agriculture news in marathi article regarding local breeds of goats | Agrowon

संगोपन शेळ्यांच्या स्थानिक जातींचे

डॉ संजय मंडकमाले, डॉ सुरेश शेंडगे
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

स्थानिक जाती नैसर्गिक निवडपद्धतीतून निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे, अतिउच्च तापमान, कडाक्याची थंडी, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीतही या जाती तग धरून  राहू शकतात. 

स्थानिक जाती नैसर्गिक निवडपद्धतीतून निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे, अतिउच्च तापमान, कडाक्याची थंडी, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीतही या जाती तग धरून  राहू शकतात. 

देशाचा विचार करता राज्यांमध्ये शेळ्यांच्या विविध जाती दिसून येतात. हिमालयाच्या बर्फाच्छादित भागासाठी उत्तम प्रकारची पश्मिना लोकर देणारी चांगथांगी, काश्मिरी, गड्डी तसेच राजस्थानच्या वाळवंटात तग धरणारी, तेथील झाडपाल्यावर गुजराण करू शकतील अशा सिरोही, सोजत या उंच जाती आहेत. महाराष्ट्रासारख्या डोंगराळ  राज्यासाठी उस्मानाबादी, संगमनेरी यासारख्या जाती आणि पश्चिम बंगाल , केरळ, तामिळनाडू यांसारख्या समुद्रकाठच्या राज्यांमध्ये काळी बंगाल, मलबेरी या जाती दिसून येतात. राष्ट्रीय पशुअनुवांशिक संशोधन संस्थेच्या माध्यमातून आज शेळ्यांच्या ३६ जाती देशात  उपलब्ध आहेत.

गेली ४० वर्षे शेळी सुधारणा कार्यक्रमामध्ये आफ्रिकन बोअर, टोगेनबर्ग, सानेन यांसारख्या विदेशी जातींबरोबर संकरीकरणाचा कार्यक्रम राबवून स्थानिक जातींची वजनवाढ सुधारणा, दूध उत्पादनात सुधारणा यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेमार्फत विविध  संशोधन प्रकल्प राबविले गेले. मात्र या संशोधनातून असे निदर्शनास आले की, संकरामुळे पहिल्या पिढीत काही अंशी सुधारणा दिसून येते पण, पुढील पिढीमध्ये या सुधारणांमध्ये सातत्य  राहत नाही.

नव्याने निर्मिती झालेल्या जाती वातावरणाशी समरस होण्याची शक्यता कमी असल्याने, त्या वारंवार आजाराला बळी पडतात. स्थानिक जातींच्या तुलनेत या जातींमध्ये त्यांच्या आहाराकडे जास्त लक्ष द्यावे लागते. परिणामी या शेळ्यांच्या आहारावर जास्त खर्च होतो. या सर्व बाबींचा सर्वांगीण अभ्यास करून शेळी पैदास धोरण ठरविताना शासनाने स्थानिक शेळ्यांच्या वापरला प्रथम प्राधान्य 
दिले आहे. 

