त्वचारोगावर टाकळा उपयुक्त

टाकळ्याचे झुडूप
टाकळ्याचे झुडूप
  • स्थानिक नाव    :    टाकळा, तरोटा, तरवटा, तखटा, अटोरा
  •    शास्त्रीय नाव    :    Cassia tora L       
  •    इंग्रजी नाव    :    Foetid cassia, The Sickle Senna,
  •         Wild Senna       
  •    संस्कृत नाव    :    चक्रमर्दा, ददमरी, तागा         
  •    कूळ    :    Caesalpinaceae       
  •    उपयोगी भाग    :    कोवळी पान,        
  •    उपलब्धीचा काळ    :    मे -जून        
  •    झाडाचा प्रकार    :    झुडूप          
  •    अभिवृद्धी     :    बिया,          
  •    वापर    :    शिजवून भाजी
  • आढळ 

  •  टाकळा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती ३० ते ६५ सें.मी. उंच वाढते. टाकळा हे तण असून ते  माळरानावर, रस्त्याच्या कडेला, शेतजमीन, परसबागेत तसेच पडीक जमिनीवर सर्वत्र वाढलेले दिसते. महाराष्ट्रात सगळीकडे हे तण उगवते.  
  • वनस्पतीचे वर्णन 
  •    टाकळ्याचे खोड गोलाकार असून त्याच्या खालीपासूनच अनेक लहान मोठ्या फांद्या येतात. पाने संयुक्त, एका आड एक, ७ ते ९ सें.मी. लांब. लांबट-गोल पर्णिकाच्या ३ जोड्या असून खालची जोडी सर्वात लहान तर वरची जोडी मोठी असते.
  •    टाकळ्याची पाने रात्री मिटतात. फुले पिवळी, अनियमित, द्विलिंगी, पानाच्या बेचक्यातून जोडीने येणारी असतात.
  •    टाकळ्याला १० ते १५ सें.मी. लांब शेंगा येतात. त्यात तपकिरी रंगाच्या २० ते ३० बिया असतात. त्याचे टोक आडवे कापल्यासारखे असते.
  •    बिया चकाकणाऱ्या, कडक पण उग्र वास असणाऱ्या असतात.
  •    या वनस्पतीला उग्र वास येतो म्हणून जनावर खात नाही.
  •    फुले साधारण ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत येतात. तर सप्टेंबर-नोव्हेंबरपर्यंत शेंगा तयार होतात.  
  • औषधी गुणधर्म 

  • पाने, बिया औषधात वापरतात. त्वचारोग झालेल्यांना टाकळ्याची भाजी खाण्यास दिली जाते. बियांचा वाटून लेप लावला जातो. पूर्ण झाडाचा उपयोग सोरायसिस, खरूज यांसारख्या त्वचाविकारावर केला जातो. 
  • पानांचा काढा दात येण्याच्या वेळी मुलांना दिला जातो. लहान मुलांच्या पोटातील जंत बाहेर पडण्यासाठी ह्याची भाजी देतात. 
  •  टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने वात व कफदोषासाठी खाल्ली जाते.
  • टीप ः तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधी उपचार करातवेत.
  • पाककृती

    कोवळ्या पानांची भाजी  साहित्य  २-३ वाट्या कोवळी पाने, २-३ बारीक चिरलेले कांदे, २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ३-४ बारीक ठेचलेल्या लसूण पाकळ्या, फोडणीसाठी जिरे, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ. कृती   प्रथम कोवळी पाने चांगली निवडून स्वच्छ धुऊन बारीक कापून घ्यावीत. एका पातेल्यात पाणी गरम करून पाला वाफेवर शिजवून व थंड झाल्यावर पिळून घ्यावा. कढईत तेल गरम करून जिरे मोहरी व लसणाची फोडणी तयार करावी. नंतर कांदा तेलात चांगला परतवून त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व वरील भाजी टाकून चांगली वाफवून घ्यावी.   टीप ः  पावसाच्या पहिल्या सरीनंतर टाकळ्याची दोन-दोन पाने वर येताना दिसतात. तीच पाने भाजी करण्यासाठी योग्य असतात. टाकळ्याच्या बियांना भाजल्यानंतर कॉफीसारखा वास येतो म्हणून भविष्यात हा कॉफीला उत्तम पर्याय होऊ शकतो.

      इमेल -  ashwinichothe7@gmail.com (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com