agriculture news in Marathi, article regarding market trends in NCDEX and MCX | Agrowon

शेतमालाच्या किमतीत स्थिरतेचा कल
डॉ. अरुण प्र. कुलकर्णी
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

चीनकडून शेतमालाची आयात अजून वाढलेली नाही. त्यामुळे एकूण आंतरराष्ट्रीय भाव नरमच आहेत. आपल्या देशातून होणाऱ्या सोयाबीन पेंडीच्या निर्यातीतसुद्धा घट झाली आहे. इराणला होणाऱ्या हळदीच्या निर्यातीत अमेरिकेच्या निर्बंधांमुळे घट झाली आहे. दक्षिण भारतातील चांगल्या पावसामुळे हळदीचे भाव कमी झालेले आहेत. मुगाची आवक आता सुरू झाली आहे. इतर पिकांची आवक मात्र लांबलेली असेल.

चीनकडून शेतमालाची आयात अजून वाढलेली नाही. त्यामुळे एकूण आंतरराष्ट्रीय भाव नरमच आहेत. आपल्या देशातून होणाऱ्या सोयाबीन पेंडीच्या निर्यातीतसुद्धा घट झाली आहे. इराणला होणाऱ्या हळदीच्या निर्यातीत अमेरिकेच्या निर्बंधांमुळे घट झाली आहे. दक्षिण भारतातील चांगल्या पावसामुळे हळदीचे भाव कमी झालेले आहेत. मुगाची आवक आता सुरू झाली आहे. इतर पिकांची आवक मात्र लांबलेली असेल.

गेल्या सप्ताहात पावसाची प्रगती समाधानकारक होती. ३ सप्टेंबरपर्यंत झालेला पाऊस एकूण सरासरीइतका झाला होता. १० सप्टेंबरपर्यंत तो सरासरीपेक्षा ३ टक्क्यांनी अधिक झालेला आहे. ३६ विभागांपैकी १७ विभागांत तो सरासरीच्या जवळ आहे; तर ८ विभागांत त्याची अजून कमतरता आहे. यात प. बंगाल, झारखंड, बिहार, उत्तराखंड व उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. पुढील ५ दिवसांत यापैकी झारखंड व बिहारमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे. ६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या अंदाजानुसार गेल्या वर्षाच्या तुलनेने या वर्षी भारतातील एकूण खरीप पिकाखालील क्षेत्र ६.९१ टक्क्यांनी वाढलेले असेल. कापसाखालील क्षेत्र १०.१२ टक्क्यांनी, मक्याखालील क्षेत्र २.५ टक्क्यांनी, सोयाबीनखालील क्षेत्र १.४७ टक्क्यांनी, मुगाखालील क्षेत्र १.३० टक्क्यांनी व एकूण डाळीखालील क्षेत्र ६.९८ टक्क्यांनी वाढलेले दिसेल. भाताखालील क्षेत्र मात्र ६.६ टक्क्यांनी कमी झालेले असेल. चांगल्या पावसामुळे उत्पादनसुद्धा वाढेल, अशी अपेक्षा आहे. 
चीनकडून शेतमालाची आयात अजून वाढलेली नाही. त्यामुळे एकूण आंतरराष्ट्रीय भाव नरमच आहेत. आपल्या देशातून होणाऱ्या सोयाबीन पेंडीच्या निर्यातीतसुद्धा घट झाली आहे. इराणला होणाऱ्या हळदीच्या निर्यातीत अमेरिकेच्या निर्बंधांमुळे घट झाली आहे. दक्षिण भारतातील चांगल्या पावसामुळे हळदीचे भाव कमी झालेले आहेत. मुगाची आवक आता सुरू झाली आहे. इतर पिकांची आवक मात्र लांबलेली असेल. बहुतेक पिकांचा बाजारात पुरेसा साठा आहे व मागणीसुद्धा मर्यादित आहे. त्यामुळे पुढील काही दिवस भाव नरमच राहतील. चांगल्या पावसामुळे या सप्ताहात कापूस व हरभऱ्याखेरीज इतरांचे भाव घसरले. सर्वांत अधिक घट (५.१ टक्के) रब्बी मक्यामध्ये झाली. हरभऱ्याचे भाव ०.६ टक्क्यांनी वाढले. (आलेख १). पुढील महिन्यात रब्बी पिकांचे (रब्बी मका, गहू व हरभरा) भाव वाढतील. मूग व हळदीचेसुद्धा भाव वाढतील. कापूस, खरीप मका, सोयाबीन व बासमती भात यांचे भाव कमी होतील. (आलेख २).

गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स आणि एमसीएक्समधील किमतीतील चढउतार 
मका (रब्बी) 
रब्बी मक्याच्या (ऑक्टोबर २०१९) किमती २० ऑगस्टपर्यंत वाढत होत्या (रु. २,१६५ ते रु. २,२४१). त्यानंतर त्या समाधानकारक पावसामुळे उतरू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या ५.१ टक्क्यांनी घसरून रु. २,०३३ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाबबाग) रु. २,१२८ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमीभाव रु. १,७६० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७०० होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. डिसेंबर डिलिव्हरीचे भाव रु. २,२१६ आहेत. खरीप मक्यासाठी (सांगली) अजून व्यवहार होत नाहीत. डिसेंबरमधील भाव (रु. २,१६६) हमीभावापेक्षा अधिक आहेत. या भावाला हेजिंग करण्यास वाव आहे. 

गहू 
गव्हाच्या (ऑक्टोबर २०१९) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या (रु. २,१४० ते रु. २,०७९).  या सप्ताहात त्या २.३ टक्क्यांनी घसरून रु. २,०४६ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,०२८ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०९१).  

