हळद, गहू, हरभऱ्याच्या फ्युचर्स किमतींत वाढीचा कल

हळद, गहू, हरभऱ्याच्या फ्युचर्स किमतींत वाढीचा कल
हळद, गहू, हरभऱ्याच्या फ्युचर्स किमतींत वाढीचा कल

हळदीच्या डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १ टक्क्याने अधिक आहे. गव्हाच्या डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४ टक्क्यांनी अधिक आहेत. हरभऱ्याच्या सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१९ मधील फ्युचर्स किमती २.५ टक्क्यांनी अधिक आहेत.

गे ल्या सप्ताहात पावसाची प्रगती समाधानकारक होती. १० सप्टेंबरपर्यंत झालेला पाऊस एकूण ३ टक्क्यांनी अधिक होता. १७ सप्टेंबरपर्यंत तो सरासरीपेक्षा ४ टक्क्यांनी अधिक झालेला आहे. ३६ विभागांपैकी १६ विभागांत तो सरासरीच्या जवळ आहे; तर ९ विभागांत त्याची अजून कमतरता आहे. यात प. बंगाल, झारखंड, बिहार, उत्तराखंड व उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. पुढील ५ दिवसांत यापैकी झारखंड व उत्तर प्रदेशमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे.  या वर्षी मॉन्सून लांबणार अशी चिन्हे आहेत. हंगामाअखेर पाऊस सरासरीपेक्षा काहीसा अधिक असेल. त्यामुळे खरिपाची आवक उशिरा सुरू होईल. तोपर्यंतची मागणी मुख्यत्वे मागील वर्षाच्या साठ्यावर भागवली जाईल. याचा परिणाम किमती वाढण्यावर होईल. मात्र या वर्षी उत्पादन वाढलेले असेल, त्यामुळे ही वाढ मर्यादित व साठ्यावर अवलंबून राहील. आवक सुरू झाल्यावर किमती घसरतील. या महिन्याअखेर उत्पादनाचा अंदाज येईल. त्यानुसार किमतींचासुद्धा अंदाज करता येईल. जागतिक व भारतातील मंदीचे स्वरूप, खनिज तेलाच्या किमती व अमेरिका-चीनची धोरणे हे पुढील वर्षासाठी महत्त्वाचे घटक असतील.

