ताप, अंगदुखीवर चुंच उपयुक्त

चंचुचे झुडुप
चंचुचे झुडुप
  • स्थानिक नाव      चुंच, क्षुद्र चंचु, मोठी चुंच, बनपात        
  •  शास्त्रीय  नाव     Corchorus olitorius        
  •  इंग्रजी नाव      White Jute,  Bristly-Leaved  Jew''s Mallow, Nalta Jute, Tossa Jute Jew''s mallow,        
  •  संस्कृत नाव      महाचञ्चु, पट्टशाकः        
  •  कुळ    Tiliaceae        
  •  उपयोगी भाग    कोवळी पाने        
  •  उपलब्धीचा काळ    कोवळी पाने:- ऑगस्ट-सप्टेंबर        
  •  झाडाचा प्रकार     झुडूप        
  •  अभिवृद्धी     बिया        
  •  वापर    भाजी 
  • आढळ 

  •  पाऊस पडण्यास नियमित सुरवात होताच तरोटा, माठ, काटेमाठ, कुरडू, कपाळफोडी, लव्हाळा शेतात तसेच परसबागेत उगवू लागतात, त्याचप्रमाणे चुंच ची लहान लहान रोपे परसबाग, रस्त्याच्या कडेला, शेतात उगवू लागतात. महाराष्ट्रातील बहुतेक सगळ्या जिल्ह्यांमध्ये चुंच चे झुडप आढळतात. 
  • वनस्पतीची ओळख 

  •  ही वार्षिक तणवर्गीय वनस्पती असून सरासरी  ५० ते ८० सें.मी पर्यत उंच वाढते. 
  •  खोड नाजूक असून कोवळे असताना हिरवे व कालांताराने लालसर हिरवे होते. अनेक फांद्या असून मजबूत असतात. 
  •  पाने ५ ते ८ सें. मी लांब, तर २ ते ५ सें. मी रुंद, लांबट, कडा दातेरी व टोकाशी टोकदार, पानाचे देठ २ ते २.५ सें.मी लांब वाढते.
  •   फुले २ ते ३ लहान फिक्कट पिवळ्या रंगाचे ३ ते ५ मिमी आकाराचे, ५ पाकळ्यायुक्त, पानाच्या बगलेतून येतात. फळे एक किंवा जोडीने फांदीच्या तसेच पानाच्या बगलेतून येतात.
  •  शेंग ३ ते ६ सें.मी. लांब पातळ, ३ कप्यायुक्त, दंडगोलाकार, व १ सें.मी व्यासाची, वरील आवरणावर उभ्या कडा असणारी असते. 
  •  बिया अनेक बारीक काळपट तपकिरी 
  • रंगाच्या असतात. साधारण सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये फुले येऊन नोव्हेंबरपर्यत शेंगा तयार होतात.
  • औषधी उपयोग  

  •   पाने, कोवळी फळे तसेच मुळे औषधात वापरली जातात.
  •    पाने ही भूकशामक, पाचक, उत्तेजक, उपशामक (वेदना कमी करणारे) तसेच पोटफुगी कमी करणारी असतात.
  •    पानाचा काढा हगवण, ताप, अंगदुखी आजारावर उपयुक्त. चुंचच्या मुळापासून तसेच कच्च्या फळापासून तयार केलेला काढा जुलाबावर उपयुक्त आहे.
  •    पानापासून केलेला काढा शक्तिवर्धक व भूकवर्धक आहे.   
  • टीप ः तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.

    पाककृती

    कोवळ्या पानांची भाजी

    साहित्य १ जुडी चुंचची भाजी, १ मोठा बारीक कापलेला कांदा, १ ते २ कापलेली हिरवी मिरची, ४ ते ५  ठेचलेल्या लसूण पाकळ्या, जिरे, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ.

    कृती  चुंचची कोवळी पाने निवडून स्वच्छ धुवून व बारीक कापून घ्यावी. एका कढाईत तेल गरम करून जिरे, मोहरीची फोडणी द्यावी, त्यात बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या, कापलेल्या हिरव्या टाकून परतून घ्यावे. नंतर त्यात बारीक चिरलेली पाने टाकून भाजी एकजीव करून घ्यावे. ५ मिनिट झाकण ठेवून वाफेवर भाजी शिजवून घ्यावी. चवीनुसार मीठ टाकावे.    टीप: ही भाजी थोडी चिकट असते.

    ashwinichothe7@gmail.com,  (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com