agriculture news in Marathi, article regarding market trends in NCDEX and MCX | Agrowon

मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढीची शक्यता

डॉ. अरुण प्र. कुलकर्णी
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

रब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. हळदीच्या जानेवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.९ टक्क्यांनी अधिक आहेत. गव्हाच्या जानेवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ८.१ टक्क्यांनी अधिक आहेत.

रब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. हळदीच्या जानेवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.९ टक्क्यांनी अधिक आहेत. गव्हाच्या जानेवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ८.१ टक्क्यांनी अधिक आहेत.

मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पुढील काही दिवसांत तो भारताचा निरोप घेईल. यापुढे खरीप आवकेचा जोर वाढेल. त्याचबरोबर सणासाठी धान्याची मागणीसुद्धा वाढेल. येत्या काळात  डाळ, गहू, साखरेची मागणी वाढल्यामुळे पुढील सप्ताहात त्यांच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे. मूग, भात यांच्या आवकेत जशी वाढ होईल तशी त्यांच्या किमती उतरतील. सध्या कमी आवकेमुळे त्यांच्या किमती गेले काही दिवस वाढत आहेत. 

गेल्या सप्ताहात कापूस, गहू, हरभरा, मूग व भात वगळता इतर वस्तूंचे भाव उतरले. हळदीत ही घट सर्वाधिक होती. मुगाचे व भाताचे भाव वाढले (आलेख १).  जानेवारी २०२० मध्ये रब्बी पिकांचे (रब्बी मका, गहू व हरभरा) भाव वाढतील. मुगाचे भाव उतरतील.  कापूस, खरीप मका, मूग व बासमती भात यांचे भाव कमी होतील. हळदीच्या व सोयाबीनचा भावात वाढ होण्याची शक्यता आहे. (आलेख २).

गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स आणि एमसीएक्समधील किमतीतील चढउतार ः 
मका (रब्बी) 
रब्बी मक्याच्या नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात १३ तारखेपर्यंत उतरत होत्या (र. २,१८७ ते रु. २,०८९). त्यानंतर वाढत गेल्या. या सप्ताहात त्या १.० टक्क्यांनी घसरून रु. २,१५४ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाबबाग) रु. २,१४२ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमी भाव रु. १,७६० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७०० होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी भावापेक्षा अधिक आहेत. डिसेंबर डिलिवरीचे भाव रु. २,२०० आहेत. खरीप मक्यासाठी (सांगली) अजून व्यवहार होत नाहीत. डिसेंबरमधील भाव (रु. १,९९०) हमी भावापेक्षा अधिक आहेत. या भावाला हेजिंग करण्यास वाव आहे. 

गहू 
गव्हाच्या नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात रु. २,०७५ व रु. २,१३३ या दरम्यान होत्या.  या सप्ताहात त्या रु. २,१२५ वर स्थिर आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,०६८ वर आल्या आहेत. जानेवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ८.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,२३५).  

 हळद 
हळदीच्या फ्युचर्स नोव्हेंबर २०१९) किमती  सप्टेंबरमध्ये उतरत होत्या. (रु. ६,९३८ ते रु. ६,१४०). या सप्ताहात त्या ४.६ टक्क्यांनी घसरून रु. ५,८८८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,००० वर आल्या आहेत.  जानेवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.९ टक्क्यांनी अधिक आहेत  (रु. ६,१७६). या   वर्षी उत्पादन वाढलेले असेल. व्यापाऱ्यांकडील साठा पुरेसा आहे. स्थानिक व निर्यात मागणी मर्यादित  आहे.  

कापूस  
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबरमध्ये  रु. १९,०७० व रु. १९,५०० च्या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. १९,२१० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट)   किमती रु. १९,५११ वर आल्या आहेत. जानेवारीच्या फ्युचर्स किमती रु. १९,२०० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.६ टक्क्यांनी कमी आहेत. आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणामसुद्धा किमतींवर होत आहे. या वर्षी कापसाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किमतींत भाव वाढण्याची शक्यता कमी आहे. 

गवार बी 
गवार बीच्या फ्युचर्स नोव्हेंबर २०१९) किमती ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबर महिन्यातसुद्धा घसरत होत्या (रु. ४,२१२ ते रु. ३,९८३). या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेत ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ३,९०२ वर आल्या  आहेत.  स्पॉट (जोधपूर) किमती  रु. ३,९११ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जानेवारी मधील फ्युचर्स किमती २.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,०१३). या वर्षी राजस्थान मध्ये चांगला पाउस झाला आहे. पुढील काही दिवस किमती घसरण्याचा संभव आहे. 

