agriculture news in Marathi, article regarding market trends in NCDEX and MCX | Page 2 ||| Agrowon

मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढ

डॉ. अरुण प्र. कुलकर्णी
शुक्रवार, 12 जुलै 2019

मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. हळदीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ६ टक्क्यांनी अधिक आहेत. गव्हाच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.१ टक्क्यांनी अधिक आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाचे उत्पादन कमी आहे. पण आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणामसुद्धा किमतींवर होत आहे.

मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. हळदीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ६ टक्क्यांनी अधिक आहेत. गव्हाच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.१ टक्क्यांनी अधिक आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाचे उत्पादन कमी आहे. पण आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणामसुद्धा किमतींवर होत आहे.

गेल्या सप्ताहातसुद्धा पावसाची प्रगती समाधानकारक झाली. २ जुलैपर्यंत झालेला देशातील पाऊस हा सरासरीपेक्षा ३० टक्क्यांनी कमी होता. ही घट ९ जुलैपर्यंत १७ टक्क्यांवर आली आहे. पुढील सप्ताहातसुद्धा पाऊस समाधानकारक असेल. तो सर्व देश व्यापेल असा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी खरीप पिकांची पेरणी सुरू झाली आहे. खरिपातील पिकांचा किमतींचा कल त्यामुळे घसरता आहे. पुढील वर्षासाठी खरीप पिकांचे हमीभाव गेल्या आठवड्यात जाहीर झाले आहेत. 
शासनाने जाहीर केलेले हमीभाव, एनसीडीईएक्स, एमसीएक्स आणि बीएसईमधील फ्युचर्स भाव व त्यांतील कल, गेल्या वर्षी मिळालेले भाव, सध्याच्या स्पॉट किमती, गेल्या काही वर्षातील किमतींतील झालेली वाढ किंवा घट, मासिक किमतींत होणारे सर्वसाधारण बदल या सर्वांचा विचार करून शेतकऱ्यांना (व शेतकरी संघ/कंपनीस) आता कोणत्या पिकांची पेरणी करावी, त्यांची विक्री केव्हा करावी, हेजिंग करावयाचे असल्यास ते केव्हा करावे इत्यादी निर्णय घेणे यामुळे शक्य होईल. हे कसे करावयाचे ते पुढील लेखात आपण बघणार आहोत. या सप्ताहात पावसाच्या प्रगतीमुळे कापूस, मका, सोयाबीन यांचे भाव कमी झाले. गवार बी व हरभरा यांचे भाव वाढले. गव्हाचे भावसुद्धा कमी झाले. (आलेख १). पुढील महिन्यात रब्बी पिकांचे (गहू व हरभरा) भाव वाढतील. सोयाबीन व कापूस यांचे भाव कमी होतील. (आलेख २).

गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स आणि एससीएक्स किमतीतील चढ-उतार 
मका (रब्बी) 
रब्बी मक्याच्या (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात वाढत होत्या (रु. १,८३६ ते रु. २, १६८). या सप्ताहात त्या किंचित घसरून रु. २,२०४ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाबबाग) रु. २,२०५ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,७६० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७०० होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. ऑक्टोबर डिलिव्हरीचे भाव रु. २,२७१ आहेत. खरीप मक्यासाठी अजून व्यवहार होत नाहीत. 

सोयाबीन   
सोयाबीन फ्युचर्स (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. ३,७३१ ते रु. ३,६१४). या सप्ताहात त्या १.९ टक्क्यांनी घसरून रु. ३,५८२ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,५६५ वर आल्या आहेत. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी झाली आहे. नवीन वर्षासाठी हमीभाव रु. ३,७१० आहे. ९ जुलै रोजी सप्टेंबर डिलिव्हरीसाठी रु. ३,६१० भाव होता. नंतरच्या महिन्यांसाठी तो रु. ३,५०३ होता. हे सर्व भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. 

गवार बी 
गवार बीच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. ४,३९० ते रु. ४,२१८). या सप्ताहात त्या २.७ टक्क्यांनी वाढून रु. ४,४४० वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३८९ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा ऑक्टोबर २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,५६२).  

गहू 
गव्हाच्या (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. २,०२२ ते रु. १,९८९). या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु.  १,९८४ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. १,९८४ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०४६). नवीन हमीभाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). 

हरभरा 
हरभऱ्याच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. ४,६७७ ते रु. ४,२५०). या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी वाढून रु. ४,३१७ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,२४९ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा ऑक्टोबर २०१९ मधील फ्युचर्स किमती २.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३६५).  शासनाकडे पुरेसा साठा आहे. तो बाजारात येऊ लागला आहे. आवक वाढू लागली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता).

