agriculture news in Marathi, article regarding market trends in NCDEX and MCX | Page 2 ||| Agrowon

सोयाबीन, हळद, गव्हाच्या फ्युचर्स किमतींत वाढ

डॉ. अरुण प्र. कुलकर्णी
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

सोयाबीन फ्युचर्स किमती या सप्ताहात ५ टक्क्यांनी वाढून रु. ३,८१८ वर आल्या आहेत. याला मुख्य कारण म्हणजे पामतेलात झालेली वाढ. हळदीच्या नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ५.६ टक्क्यांनी अधिक आहेत. गव्हाच्या नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.७ टक्क्यांनी अधिक आहेत.

सोयाबीन फ्युचर्स किमती या सप्ताहात ५ टक्क्यांनी वाढून रु. ३,८१८ वर आल्या आहेत. याला मुख्य कारण म्हणजे पामतेलात झालेली वाढ. हळदीच्या नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ५.६ टक्क्यांनी अधिक आहेत. गव्हाच्या नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.७ टक्क्यांनी अधिक आहेत.

गेल्या सप्ताहात पावसाची प्रगती समाधानकारक होती. २० ऑगस्टपर्यंत झालेला पाऊस एकूण सरासरीपेक्षा दोन टक्क्यांनी अधिक झाला होता. २७ ऑगस्टपर्यंत तो सरासरीपेक्षा एक टक्क्याने अधिक आहे. प. बंगाल, झारखंड, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा व मराठवाडा येथे मात्र पावसाची तूट लक्षणीय आहे. आपल्या देशातून होणाऱ्या सोयाबीन पेंडीच्या निर्यातीतसुद्धा घट झाली  आहे. हळदीच्या इराणकडे जाणाऱ्या निर्यातीत अमेरिकेच्या निर्बंधांमुळे घट झाली आहे. दक्षिण भारतातील चांगल्या पावसामुळे हळदीचे भाव कमी झालेले आहेत. चांगल्या पावसामुळे या सप्ताहात सोयाबीनखेरीज इतरांचे भाव घसरले. सर्वांत अधिक घट (५.५ टक्के) हरभऱ्यामध्ये झाली. सोयाबीनचे भाव ५ टक्क्यांनी वाढले. (आलेख १).  पुढील महिन्यात रब्बी पिकांचे (रब्बी मका, गहू व हरभरा) भाव वाढतील. गवार बी व हळदीचेसुद्धा भाव वाढतील. सोयाबीन, कापूस, मूग व बासमती भात यांचे भाव कमी होतील. (आलेख २).

गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स आणि एमसीएक्समधील किमती  
मका (रब्बी) 
रब्बी मक्याच्या (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. २,२७१ ते रु. २,१६५). या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी घसरून रु. २,१८० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाबबाग) रु. २,१९४ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमीभाव रु. १,७६० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७०० होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. ऑक्टोबर डिलिव्हरीचे भाव रु. २,२४६ आहेत. खरीप मक्यासाठी (सांगली) अजून व्यवहार होत नाहीत. नोव्हेंबरमधील भाव (रु. २,२३२) हमीभावापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. या भावाला हेजिंग करण्यास वाव आहे.
साखर 
साखरेच्या (ऑक्टोबर २०१९) किमती या सप्ताहात व्यवहार नसल्याने रु. ३,१६० वर स्थिर होत्या. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,२७३ वर आलेल्या आहेत.

हळद 
हळदीच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१९) किमती १७ जुलैपर्यंत वाढत  होत्या (रु. ६,६२४ ते रु. ७,२६२). नंतर त्या पुन्हा घसरू लागल्या. या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी घसरून रु. ६,७७२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,६६८ वर  आल्या आहेत. नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ५.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,०४०). या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. व्यापाऱ्यांकडील साठा पुरेसा आहे. स्थानिक व निर्यात मागणी मर्यादित आहे.

गहू 
गव्हाच्या (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. २,००५ ते रु. २,११६).  या सप्ताहात त्या १ टक्क्याने घसरून रु. २,०७१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,०५६ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,१३३). नवीन हमीभाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). 
गवार बी 
गवार बीच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. ४,५०१ ते रु. ४,२३६). या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेत २ टक्क्यांनी घसरून रु. ४,३०० वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,२८० वर आल्या आहेत.  सध्याच्या  स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा नोव्हेंबर २०१९ मधील फ्युचर्स किमती ०.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,२९१).  

