्याची रचना पाहिली तर त्याच्या जिभेचे अग्रटोक खालच्या जबड्याच्या अग्रटोकाला चिकटलेले असते. जिभेचे मागचे टोक मोकळे व दोन भाग झालेले असते. कीटक दृष्टीस पडताच बेडूक आपली जीभ द्रुतगतीने त्याच्याकडे फेकतो. जिभेत स्लेष्मा ग्रंथी असते. त्यामुळे ती चिकट असते. कीटक जिभेला चिकटतो आणि लगेच बेडूक आपली जीभ आत ओढून घेतो. या क्रिया अतिशय वेगाने होतात. बेडूक भक्ष्य तोंडात आल्यावर न चावताच ते गिळून टाकतो. 
  •  एक बेडूक रोज त्याच्या वजनाइतके किडे खातो. एक बेडूक एका आठवड्यात सुमारे तीन हजार किडी खातो. अशाप्रकारे शेतीला नुकसान करणाऱ्या अनेक किडी पावसाळ्यात बेडकांचे भक्ष्य बनतात.

कृषी संशोधन केंद्रातील प्रयोग   
भातपिकामध्ये बेडकांचे संवर्धन कसे उपयुक्त आहे याचा अभ्यास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत येथील भात संशोधन केंद्रामध्ये करण्यात आला. या संशोधनामध्ये असे आढळून आले, की बेडकांमुळे खेकडा, लष्करी अळी, खोडकिडीचे पतंग, पाने गुंडाळणाऱ्या अळीचे पतंग इत्यादी भातपिकावरील अनेक किडींचे बऱ्याच प्रमाणात नियंत्रण होऊ शकते. 

शेतीमधील प्रयोग 

  •  हुमावू अब्दुल अली या प्राणी मित्राने भातशेतीमध्ये बेडकांचे काय महत्त्व आहे, यासाठी काही प्रयोग केले. त्यासाठी त्यांनी भात शेताचे तीन समान भाग केले. पहिल्या दोन भागांत चहुबाजूंनी बांधावर नायलॉनची जाळी लावली. त्यातील पहिल्या भागात ४० बेडूक सोडले. दुसऱ्या भागातील सर्व बेडूक बाहेर काढले. तिसरे शेत मूळ अवस्थेतच राहू दिले. तीनही शेतातून भात उत्पादन तयार झाल्यावर अभ्यास केला. 
  •   या प्रयोगामध्ये पहिल्या शेतात ज्या ठिकाणी ४० बेडूक शेतात सोडले होते, तेथे भात उत्पादन सर्वांत जास्त म्हणजे चार पट आले होते. कारण त्या शेतात भाताच्या रोपांवर किडींचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले नाही. दुसऱ्या शेतात जेथून बेडूक बाहेर काढले होते, त्या भागात किडींचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळला, मात्र उत्पादन खूपच कमी मिळाले. तिसऱ्या शेतात जेथे काहीच केले नव्हते त्या ठिकाणी मध्यम उत्पादन मिळाले. 

शेतामध्ये बेडकांचे संवर्धन 

  •  पावसाळ्याच्या सुरवातीस आपल्याला बेडूक दिसू लागतात. पावसाळा संपताच काही महिने म्हणजे पुढील पावसाळा येईपर्यंत ते स्वतःला जमिनीत गाडून घेतात. यालाच बेडकाची सुप्तावस्था म्हणतात.
  • आपल्या शेतात बेडकांचे संवर्धन करण्यासाठी शेताच्या एका बाजूच्या खोलगट भागात एक छोटे तळे तयार करावे. या तळ्यात बेडकांचे आपोआप आगमन होईल आणि सुप्तावस्थेसाठी पण त्यांना जागा मिळेल. 
  • बेडकांची संख्या कमी होऊ नये यासाठी बेडकांना हानिकारक म्हणजे रासायनिक किडनाशके आणि रासायनिक खतांचा होणारा बेसुमार वापर थांबवावा.  
  • बेडूक भातशेतीमध्ये किडींचे नियंत्रण करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत करतात. आरोग्यतज्ज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे, की बेडकांची संख्या घटल्यामुळे मलेरिया रोगाचा पुन्हा जोराने प्रसार सुरू झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बेडकांच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

- उत्तम सहाणे ः ७०२८९००२८९ 
(शास्त्रज्ञ (पीकसंरक्षण), कृषी विज्ञान केंद्र,  कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. पालघर)

इतर ताज्या घडामोडी
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...