मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कल

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या किंमतीमध्ये चढउतार दिसत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या किंमतीमध्ये चढउतार दिसत आहेत.

हळदीच्या नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ५.३ टक्क्यांनी अधिक आहेत. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. व्यापाऱ्यांकडील साठा पुरेसा आहे. स्थानिक व निर्यात मागणी मर्यादित आहे. मक्याचे नोव्हेंबरमधील भाव हमी भावापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. हरभऱ्याच्या सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा नोव्हेंबर २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.८ टक्क्यांनी अधिक आहेत.

गेल्या सप्ताहात पावसाची प्रगती खूप चांगली होती. १३ ऑगस्ट पर्यंत झालेला पाऊस हा सरासरी एवढा होता. २० ऑगस्टपर्यंत तो एकूण सरासरीपेक्षा २ टक्क्यांनी अधिक झाला आहे. सरासरीपेक्षा लक्षणीय अधिक तो पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, सौराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र व कर्नाटक येथे झाला. प. बंगाल, झारखंड. उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणा, मराठवाडा व रायलसीमा येथे मात्र पावसाची तूट लक्षणीय आहे. पुढील ५ दिवसांत झारखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ व उत्तराखंडमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.  चांगल्या पावसामुळे सोयाबीन व कापसाचे उत्पादन वाढेल अशी अपेक्षा आहे. चीनकडून शेती मालाची आयात अजून वाढलेली नाही. त्यामुळे एकूण आंतरराष्ट्रीय भाव नरमच आहेत. आपल्या देशातून होणाऱ्या सोयाबीन पेंडीच्या निर्यातीतसुद्धा घट झाली आहे. हळदीच्या इराणकडे जाणाऱ्या निर्यातीत अमेरिकेच्या निर्बंधांमुळे घट झाली आहे. मात्र, दक्षिण भारतातील कमी पावसामुळे हळदीचे भाव वाढलेले आहेत. या सप्ताहात हरभरा, कापूस, सोयाबीन व हळद यांचे भाव घसरले. इतर पिकांचे भाव वाढले. (आलेख १).  पुढील महिन्यात रब्बी पिकांचे (रबी मका, गहू व हरभरा) भाव वाढतील. गवार बी व हळदीचे सुद्धा भाव वाढतील. सोयाबीन, कापूस, मूग व बासमती भात यांचे भाव कमी होतील. (आलेख २). गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स आणि एमसीएक्समधील किमतीतील चढउतार  मका (रब्बी)  रब्बी मक्याच्या (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात घसरत  होत्या (रु. २,२७१  ते रु. २,१६५). या सप्ताहात त्या २.८ टक्क्यांनी वाढून रु. २,२२५ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाबबाग) रु. २,१८८ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमी भाव रु. १,७६० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७०० होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी भावापेक्षा अधिक आहेत. ऑक्टोबर डिलिवरीचे भाव रु. २,२५७ आहेत. खरीप मक्यासाठी (सांगली) अजून व्यवहार होत नाहीत. नोव्हेंबर मधील भाव (रु. २,२३२) हमी भावापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.  साखर   साखरेच्या (ऑक्टोबर २०१९) किमती या सप्ताहात व्यवहार नसल्याने रु. ३,१६० वर स्थिर होत्या. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,२९० वर आलेल्या आहेत.   सोयाबीन    सोयाबीन फ्युचर्स (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. ३,६८४ ते रु. ३,५८२). या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी घसरून रु. ३,६३७ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,७३२ वर आल्या आहेत. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी झाली आहे. नवीन वर्षासाठी हमी भाव रु. ३,७१० आहे. २० ऑगस्ट रोजी डिसेंबर डिलिवरी साठी रु. ३,५१० भाव होता. नंतरच्या महिन्यांसाठी (जानेवारी व  फेब्रुवारी २०२० डिलिवरी साठी) तो अनुक्रमे रु. ३,५४० व रु. ३,५७०  आसपास होता. हे सर्व भाव हमी भावापेक्षा कमी आहेत.  हळद  हळदीच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१९) किमती १७ जुलै पर्यंत वाढत  होत्या (रु. ६,६२४ ते रु. ७,२६२). नंतर त्या पुन्हा घसरू लागल्या. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी घसरून रु. ६,९७२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,८३६ वर  आल्या आहेत. नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ५.३ टक्क्यांनी अधिक आहेत  (रु. ७,१९६).  या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. व्यापा-यांकडील साठा पुरेसा आहे. स्थानिक व निर्यात मागणी मर्यादित आहे.   गहू  गव्हाच्या (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. २,००५ ते रु. २,११६).  या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी वाढून रु. २,०९१ वर आल्या आहेत.  स्पॉट (कोटा) किमती रु. २,०६६ वर  आल्या आहेत. नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,१४५).  नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता).  गवार बी  गवार बीच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१९) किमती  जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. ४,५०१ ते रु. ४,२३६). या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेंत १.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,३८९ वर आल्या  आहेत.  स्पॉट (जोधपूर) किमती  रु. ४,३४९ वर आल्या आहेत.  सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा नोव्हेंबर २०१९ मधील फ्युचर्स किमती १.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४३१).   हरभरा  हरभ-याच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१९) किमती  जुलै महिन्यात रु. ४,२३६ ते रु. ४,३९४ या दरम्यान होत्या.  या सप्ताहात त्या १ टक्क्यांनी कमी होऊन रु. ४,२६१ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,२०८ वर आल्या  आहेत.  सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा नोव्हेंबर २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३७३).  शासनाकडे पुरेसा साठा आहे.  तो बाजारात येऊ लागला आहे.  नवीन हमी भाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता).  मूग  मुगाच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. ६,००० ते रु. ६,३८४). या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी वाढून रु. ६,३४२ वर आल्या आहेत. स्पॉट (मेरता) किमती रु. ६,४०० वर आल्या आहेत. नवीन मूग सप्टेंबर महिन्यात बाजारात  येऊ लागेल. नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. ६,३११ वर आल्या आहेत. मुगाचे हमी भाव रु. ७,०५० आहेत. गेल्या वर्षी ते रु. ६,९७५ होते. 

बासमती भात  बासमती भाताच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. ४,३०० ते रु. ३,७५९).  या सप्ताहात त्या ३ टक्क्यांनी वाढून रु. ३,५५९ वर आल्या आहेत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. ३,९२५ वर आल्या आहेत.  नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. ३,४९६  वर आल्या आहेत. त्या स्पॉट किमतींपेक्षा १३.६ टक्क्यांनी कमी आहेत.

कापूस 

एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१९) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. २०,४६० ते  रु. १९,९१०). या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी घसरून  रु. १९,८५० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,५०५ वर आल्या आहेत.  डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. १९,३७० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.५ टक्क्यांनी कमी आहेत. आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणामसुद्धा किमतींवर होत आहे. कापसाखालील पेरणी वाढत आहे. या वर्षी कापसाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या सप्ताहात कापसाच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे.  (टिप ः सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी).         इमेल ः arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com