सोयाबीन   
सोयाबीन फ्युचर्स (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. ३,६८४ ते रु. ३,५८२). या सप्ताहात त्या ५ टक्क्यांनी वाढून रु. ३,८१८ वर आल्या आहेत. याला मुख्य कारण म्हणजे पामतेलात झालेली वाढ. या तेलावरील आयात कर वाढल्यामुळे ही वाढ झालेली आहे. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,७२९ वर आल्या आहेत. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी झाली आहे. नवीन वर्षासाठी हमीभाव रु. ३,७१० आहे. २० ऑगस्ट रोजी डिसेंबर डिलिव्हरीसाठी रु. ३,५५० भाव होता. नंतरच्या महिन्यांसाठी (जानेवारी व फेब्रुवारी २०२० डिलिव्हरीसाठी) तो अनुक्रमे रु. ३,५८५ व रु. ३,६२० च्या आसपास होता. हे सर्व भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. 

हरभरा 
हरभऱ्याच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात रु. ४,२३६ ते रु. ४,३९४ यादरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ५.५ टक्क्यांनी कमी होऊन रु. ४,०२८ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,०३१ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा नोव्हेंबर २०१९ मधील फ्युचर्स किमती २.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,१३१). शासनाकडे पुरेसा साठा आहे. तो बाजारात येऊ लागला आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). 

मूग 
मुगाच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. ६,००० ते रु. ६,३८४). या सप्ताहात त्या २.७ टक्क्यांनी घसरून रु. ६,१७० वर आल्या आहेत. स्पॉट (मेरता) किमती रु. ६,३०० वर आल्या आहेत. नवीन मूग सप्टेंबर महिन्यात बाजारात येऊ लागेल. नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. ६,२२४ वर आल्या आहेत. मुगाचे हमीभाव रु. ७,०५० आहेत. गेल्या वर्षी ते रु. ६,९७५ होते. भाव घसरण्याची शक्यता आहे. 

कापूस 

एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१९) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या 
(रु. २०,४६० ते रु. १९,९१०). या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी घसरून रु. १९,७५० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,४३५ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. १९,३७० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ६.६ टक्क्यांनी कमी आहेत. आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणामसुद्धा किमतींवर होत आहे. कापसाखालील पेरणी वाढत आहे. या वर्षी कापसाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या सप्ताहात कापसाच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. भाव वाढण्याची शक्यता कमी आहे.
 

बासमती तांदूळ 
बासमती तांदळाच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१९) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. ४,३०० ते रु. ३,७५९). या सप्ताहात त्या रु. ३,५५९ वर स्थिर आहेत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. ३,८०० वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. ३,३९२ वर आल्या आहेत. त्या स्पॉट किमतींपेक्षा १३.६ १०.७ टक्क्यांनी कमी आहेत. अजून व्यवहार होत नाहीत. किमती कमी होण्याची शक्यता आहे.
(टीप ः सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी).

इमेल - arun.cqr@gmail.com


इतर अॅग्रोमनी
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
इंडोनेशियात साखर दरावरुन वातावरण तापले कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात साखर जात...
आत्मनिर्भर भारत योजनेला मंजुरी :...नवी दिल्ली : आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत योजनेत...
कीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र...पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक...
काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची...पुणे: कोविड १९ साथीनंतर तयार झालेल्या आपत्कालिन...
देशातून ३६ लाख टन साखर निर्यात पुणे: देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी...
धोरणं बदलल्यास खाद्यतेलात भारत...एके काळी दोन वेळच्या अन्नासाठी इतर देशांकडे हात...
कृषी सलग्न व्यवसायासाठी ‘मुद्रा’मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत.  शिशू...
‘कोरोना’विषयक सेवेतून आम्हाला मुक्त करा...पुणे : ‘राज्यातील ९ हजार कृषी सहायकांना विविध...
एप्रिलमध्ये यंदा खत विक्रीत देशात ७१...नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात...
तारण अन् गहाणखतज्या चल बाबी आहेत, त्यांचे जे तारण बँक घेते,...
जळगावचा सुवर्णबाजारात ४२ दिवसानंतर...जळगाव ः राज्यभरात प्रसिद्ध असलेला जळगावचा...
पुढील हंगामावरही शिल्लक साखरेचे ओझे? कोल्हापूर: देशात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत...
इंडोनेशिया, इराणकडून साखरेला मागणी कोल्हापूर: गेल्या दोन महिन्यांपासून साखर...
गावबंदी सर्व्हेक्षण : भाज्या, फळांचे ६०...कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे राज्यात लावलेली...
डाळ उद्योग अडचणीत; ३० कोटींचा फटकाजळगाव : कोरोनाच्या संकटात खानदेशातील डाळ...