Agriculture news in marathi article regarding jamun squash, jam, jelly | Agrowon

जांभळापासून स्क्वॅश,जॅम,जेली

सौ. रोहिणी भरड,डॉ. सौरभ शर्मा
शनिवार, 6 जून 2020

मे महिन्याच्या शेवटी व जून, जुलै महिन्यात जांभळाची फळे भरपूर प्रमाणात येतात. जांभूळ हे औषधी गुणधर्म असलेले फळ आहे. जांभळा मध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व क जीवनसत्व याचे प्रमाणही अधिक असते.
 

मे महिन्याच्या शेवटी व जून, जुलै महिन्यात जांभळाची फळे भरपूर प्रमाणात येतात. जांभूळ हे औषधी गुणधर्म असलेले फळ आहे. जांभळा मध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व क जीवनसत्व याचे प्रमाणही अधिक असते.

स्क्वॅश

 • प्रथम परिपक्व निरोगी फळे घ्यावीत. ती स्वच्छ पाण्याने धुवावीत. पल्परच्या साह्याने त्याचा रस काढून घ्यावा. रस ८० ते ८२ अंश सेल्सिअस तापमानात ३० मिनिटे गरम करावा.
 • साधारण एक लिटर रसासाठी एक किलो साखर, एक लिटर पाणी आणि दीड ग्रॅम सायट्रीक ॲसिड मिसळून पाक तयार करून घ्यावा. त्यामध्ये पाचशे ते सहाशे मिलिग्रॅम सोडिअम बेन्झोएट मिसळावे.
 • हे सर्व मिश्रण तयार जांभळाच्या रसात टाकावे. त्यानंतर रस गाळून घ्यावा. थोडा वेळ गरम करावा. थंड झाल्यानंतर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीत भरून ठेवावा

जांभळाची पोळी

 • जांभळाची फळे पाण्याने धुवावीत. गर काढून घ्यावा. एक किलो गरात एक किलो साखर व १.५ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळावे.
 • हे मिश्रण पसरट भांड्यामध्ये पातळ थरात पसरवावे.२४ तास हे मिश्रण वाळवावे. नंतर त्याच्या वड्या तयार कराव्यात. पॅकिंग करून साठवून ठेवाव्यात.

जॅम

 • प्रथम पिकलेली निरोगी फळे निवडावीत. फळांपासून गर काढून घ्यावा. एक किलो गरामध्ये एक किलो साखर आणि प्रति किलो १.५ ग्रॅम सायट्रिक ॲसिड व्यवस्थित मिसळावे.
 • मिश्रण मंद आचेवर ६७.५% ब्रिक्स येईपर्यंत शिजवावे. थंड झाल्यावर निर्जंतुक बाटलीमध्ये भरून ठेवावे. बाटल्या सील करण्यासाठी मेणाचा वापर करावा.

जेली

 • परिपक्व जांभळाची फळे स्वच्छ धुवावीत. रस काढून घ्यावा. रसाच्या वजना इतकी साखर घ्यावी. प्रति किलोसाठी १.५ सायट्रिक ॲसिड मिसळावे त्यामध्ये ४ ग्रॅम पेक्टीन मिसळावे. जेणेकरून जेलीला घट्टपणा येईल.
 • मिश्रण मंद आचेवर ६७.५% ब्रिक्‍स येईपर्यंत तापवावे. त्यानंतर थंड झाल्यास तयार जेली निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीत भरून ठेवावी.

जांभळाच्या बियांची पावडर

 • जांभळाच्या फळापासून गर काढल्यानंतर राहिलेल्या बिया स्वच्छ धुवाव्यात.बिया ड्रायरमध्ये ५५ ते ६० अंश सेल्सिअस तापमानाला १८ ते २० तास ठेवाव्यात. बियांची मिक्सरच्या साह्याने पावडर तयार करावी.
 • पावडर पॉलिथिन बॅगमध्ये भरून ठेवावे. ही पावडर मधुमेह आजारावर अत्यंत गुणकारी असते.

संपर्क- सौ. रोहिणी भरड ८१४९८२६०१३
(शास्त्रज्ञ, गृह विज्ञान विभाग, कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई,जि.बीड)


इतर कृषी प्रक्रिया
प्रक्रिया उद्योगातही मशरूमला मागणीवाळवलेल्या मशरूमला बाजारपेठेत चांगली मागणी आणि...
शेळीच्या दुधापासून दही, लोणी, चीज, मलईशेळीचे दूध पचनास हलके असते. शेळीच्या दुधापासून...
श्रीवर्धनी सुपारीचे संवर्धन आवश्यकसुपारी हे परपरागीकरण होणारे झाड असल्याने...
फणसामध्ये आहे प्रक्रिया उद्योगाची संधीफणसातील गरे तसेच बिया खाण्यायोग्य असून गरापासून...
फणसापासून तयार करा खाकरा, केक अन् लोणचेविविध पदार्थांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी फणस बी...
प्रक्रिया उद्योगात गवती चहाला मागणीगवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते. हे तेल सुगंधीत...
बहुगुणी शेवग्याचे मूल्यवर्धित पदार्थशेवग्यामध्ये उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्य आहेत....
प्रक्रिया अन् आरोग्यासाठी शेवगाशेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारे मेगा...शेतकरी, प्रक्रिया करणारे आणि किरकोळ विक्रेत्यांना...
कोकमपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकम फळ कच्चे असताना व पिकून लाल रंगाचे झाल्यावर...
करवंदापासून बनवा चटणी,जॅम, लोणचेकरवंद प्रक्रियेसाठी मोठ्या भांडवली गुंतवणुकीची...
कलिंगडापासून तयार करा विविध...कलिंगड फळ खाण्याने किंवा ताजा रस पिल्याने...
जांभळापासून स्क्वॅश,जॅम,जेलीमे महिन्याच्या शेवटी व जून, जुलै महिन्यात...
राईसमिल, पोहे निर्मितीतून व्यवसायवृद्धीवेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे शंकर जाधव...
काजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थमहाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू...
आरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...
फळे व पालेभाज्यांचे कॅनिंगफळे व पालेभाज्या प्रक्रिया आणि निर्जंतुकीकरण...
बचतगटाच्या महिलांनी नव्या ग्राहकांसह...कोरोनाच्या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे...
अन्नधान्य साठवणुकीच्या पद्धतीशेतीमालाच्या साठवणुकीच्या काही पारंपरिक पद्धती या...
फळे आणि भाज्या निर्जलीकरणाच्या विविध...मागील भागात आपण छोट्या प्रमाणावर उद्योग करणाऱ्या...