agriculture news in Marathi, article regarding management of milch animals | Agrowon

जनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्ष
डॉ. सी. व्ही. धांडोरे
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

पोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते. जनावराला श्वासोच्छवास व्यवस्थित करता येत नसल्यामुळे ते जीभ बाहेर काढून श्वासोच्छ्वास करते. पोटफुगीची लक्षणे तपासून तातडीने पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.

पोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते. जनावराला श्वासोच्छवास व्यवस्थित करता येत नसल्यामुळे ते जीभ बाहेर काढून श्वासोच्छ्वास करते. पोटफुगीची लक्षणे तपासून तातडीने पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.

रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये पोटफुगीची लक्षणे दिसून येतात. पोटातील वायू बाहेर न पडल्यामुळे ही समस्या आढळते. रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटात खाद्याचे पचन होत असताना वायूची निर्मिती होत असते. हा वायू तोंडावाटे (ढेकर) किंवा अन्य मार्गांनी बाहेर पडत असतो. पण काही कारणांमुळे पोटातील वायू ढेकर किंवा अन्य मार्गांनेही शरीराबाहेर पडू शकत नाही. त्यामुळे जनावरांना पोटफुगी होते. काही वेळेला या वायूचे फेसामध्ये रूपांतर होऊनही शरीराबाहेर पडणे कठीण जाते आणि जनावर पोटफुगीने आजारी पडते. 
लक्षणे 

 •    जनावरांच्या डाव्या अंगाकडील पोट पूर्णपणे फुगते. हाताने वाजविले असता आवाज घुमतो.
 •    पोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते, वारंवार लघवी व शेण टाकते.
 •    जनावराला श्वासोच्छवास व्यवस्थित करता येत नसल्यामुळे ते जीभ बाहेर काढून श्वासोच्छ्वास करते, त्यामुळे जनावर बैचेन व अस्वस्थ होते. 
 •    वायूमुळे पोट फारच फुगले तर जनावर दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे लवकरात लवकर पशुवैद्यकाकडून उपचार करावेत. 

कारणे 

 •    खराब चारा खाल्यामुळेही पोटफुगी होते. 
 •    अन्नातील कोबाल्ट कमतरता, विषबाधा  आणि प्लॅस्टिक खाल्ल्यामुळेही पोटफुगी  होते. 
 •    चारा, खाद्य गिळत असताना चुकून आंब्याची कोय किंवा बटाटा अन्ननलिकेत अडकल्यामुळे पोटात वायू तयार होतो. हा वायू बाहेर न पडल्यामुळे पोटफुगी होऊ शकतो. 
 •    पावसाळी हंगामात हिरवा चारा जास्त प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे तो जनावरांना भरपूर खाण्यास मिळतो. परंतु चाऱ्याचे पूर्णपणे पचन न झाल्यामुळे पोटफुगी होते. 
 •    जनावर एकाच जागेवर सारखे न हालचाल करता बसलेल्या अवस्थेत असले तरी पोटफुगी होऊ शकते. 

 

प्रथमोपचार

 •    वायूचे प्रमाण वाढल्यामुळे जर पोट टणक झाले असेल तर पशुवैद्यकाकडून तातडीने उपचार करावेत. 
 •    जनावरांच्या तोंडामध्ये बोटे घालून पडजिभेच्या स्नायूंना उत्तेजित करावे. जेणेकरून ढेकर येऊन वायू बाहेर पडेल.
 •    फुगलेल्या पोटाच्या अंगावर बाहेरून जोरजोराने तेलाने चोळून मालिश करावे. जनावरांना थोडे चालवावे किंवा पळवावे.
 •    जनावरांच्या तोंडात थोड्या वेळ काठी बांधून ठेवावी. जेणेकरून पोटातील साठलेला वायू बाहेर पडेल. 
 •    पावसाळी हंगामात हिरवा चारा मर्यादित व गरजेपुरताच द्यावा. जनावरास भरपूर प्रमाणात व्यायाम द्यावा.
 •    चांगल्या प्रतीचा चारा उपलब्ध करून द्यावा. नित्कृष्ट दर्जाचा चारा देणे टाळावे.
 •    चाऱ्यामधे प्लॅस्टिकच्या पिशव्या, तारा, खिळे, जाड घन पदार्थ जाणार नाही याची काळजी घ्यावी.
 •    जनावरांना एका कुशीवर जास्त वेळ बसू देऊ नये.

 

 - डॉ. सी. व्ही. धांडोरे, ९३७३५४८४९४.
 (विषय विशेषज्ञ (पशुवैद्यकीय)श्री. सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मठ, कोल्हापूर)

 

इतर कृषिपूरक
शेळ्या, मेंढ्यांमधील जिवाणूजन्य आजारशेळ्या, मेंढ्यांमध्ये आंत्रविषार, सांसर्गिक...
रेशीम कीटकावरील रोगांचे नियंत्रण रेशीम कीटकास प्रामुख्याने होणारे रोग ः  १...
रेशीम कीटकावरील उझी माशीचे एकात्मिक...रेशीम कीटक व अळीवर उपजीविका करणारी परोपजीवी कीड...
जैव-सांस्कृतिक आत्मियता जाणून डांगी...अकोले तालुक्यातील (जि. नगर) कळसूबाई- हरिश्चंद्रगड...
नावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...
चावणाऱ्या माश्या, कृमींपासून जनावरांचे...सध्याच्या काळात रक्त शोषण करणाऱ्या कीटकवर्गीय...
विषारी वनस्पती, कीडनाशकांची जनावरांना...ॲस्परजीलस बुरशीची वाढ झालेला मका जनावरांच्या...
शेळ्यांसाठी गोठ्याची रचनागोठ्याचा आकार, शेळ्यांच्या संख्येनुसार ठरवावा. ऊन...
संगोपन रेशीम कीटकांचेएक एकर तुती लागवड क्षेत्रासाठी बाल्य अवस्थेसाठी...
फळे पिकवणे, धान्य साठवणुकीच्या पारंपरिक...शहादा तालुक्यात गेली तीसेक वर्षे आदिवासींसोबत काम...
परसबागेतील कोंबड्यांसाठी आरोग्य, खाद्य...केंद्रीय पक्षी संशोधन संस्था विकसित केलेल्या...
पट्टा पद्धतीनेच करा तुती लागवडतुती लागवडीसाठी सपाट, काळी, कसदार, तांबडी,...
शिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...
आंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...
संसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा...
पूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...
दुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...
जनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा...
शेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...
गाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...