मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीचा वाढीचा कल

वायदे बाजार
वायदे बाजार

पु ढील महिन्यात रब्बी मका, गहू आणि हरभरा यांचे भाव वाढतील. याचबरोबरीने हळदीचे सुद्धा भाव वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीन व कापूस यांचे भाव कमी होतील. या सप्ताहात गहू व मूग वगळता इतर सर्वांचे भाव कमी झाले आहेत.

गेल्या सप्ताहात पावसाची प्रगती फारशी समाधानकारक नव्हती. १६ जुलैपर्यंत झालेला पाऊस हा सरासरीपेक्षा १७ टक्‍क्‍याने कमी होता. ही घट २३ जुलैपर्यंत १९ टक्‍क्‍यांवर गेली. प. बंगाल, झारखंड, उत्तराखंड, राजस्थान, ओरिसा, गुजराथ, सौराष्ट, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा व तामिळनाडू येथे ही घट ३० टक्‍क्‍यांहून अधिक आहे. पुढील तीन दिवसांत मध्य प्रदेश, पं. बंगाल, ओरिसा, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र येथे चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. तसे झाले तर ही तूट काही प्रमाणात भरून येईल. सोयाबीनचे क्षेत्र मध्य प्रदेशातील अनुकूल पावसामुळे वाढेल असा अंदाज आहे. मात्र मराठवाडा व विदर्भ येथे अजून पाऊस फारच कमी झालेला आहे. या सप्ताहात गहू व मूग वगळता इतर सर्वांचे भाव कमी झाले. (आलेख १) पुढील महिन्यात रब्बी पिकांचे (रब्बी मका, गहू व हरभरा) यांचे भाव वाढतील. हळदीचे सुद्धा भाव वाढतील. सोयाबीन व कापूस यांचे भाव कमी होतील. (आलेख २) 

गेल्या सप्ताहातील  एनसीडीईएक्स आणि एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार  मका (रब्बी) रब्बी मक्‍याच्या (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात वाढत होत्या (रु. १,८६३ ते रु. २,१६८). गेल्या सप्ताहात त्या रु. २,१७६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.९ टक्‍क्‍यांनी घसरून रु. २,१३५ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाबबाग) रु. २,१४३ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमी भाव रु. १,७६० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७०० होता.) बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी भावापेक्षा अधिक आहेत. ऑक्‍टोबर डिलिवरीचे भाव रु. २,१७६ आहेत. खरीप मक्‍यासाठी (सांगली) अजून व्यवहार होत नाहीत. ऑक्‍टोबरमधील भाव हमी भावापेक्षा अधिक असण्याची शक्‍यता आहे.  साखर साखरेच्या (ऑक्‍टोबर २०१९) किमती या सप्ताहात व्यवहार नसल्याने रु. ३१६० वर स्थिर होत्या. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३१५० वर आलेल्या आहेत.  सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या. (रु. ३७३१ ते ३६१४). या सप्तात त्या १ टक्‍क्‍यांनी घसरून रु. ३६१० वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३६४२ वर आल्या आहेत. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी झाली आहे. नवीन वर्षासाठी हमी भाव रु. ३७१० आहे. २३ जुलै रोजी नोव्हेंबर डिलिवरीसाठी रु. ३५५५ भाव होता. नंतरच्या महिन्यांसाठी (ऑक्‍टोबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० डिलिवरीसाठी) तो याच किमतीच्या आसपास होता. हे सर्व भाव हमी भावापेक्षा कमी आहेत.  गहू गव्हाच्या (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. २,०२२ ते रु. १९८९). गेल्या सप्ताहात त्या १.५ टक्‍क्‍यांनी वाढून रु. २०१३ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.८ टक्‍क्‍यांनी वाढून रु. २०७० वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २०२६ वर आल्या आहेत. ऑक्‍टोबर २०१९ फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.९ टक्‍क्‍यांनी अधिक आहेत. (रु. २१२६). नवीन हमी भाव रु. १८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १७३५ होता.)  गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या. (रु. ४३९० ते रु. ४२१८). गेल्या सप्ताहात त्या रु. ४३६८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.४ टक्‍क्‍यांनी घसरून रु. ४२२१ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४२५० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४२७० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा ऑक्‍टोबर २०१९ मधील फ्युचर्स किमती १.६ टक्‍क्‍यांनी(रु. ४३२०) अधिक आहेत.   हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या. (रु. ४६७७ ते ४२५०). या सप्ताहात त्या ०.३ टक्‍क्‍यांनी घसरून रु. ४३०५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा १.३ टक्‍क्‍यांनी घसरून रु. ४२५१ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४१९५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा ऑक्‍टोबर २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.१ टक्‍क्‍यांनी अधिक आहेत (रु. ४३२६). शासनाकडे पुरेसा साठा आहे. तो बाजारात येऊ लागला आहे. आवक वाढू लागली आहे. नवीन हमी भाव रु. ४६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४४०० होता).  कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. २२,२०० ते रु. २१,१८०). गेल्या सप्ताहात त्या २.२ टक्‍क्‍यांनी वाढून रु. २०९३० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २०९४० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१२८१ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. १९८६० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ६.७ टक्‍क्‍यांनी कमी आहेत. आंतरराष्ट्रीय घटनांना परिणामसुद्धा किमतींवर होत आहे. कापसाखालील पेरणी वाढत आहे. या वर्षी कापसाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. मात्र अजून गुजरात, सौराष्ट्र, विदर्भ व पंजाबमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे.  मूग मुगाच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१९) किमती रु. ६२७१ वर आल्या आहेत. स्पॉट (मेरता) किमती रु. ६३५० वर आल्या आहेत. ऑक्‍टोबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. ६३०२ वर आल्या आहेत. मुगाचे हमी भाव रु. ७०५० आहेत. गेल्या वर्षी ते रु. ६९७५ होते.  बासमती भात बासमती भाताच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१९) किमती ३.८ टक्‍क्‍यांनी घसरून रु. ३,९०० वर आल्या आहेत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. ४१५३ वर आल्या आहेत. ऑक्‍टोबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. ३९२० वर आल्या आहेत. त्या स्पॉट किमतींपेक्षा ५.६ टक्‍क्‍यांनी कमी आहेत. 

हळद हळदीच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१९) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. ७२७० ते रु. ६६३०). गेल्या सप्ताहात त्या ४.४ टक्‍क्‍यांनी वाढून रु. ७००० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या किंचित घसरून रु. ६९६२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६७४५ वर आल्या आहेत. ऑक्‍टोबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ८.६ टक्‍क्‍यांनी अधिक आहेत (रु. ७३२४) या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. व्यापाऱ्यांकडील साठा पुरेसा आहे. मागणी मर्यादित आहे. (टीप ःसर्व किमती प्रती क्विंटल कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com