सोयाबीन  
सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१९) किमती ऑगस्ट महिन्यात वाढत होत्या (रु. ३,४८८ ते रु. ३,५९१). या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी घसरून रु. ३,५७३ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,८०२ वर आल्या आहेत. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी झाली आहे. नवीन वर्षासाठी हमीभाव रु. ३,७१० आहे. डिसेंबर डिलिव्हरीसाठी रु. ३,५७८ भाव आहे. नंतरच्या महिन्यांसाठी (जानेवारी व  फेब्रुवारी २०२० डिलिव्हरीसाठी) तो अनुक्रमे रु. ३,५९९ व रु. ३,६६५ आहे.  

हळद 
हळदीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१९) किमती १६ ऑगस्टपर्यंत वाढत होत्या (रु. ६,७०४ ते रु. ७,१९८). नंतर त्या पुन्हा घसरू लागल्या. या सप्ताहात त्या रु. ६,६८६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,५७६ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ९.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,१९२). या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. व्यापाऱ्यांकडील साठा पुरेसा आहे. स्थानिक व निर्यात मागणी मर्यादित आहे.  

बासमती भात 
बासमती भातामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. ३,८०० वर स्थिर आहेत.
 
गवार बी 
गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१९) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या (रु. ४,४४३ ते रु. ४,२५२). या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेत १.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,१२५ वर आल्या  आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,१७७ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१९ मधील फ्युचर्स किमती ०.२ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ४,१७०). या वर्षी राजस्थान मध्ये चांगला पाऊस झाला आहे. पुढील काही दिवस किमती घसरण्याचा संभव आहे. 

हरभरा 
हरभऱ्याच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१९) किमती ऑगस्ट महिन्याच्या १४ तारखेपासून घसरू लागल्या आहेत (रु. ४,३५८ ते रु. ४,०७५). या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी वाढून रु. ४,०६० वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,०६१ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१९ मधील फ्युचर्स किमती १.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,१२१).  शासनाकडे पुरेसा साठा आहे. किमती घसरण्याचा कल आहे. 

मूग 
मुगाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१९) किमती ऑगस्ट महिन्यात २१ तारखेनंतर घसरत आहेत (रु. ६,३१० ते रु. ५,९७९). या सप्ताहात त्या १.७ टक्क्यांनी घसरून रु. ५,७७४ वर आल्या आहेत. स्पॉट (मेरता) किमती २.४ टक्क्यांनी घसरून रु. ६,०५० वर आल्या आहेत. नवीन मूग या महिन्यात बाजारात येऊ लागला आहे. डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. ६,२५१ वर आल्या आहेत. मुगाचे हमीभाव रु. ७,०५० आहेत. गेल्या वर्षी ते रु. ६,९७५ होते. भाव घसरण्याची शक्यता आहे. हमीभावापेक्षा ते कमी असतील. 

कापूस 

एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१९) किमती ऑगस्ट महिन्यात १३ तारखेपर्यंत वाढत होत्या (रु. १९,८६० ते १९,९५०). त्यानंतर त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या ०.१ टक्क्यांनी वाढून रु. १९,४८० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,८५० वर आल्या आहेत. डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती 
रु. १९,२४० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.१ टक्क्यांनी कमी आहेत. आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणामसुद्धा किमतींवर होत आहे. या वर्षी कापसाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाव वाढण्याची शक्यता कमी आहे. 

टीप ः सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी).        
- डॉ. अरुण प्र. कुलकर्णी ः arun.cqr@gmail.com

इतर अॅग्रोमनी
कडधान्यातील स्वयंपूर्णता यंदा ठरणार...नवी दिल्ली ः देशात यंदा मॉन्सूनच्या उशिरा...
देशात रब्बी मूग पेरणीत २९ टक्के घटनवी दिल्ली: देशात रब्बी हंगामाच्या पेरणीला...
सोयाबीनशिवाय सर्व पिकांच्या वायदा...या सप्ताहात गहू व गवार बी वगळता इतर सर्व...
राज्यात कापूस दर हमीभावापेक्षा कमीचजळगाव  ः राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षा...
‘कॉन्टॅक्टलेस लेंडिंग’ पद्धतीची...नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १०००...
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला...पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा...
तीन वर्षांत हळदीच्या दरात दीड हजार...सांगली ः सांगली जिल्ह्यासह अन्य भागांत  ...
मका, हळद, गव्हाच्या किमतीमध्ये वाढरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात...कोल्हापूर  : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार...
अर्थशास्त्राला शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न...सन २०१९ चे अर्थशास्त्राचे नोबेल भारतीय वंशाचे...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
पावसामुळे कोल्हापुरात गुळाची आवक घटलीकोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून सुरू...
उत्तर प्रदेशात उसाला प्रतिक्विंटल ३०...नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील साखर...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढीची शक्यतारब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
मध्य प्रदेश बाजारात कापसाला ५४०० रुपये...जळगाव  ः गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू...
औरंगाबाद, जालना, बीडमध्ये ज्वारी,...औरंगाबाद : यंदाच्या रब्बी हंगामासाठी...
रब्बी मका, गहू, हरभऱ्याच्या दरात वाढीची...सध्या बाजारपेठेत आवकेची कमतरता आणि अति पावसामुळे...
वाॅलमार्ट कोळंबी आयातीसाठी वापरणार...नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातून कोळंबीची अमेरिकेसह...
दसरा, दिवाळीत बेदाणा दर वधारण्याची...सांगली  ः गेल्यावर्षीपेक्षा बेदाण्याचे...
आंतरपिकाच्या योग्य नियोजनातून लबडे ...पेरूच्या प्रत्यक्ष उत्पादनाला वर्ष- दीड वर्ष...