 स्थानिक जातींची वैशिष्टे  

 • स्थानिक जाती नैसर्गिक निवडपद्धतीतून निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे, अतिउच्च तापमान, कडाक्याची थंडी, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीतही या जाती तग धरून  राहू शकतात. 
 • स्थानिक ठिकाणी उपलब्ध असलेले चारा स्रोत उदा. गवत, झाडपाला इत्यादीची चव या शेळ्यांमध्ये विकसित झालेली असते. त्यामुळे, कडूलिंबासारखा झाडपाला खाऊनही या शेळ्या उत्तमरीत्या राहू शकतात.
 • स्थानिक झाडपाल्यामध्ये असलेले टॅनीनसारखे विषारी घटक पचविण्याची ताकद या शेळ्यांमध्ये विकसित झालेली 
 • असते.
 • कोटी पोटामध्ये स्थानिक चाऱ्याचे विघटन करणारे जीवजंतू योग्य प्रकारे तयार झालेले असल्याने, अत्यंत निकृष्ट दर्जाच्या चाऱ्याचे रूपांतर मांस व दुधामध्ये करण्याची चांगली क्षमता असते.
 • स्थानिक वातावरणात होणारे बदल सहन करण्याची क्षमता असते.
 • या शेळ्या वातावरणाशी उत्तम रीतीने समरस होत असल्याने त्यांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असते. त्यामुळे आरोग्य व्यवस्थापनावर फारसा खर्च करावा लागत नाही.
 • सध्याचे बदलते हवामान व जागतिक तापमानवाढीचा विचार करता या बदलामध्ये तग धरून राहण्याची क्षमता स्थानिक जातींमध्ये विशेषत्वाने आढळते. त्यामुळे, स्थानिक जातींचा मृत्युदर तुलनात्मकदृष्ट्या कमी असतो. व्यवसायात होणारा नफा वाढतो.
 • स्थानिक जाती लांबवर चरायला जाऊ शकतात. त्यामुळे, चाऱ्यावरचा खर्च अत्यंत कमी होतो.
 • स्थानिक जातीच्या शेळीच्या दुधामध्ये चांगले औषधी गुणधर्म असतात. लांबवर चारणाऱ्या व विविध वनस्पती खाणाऱ्या स्थानिक शेळ्यांना पर्याय नाही.
 • स्थानिक जातींना उपलब्ध साधनसामग्रीचे तयार केलेले गोठे पुरेसे होतात. कमी पावसाच्या प्रदेशात गोठ्याविनाही स्थानिक शेळ्या उत्तम रीतीने राहू शकतात. त्यामुळे, गोठेबांधणीवरचा खर्च कमी होतो.
 • मांसाचा दर्जा व चव यांचा विचार करता उस्मानाबादी शेळीला पर्याय नाही. संगमनेरी ही दुधासाठी चांगली जात आहे. कोकण कन्याळ शेळीची अति पावसात व दलदलीत  खुरे कुजत नाहीत. बेरारी शेळी विदर्भातील अतिउष्ण तापमानात चांगल्या रीतीने तग धरते.

महाराष्ट्रातील स्थानिक जाती  

 • कोकणासारखा अतिवृष्टीचा विभाग ः कोकण कन्याळ 
 • मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग ः उस्मानाबादी 
 • पश्चिम महाराष्ट्रातील बागायती विभाग ः संगमनेरी 
 • विदर्भातील उष्ण विभाग ः बेरारी

संपर्क- डॉ संजय मंडकमाले, ९८२२३५९९३७
(अखिल भारतीय संगमनेरी शेळी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)


इतर कृषिपूरक
मुधोळ हाऊंड श्वानास राष्ट्रीय मान्यतामुधोळ हाऊंड ही श्वान जात महाराष्ट्र आणि...
मिथेन उत्सर्जनावर नियंत्रणाची गरजजनावरे रवंथ करताना मोठ्या प्रमाणात मिथेन वायू...
सांसर्गिक गर्भपाताचे नियंत्रणसर्व वयोगटातील जनावरे सांसर्गिक गर्भपात आजारास...
लाळ्या खुरकूत आजाराचे नियंत्रणलाळ्या खुरकूत आजारामुळे जनावराच्या तोंडातून सतत...
गाई, म्हशींचे गाभण काळ, व्यायल्यानंतरचे...गाई, म्हशी गाभण असताना शेवटचे दिवस खूप महत्त्वाचे...
भातशेतीत कीड नियंत्रणासाठी बेडूक...भातशेतीमध्ये विविध किडींचे नैसर्गिक नियंत्रण...
गाई,म्हशीतील गर्भधारणेसाठी योग्य काळ वाढत्या दुग्धोत्पादन क्षमतेसोबतच उच्च उत्पादक गाई...
जनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रणफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक...
शेळ्या-मेंढ्यामधील मावा आजारमावा हा विषाणूपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे....
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
रेबीजकडे नको दुर्लक्ष...कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज आजाराचा प्रसार...
घटसर्पावर नियंत्रण, वाढवी दुग्ध उत्पादनघटसर्प आजार अतितीव्र आणि अत्यंत घातक आहे. बऱ्याच...
संगोपन शेळ्यांच्या स्थानिक जातींचेस्थानिक जाती नैसर्गिक निवडपद्धतीतून निर्माण...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
व्यवस्थापन म्हशींच्या माजाचेदुग्ध व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी म्हशीने दर १३...
सुधारीत पद्धतीने लाव्ही पक्षीपालनजपानी लाव्ही पक्षांची खाद्याची गरज फार कमी असते....
जनावरांची रक्त तपासणी महत्त्वाची...आजार करणारे रोगजंतू जनावरांच्या शरीरामधील आंतरिक...
गोठ्यातील माश्यांचे एकात्मिक व्यवस्थापनगोठ्यात होणाऱ्या अस्वच्छतेमुळे कीटकवर्गीय...
जनावरांतील परोपजिवींचे नियंत्रण...सध्याच्या काळातील परोपजिवींच्या प्रादुर्भावामुळे...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनपावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढते आणि अशा...