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स नोव्हेंबर २०१९) किमती  सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. ४,०२५ ते रु. ४,३८६).  गेल्या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी वाढून रु. ४,३२९ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.१ टक्क्यांनी वाढून रु. ४,३७४ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,३५० वर आल्या  आहेत.  सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जानेवारी मधील फ्युचर्स किमती १.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४३४). शासनाकडे पुरेसा साठा आहे.  मात्र ऑक्टोबर – नोव्हेंबर मध्ये वाढीव मागणीमुळे किमती वाढण्याची शक्यता आहे. 

मूग 
मुगाच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात १८ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ६,२७८ ते ५,९९३).  त्या नंतर त्या वाढू लागल्या. या सप्ताहात त्या ५.२ टक्क्यांनी वाढून रु. ६,४१६ वर आल्या आहेत. स्पॉट (मेरता) किंमती रु. ६,३८० वर आल्या आहेत. नवीन मूग या  महिन्यात बाजारात येऊ लागला आहे; पण अजून तो पुरेसा नाही.  जानेवारीच्या फ्युचर्स किमती रु. ६,२७८ वर आल्या आहेत. मुगाचे हमीभाव रु. ७,०५० आहेत. गेल्या वर्षी ते रु. ६,९७५ होते. आवक वाढेल तेव्हा भाव घसरण्याची शक्यता आहे.  

बासमती तांदूळ  
बासमती तांदळामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. ३,९०० वर आल्या आहेत.  

सोयाबीन 

सोयाबीन फ्युचर्स (नोव्हेंबर २०१९) किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,४८६ ते रु. ३,८२१). गेल्या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी घसरून रु. ३,६८७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ०.८ टक्क्यांनी घसरून ३,६५७ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती ७.६ टक्क्यांनी घसरून रु. ३,६६८ वर आल्या आहेत. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी झाली आहे. चीन व अमेरिकामधील संबंध अजूनही सुधारलेले नाहीत. नवीन वर्षासाठी हमीभाव रु. ३,७१० आहे. जानेवारी डिलिवरीसाठी रु. ३,७३५ भाव आहे. नंतरच्या महिन्यांसाठी (फेब्रुवारी व मार्च २०२० डिलिवरी साठी) तो अनुक्रमे रु. ३,७७८ व रु. ३,८२१ आहे.
 

(टीप ः सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रती १७० किलोची गाठी).    

-डॉ. अरुण प्र. कुलकर्णी ः arun.cqr@gmail.com

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर अॅग्रोमनी
जग महामंदीच्या उंबरठ्यावर उभे :...नवी दिल्ली : जागतिक पातळीवर कोविड-१९ च्या...
कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...मुंबई : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग...
संरक्षण सिद्धतेप्रमाणेच आरोग्य...सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी...
अनेक वर्षानंतर कापसाची विक्रमी खरेदीभारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक वर्षानंतर...
शेतीमालाचे फ्युचर्स व्यवहार सुरूकोरोनामुळे ‘एनसीडीइएक्स'ने २० एप्रिल च्या...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
वेळेवर करा कर्जाची परतफेडसुरवातीच्या काळात उत्पन्न सुरू होईपर्यंतचा...
मध निर्यातीत मोठी वाढनाशिक: भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला...
शेतकरी उत्पादक कंपन्या ‘डिजिटल’ होणार;...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना डिजिटल...
कुटुंबाच्या अर्थकारणात डाळिंबासह लिंबू...सात एकरांवरील डाळिंब हे मुख्य पीक असले तरी...
देशात साखर उत्पादनात ५७ लाख टनांनी घटकोल्हापूर: देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला...
राज्य अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदीकृषी   महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती...
'फिक्की'च्या राष्ट्रीय परिषदेत जैन...दिल्ली ः इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री...
ऊस, आले पिकासह जमिनीच्या विश्रांतीचे...कोल्हापूर जिल्ह्यातील शेडशाळ (ता. शिरोळ) येथील...
अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात...
राज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची...नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...
आंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे  : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...