  • जागतिक पुरवठ्यात (उत्पादन अधिक आरंभीचा साठा) गहू, कापूस व तांदूळ यामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. मका, तेलबिया, त्यांतही सोयाबीन यांच्या पुरवठ्यात घट संभवते. तेलबियांचा वर्ष-अखेर साठा मोठ्या प्रमाणावर घसरण्याचा संभव आहे. 
  • भारतात कापसाच्या उत्पादनात व साठ्यात मोठी वाढ संभवते. जागतिक वाढ लक्षात घेता या वर्षी किमतींवर त्याचा ताण संभवतो. सोयाबीनच्या किमती आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असतील.    
  • आवक अजून सुरू झालेली नसल्यामुळे खरीप पिकांच्या (मका, सोयाबीन, कापूस व मूग) यांच्या किमतींत या सप्ताहात वाढ झाली. सोयाबीनमध्ये ही वाढ सर्वाधिक होती (३.७ टक्के). इतर पिकांच्या भावात घट झाली. हळदीत ही घट सर्वात जास्त होती (५.८ टक्के).  (आलेख १).  
  •  पुढील महिन्यात रबी पिकांचे (रब्बी मका, गहू व हरभरा) भाव वाढतील. मूग व हळदीचे सुद्धा भाव वाढतील. कापूस, खरीप मका, सोयाबीन व  बासमती भात यांचे भाव कमी होतील.
  • अमेरिकेच्या कृषी खात्याने जागतिक उत्पादनाचे सुधारित अंदाज १२ सप्टेंबर रोजी प्रकाशित केले. त्यानुसार जागतिक व भारतातील पुरवठ्यात व वर्षअखेर साठ्यात चालू वर्षी (२०९१-२०), मागील वर्षाच्या तुलनेने, किती वाढ वा घट होईल त्याचा अंदाज करता येतो.   
  • गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स आणि एमसीएक्समधील किमतीतील चढउतार  मका (रब्बी)  रब्बी मक्याच्या (ऑक्टोबर २०१९) किमती २० ऑगस्टपर्यंत वाढत होत्या (रु. २,१६५  ते रु. २,२४१). त्या नंतर त्या समाधानकारक पावसामुळे उतरू लागल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्या १.३ टक्क्यांनी वाढून  रु. २,०६० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाबबाग) रु. २,०९२ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमी भाव रु. १,७६० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७०० होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी भावापेक्षा अधिक आहेत. डिसेंबर डिलिवरीचे भाव रु. २,१६८ आहेत. खरीप मक्यासाठी (सांगली) अजून व्यवहार होत नाहीत. डिसेंबरमधील भाव (रु. २,०६०) हमी भावापेक्षा अधिक आहेत. या भावाला हेजिंग करण्यास वाव आहे.  सोयाबीन   सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१९) किमती ऑगस्ट महिन्यात वाढत होत्या (रु. ३,४८८ ते रु. ३,५९१). या सप्ताहात त्या ३.७ टक्क्यांनी वाढून रु. ३,७०५ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,९६९ वर आल्या आहेत. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी झाली आहे. नवीन वर्षासाठी हमी भाव रु. ३,७१० आहे. डिसेंबर डिलिवरी साठी रु. ३,६९९ भाव आहे.  नंतरच्या महिन्यांसाठी (जानेवारी व फेब्रुवारी २०२० डिलिवरी साठी) तो अनुक्रमे रु. ३,७४६ व रु. ३,७९९ आहे.  हे भाव रु. ३९०० च्या आसपास आले तर हेजिंग करणे योग्य होईल.  हळद  हळदीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१९) किमती १६ ऑगस्टपर्यंत वाढत  होत्या (रु. ६,७०४ ते रु. ७,१९८). नंतर त्या पुन्हा घसरू लागल्या. या सप्ताहात त्या ५.८ टक्क्यांनी घसरून रु. ६,२९८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,४१८ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १ टक्क्याने अधिक आहेत  (रु. ६,४९४).  या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. व्यापाऱ्यांकडील साठा पुरेसा आहे. स्थानिक व निर्यात मागणी मर्यादित आहे.   गवार बी  गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१९) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या (रु. ४,४४३ ते रु. ४,२५२). या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेत ०.५ टक्क्यांनी वाढून रु. ४,१४४ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,१२५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१९ मधील फ्युचर्स किमती १.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,२०१). या वर्षी राजस्थान मध्ये चांगला पाऊस झाला आहे. पुढील काही दिवस या किमती घसरण्याचा संभव आहे.  गहू  गव्हाच्या (ऑक्टोबर २०१९) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या (रु. २,१४० ते रु. २,०७९).  या सप्ताहात त्या ०.६  टक्क्यांनी वाढून रु. २,०५८ वर आल्या आहेत.  स्पॉट (कोटा) किमती रु. २,०३० वर आल्या आहेत. डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,११२).   हरभरा  हरभऱ्याच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१९) किमती  ऑगस्ट महिन्याच्या १४ तारखेपासून घसरू लागल्या आहेत (रु. ४,३५८ ते रु. ४,०७५). या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. ४,००२ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,००० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१९ मधील फ्युचर्स किमती २.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,१००). शासनाकडे पुरेसा साठा आहे. किमती घसरण्याचा कल आहे.  कापूस  एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१९) किमती ऑगस्ट महिन्यात १३ तारखेपर्यंत वाढत होत्या (रु. १९,८६० ते १९,९५०). त्यानंतर त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी वाढून रु. १९,५९० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,१९४ वर आल्या आहेत.  डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. १९,१३० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.३ टक्क्यांनी कमी आहेत. आंतर-राष्ट्रीय घटनांचा परिणामसुद्धा किमतींवर होत आहे. या वर्षी कापसाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किमतींत भाव वाढण्याची शक्यता कमी आहे. 

    मूग 

    मुगाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१९) किमती ऑगस्ट महिन्यात २१ तारखेनंतर घसरत आहेत (रु. ६,३१० ते रु. ५,९७९). या सप्ताहात त्या ०.१ टक्क्यांनी वाढून रु. ५,७७७ वर आल्या आहेत. स्पॉट (मेरता) किमती १ टक्क्याने घसरून रु. ५,९८८ वर आल्या आहेत. नवीन मूग या महिन्यात बाजारात येऊ लागला आहे. डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. ६,३२३ वर आल्या आहेत. मुगाचे हमी भाव रु. ७,०५० आहेत. गेल्या वर्षी ते रु. ६,९७५ होते. भाव घसरण्याची शक्यता आहे. हमी भावापेक्षा ते कमी असतील.  बासमती तांदूळ  बासमती तांदळामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. ३,८०० वर स्थिर आहेत.  

    (टीप ः सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी).     - डॉ. अरुण प्र. कुलकर्णी ,arun.cqr@gmail.com  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com