तंत्र मका लागवडीचे...

पावसाचे प्रमाण तसेच जमिनीच्या मगदुराप्रमाणे लागवडीसाठी मक्याच्या योग्य जात निवडावी. सापळा पीक म्हणून मक्याचे बाजूने नेपिअर गवताची लागवड करावी. मक्यात तूर, उडीद आणि मूग या पिकांना आंतरपीक म्हणून लागवड करावी.
american army worm
american army worm

पावसाचे प्रमाण तसेच जमिनीच्या मगदुराप्रमाणे लागवडीसाठी मक्याच्या योग्य जात निवडावी. सापळा पीक म्हणून मक्याचे बाजूने नेपिअर गवताची लागवड करावी. मक्यात तूर, उडीद आणि मूग या पिकांना आंतरपीक म्हणून लागवड करावी. मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागवडीसाठी योग्य असते. विशेषतः नदीकाठची गाळाची जमीन अतिशय उत्तम असते. जमिनीची १५ ते २० सेंमी खोल नांगरट करावी. कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखत देण्याची आवश्यक नाही. जाती लागवडीसाठी राजर्षी, करवीर या जातींची निवड करावी. बीज प्रक्रिया

  • करपा रोग नियंत्रणासाठी प्रतिकिलो बियाणांस थायरम २ ते २.५ ग्रॅम ची प्रक्रिया करावी.(लेबल क्लेम आहे)
  • प्रतिकिलो बियाणांस २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू (पी.एस.बी.) या जिवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी.
  • लागवड

  • लागवडीसाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे लागते.
  • पेरणी १५ जुलैपर्यंत पूर्ण करावी. टोकण पद्धतीने ४ ते ५ सेंमी खोलीवर पेरणी करावी.
  • उशिरा व मध्यम पक्व होणाऱ्या जातींची पेरणी ७५ बाय २० सेंमी तर लवकर पक्व होणाऱ्या जातीची पेरणी ६० बाय २० सेंमी अंतरावर करावी.
  • खत व्यवस्थापन

  • पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाशची मात्रा द्यावी.
  • पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० किलो आणि ४० ते ४५ दिवसांनी ४० किलो नत्राची मात्रा द्यावी.
  • जमिनीत झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास हेक्टरी २० ते २५ किलो झिंक सल्फेट शेणखतात मिसळून द्यावे.
  • पाणी व्यवस्थापन

  • पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाण्याचे नियोजन करावे.
  • वाढीची अवस्था २० ते ४० दिवस, फुलोरा अवस्था ४० ते ६० दिवस व दाणे भरणेची अवस्था ७० ते ८० दिवस.
  • अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

  • यंदा काही भागात चांगला पाऊस झाल्याने १५ जूनच्या दरम्यान शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. सध्याच्या काळात या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. त्यामुळे नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
  • जेथे अजून पेरणी झाली नाही, तेथे लागवडीपासूनच नियंत्रणाच्या उपाययोजना केल्या तर किडीचा प्रादुर्भाव होणार नाही.
  • किडीची ओळख 

  • किडीची एक पिढी उन्हाळ्यात ३० दिवसांत तर हिवाळ्यात ६० दिवसांत पूर्ण होते. एका वर्षात विविध वनस्पतीवर ३ ते ४ पिढ्या पूर्ण होऊ शकतात.
  • अंडी पुंजक्याने पानावर घातली जातात. एका पुंजक्यात १०० ते २०० अंडी आढळतात.
  • पूर्ण वाढ झालेल्या अळीच्या तोंडावर उलट्या वाय (Y) आकाराचे पांढऱ्या रंगाचे चिन्ह दिसते. तसेच पाठीवरील प्रत्येक कप्यावर ४ पांढरे ठिपके असून आठव्या किंवा नवव्या कप्प्यावर हे ठिपके चौरस आकाराचे असतात.
  • अळीच्या वाढीच्या सहा अवस्था असतात. उन्हाळ्यात अळी अवस्था १४ तर हिवाळ्यात ३० दिवस असू शकते.
  • नुकसानीचा प्रकार अंड्यातून बाहेर पडताच अळ्या पानांचा हिरवा पापुद्रा खातात. त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे आढळून येतात. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पानांना छिद्रे करून पानांच्या कडा खातात. अळी कणसाला छिद्र करून दाणेही खाते. एकात्मिक व्यवस्थापन मशागत पद्धत

  • फेरपालट करावी. मका पिकात भुईमूग किंवा सूर्यफूल पीक घ्यावे.
  • सापळा पीक म्हणून मक्याच्या बाजूने नेपिअर गवताची लागवड करावी.
  • मक्यात तूर, उडीद आणि मूग या पिकांना आंतरपीक म्हणून लागवड करावी.
  • भौतिक पद्धत 

  • पेरणीनंतर एकरी १० ते १२ पक्षी थांबे
  • पानांवरील अंडीपूंज व नवजात अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
  • कीड सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळे. नर पतंग पकडण्यासाठी एकरी १५ ते २० गंध सापळे.
  • जैविक पद्धत

  • सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत ॲझाडिरॅक्टीन (१५०० पी.पी.एम.) ५ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • नोमुरीया रीलेई किंवा मेटारायझियम अनिसोप्ली ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • ट्रायकोग्रामा बॅक्टरी (ट्रायको कार्ड) १.५ लाख अंडी हेक्टरी सोडावेत.
  • रासायनिक पद्धत - (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • पोंगा व्यवस्थित तयार होताच त्यामध्ये माती किंवा बारीक वाळू किंवा राख + चुना यांचे ९:१ या प्रमाणात टाकावे.
  • थायामेथोझाम (१२.६ टक्के सी.जी.) अधिक लॅंबडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के झेड.सी.) ५ मिली किंवा
  • स्पिनोटोरम (११.७ टक्के एस.सी.) ४ मिली किंवा
  • क्लोरॲन्ट्रानीलप्रोल (१८.५ टक्के एस.सी.) ४ मिलि
  • कीटकनाशकांची आलटून पालटून गरजेप्रमाणे फवारणी करावी.
  • ( वरील कीडनाशकांना लेबल क्लेम आहे)
  • संपर्क - डॉ. सुरेश दोडके, ९६०४२६११०१ भालचंद्र म्हस्के, ९८५०२४३४२६ (कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com