हळद 
हळदीच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. ७,२७० ते रु. ६,६३०). या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी वाढून रु. ६,७०२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,४५२ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,८१०). या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. व्यापाऱ्यांकडील साठा पुरेसा आहे. मागणी मर्यादित आहे.

साखर 
साखरेच्या (ऑक्टोबर २०१९) किमती या सप्ताहात व्यवहार नसल्याने रु. ३,१६० वर स्थिर होत्या. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१५९ वर आलेल्या आहेत.  

कापूस 
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. २२,२०० ते रु. २१,१८०). या सप्ताहात त्या ३.१ टक्क्यांनी घसरून रु. २०,४७० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,३७७ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. १९,९२० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ६.८ टक्क्यांनी कमी आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाचे उत्पादन कमी आहे. पण आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणामसुद्धा किमतींवर होत आहे. कापसाखालील पेरणी वाढत आहे. या वर्षी कापसाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कापूस उत्पादनाच्या क्षेत्रात चांगला पाउस पडत आहे.

फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये मूग, बासमती तांदूळ 

८ जुलैपासून मुगाचे फ्युचर्स ट्रेडिंग एनसीडीइएक्समध्ये सुरू झाले. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यातील डिलिव्हरीसाठी हे व्यवहार असतील. डिलिव्हरी केंद्र राजस्थानमधील मेरता असेल. मुगाच्या उत्पादनात राजस्थानचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर महाराष्ट्र व आंध्र प्रदेश येतात. लॉट-साईज ५ टन आणि प्रति क्विंटलमध्ये बोली असेल. याचबरोबर १० जुलैपासून बासमती तांदळाचे फ्युचर्स ट्रेडिंगसुद्धा एनसीडीइएक्समध्ये सुरू झाले. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यातील डिलिव्हरीसाठी हे व्यवहार असतील. डिलिव्हरी केंद्र पंजाबमधील कर्नाल असेल. बासमती तांदळाच्या उत्पादनात पंजाब राज्य अग्रेसर आहे. त्यानंतर हरियाना, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार ही राज्ये येतात. लॉट-साईज १० टन आणि प्रति क्विंटलमध्ये बोली असेल. पुढील आठवड्यापासून या दोन्ही शेतमालाचा समावेश लेखात केला जाईल. या नंतर लवकरच उडीद, बटाटा, तूर इत्यादी पिके फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये येतील, अशी अपेक्षा आहे. यातील काही  बीएससीमध्येसुद्धा येण्याची शक्यता आहे. 

टीप ः सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठ.    
ई-मेल ः  arun.cqr@gmail.com


इतर अॅग्रोमनी
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
इंडोनेशियात साखर दरावरुन वातावरण तापले कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात साखर जात...
आत्मनिर्भर भारत योजनेला मंजुरी :...नवी दिल्ली : आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत योजनेत...
कीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र...पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक...
काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची...पुणे: कोविड १९ साथीनंतर तयार झालेल्या आपत्कालिन...
देशातून ३६ लाख टन साखर निर्यात पुणे: देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी...
धोरणं बदलल्यास खाद्यतेलात भारत...एके काळी दोन वेळच्या अन्नासाठी इतर देशांकडे हात...
कृषी सलग्न व्यवसायासाठी ‘मुद्रा’मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत.  शिशू...
‘कोरोना’विषयक सेवेतून आम्हाला मुक्त करा...पुणे : ‘राज्यातील ९ हजार कृषी सहायकांना विविध...
एप्रिलमध्ये यंदा खत विक्रीत देशात ७१...नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात...
तारण अन् गहाणखतज्या चल बाबी आहेत, त्यांचे जे तारण बँक घेते,...
जळगावचा सुवर्णबाजारात ४२ दिवसानंतर...जळगाव ः राज्यभरात प्रसिद्ध असलेला जळगावचा...
पुढील हंगामावरही शिल्लक साखरेचे ओझे? कोल्हापूर: देशात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत...
इंडोनेशिया, इराणकडून साखरेला मागणी कोल्हापूर: गेल्या दोन महिन्यांपासून साखर...
गावबंदी सर्व्हेक्षण : भाज्या, फळांचे ६०...कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे राज्यात लावलेली...
डाळ उद्योग अडचणीत; ३० कोटींचा फटकाजळगाव : कोरोनाच्या संकटात खानदेशातील डाळ...