agriculture news in Marathi, article regarding medical use of Cassia tora | Agrowon

त्वचारोगावर टाकळा उपयुक्त
अश्विनी चोथे
शनिवार, 6 जुलै 2019
 • स्थानिक नाव    :    टाकळा, तरोटा, तरवटा, तखटा, अटोरा
 •    शास्त्रीय नाव    :    Cassia tora L       
 •    इंग्रजी नाव    :    Foetid cassia, The Sickle Senna,
 •         Wild Senna       
 •    संस्कृत नाव    :    चक्रमर्दा, ददमरी, तागा         
 •    कूळ    :    Caesalpinaceae       
 •    उपयोगी भाग    :    कोवळी पान,        
 •    उपलब्धीचा काळ    :    मे -जून        
 •    झाडाचा प्रकार    :    झुडूप          
 •    अभिवृद्धी     :    बिया,          
 •    वापर    :    शिजवून भाजी

 

 • स्थानिक नाव    :    टाकळा, तरोटा, तरवटा, तखटा, अटोरा
 •    शास्त्रीय नाव    :    Cassia tora L       
 •    इंग्रजी नाव    :    Foetid cassia, The Sickle Senna,
 •         Wild Senna       
 •    संस्कृत नाव    :    चक्रमर्दा, ददमरी, तागा         
 •    कूळ    :    Caesalpinaceae       
 •    उपयोगी भाग    :    कोवळी पान,        
 •    उपलब्धीचा काळ    :    मे -जून        
 •    झाडाचा प्रकार    :    झुडूप          
 •    अभिवृद्धी     :    बिया,          
 •    वापर    :    शिजवून भाजी

 

आढळ 

 •  टाकळा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती ३० ते ६५ सें.मी. उंच वाढते. टाकळा हे तण असून ते  माळरानावर, रस्त्याच्या कडेला, शेतजमीन, परसबागेत तसेच पडीक जमिनीवर सर्वत्र वाढलेले दिसते. महाराष्ट्रात सगळीकडे हे तण उगवते.  
 • वनस्पतीचे वर्णन 
 •    टाकळ्याचे खोड गोलाकार असून त्याच्या खालीपासूनच अनेक लहान मोठ्या फांद्या येतात. पाने संयुक्त, एका आड एक, ७ ते ९ सें.मी. लांब. लांबट-गोल पर्णिकाच्या ३ जोड्या असून खालची जोडी सर्वात लहान तर वरची जोडी मोठी असते.
 •    टाकळ्याची पाने रात्री मिटतात. फुले पिवळी, अनियमित, द्विलिंगी, पानाच्या बेचक्यातून जोडीने येणारी असतात.
 •    टाकळ्याला १० ते १५ सें.मी. लांब शेंगा येतात. त्यात तपकिरी रंगाच्या २० ते ३० बिया असतात. त्याचे टोक आडवे कापल्यासारखे असते.
 •    बिया चकाकणाऱ्या, कडक पण उग्र वास असणाऱ्या असतात.
 •    या वनस्पतीला उग्र वास येतो म्हणून जनावर खात नाही.
 •    फुले साधारण ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत येतात. तर सप्टेंबर-नोव्हेंबरपर्यंत शेंगा तयार होतात.  

 

औषधी गुणधर्म 

 • पाने, बिया औषधात वापरतात. त्वचारोग झालेल्यांना टाकळ्याची भाजी खाण्यास दिली जाते. बियांचा वाटून लेप लावला जातो. पूर्ण झाडाचा उपयोग सोरायसिस, खरूज यांसारख्या त्वचाविकारावर केला जातो. 
 • पानांचा काढा दात येण्याच्या वेळी मुलांना दिला जातो. लहान मुलांच्या पोटातील जंत बाहेर पडण्यासाठी ह्याची भाजी देतात. 
 •  टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने वात व कफदोषासाठी खाल्ली जाते.
 • टीप ः तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधी उपचार करातवेत.

पाककृती

कोवळ्या पानांची भाजी 
साहित्य  २-३ वाट्या कोवळी पाने, २-३ बारीक चिरलेले कांदे, २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ३-४ बारीक ठेचलेल्या लसूण पाकळ्या, फोडणीसाठी जिरे, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ.
कृती  प्रथम कोवळी पाने चांगली निवडून स्वच्छ धुऊन बारीक कापून घ्यावीत. एका पातेल्यात पाणी गरम करून पाला वाफेवर शिजवून व थंड झाल्यावर पिळून घ्यावा. कढईत तेल गरम करून जिरे मोहरी व लसणाची फोडणी तयार करावी. नंतर कांदा तेलात चांगला परतवून त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व वरील भाजी टाकून चांगली वाफवून घ्यावी.  
टीप ः  पावसाच्या पहिल्या सरीनंतर टाकळ्याची दोन-दोन पाने वर येताना दिसतात. तीच पाने भाजी करण्यासाठी योग्य असतात. टाकळ्याच्या बियांना भाजल्यानंतर कॉफीसारखा वास येतो म्हणून भविष्यात हा कॉफीला उत्तम पर्याय होऊ शकतो.

 
इमेल -  ashwinichothe7@gmail.com
(क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

 

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर औषधी वनस्पती
पोटशूळ, इसब आजारांवर उपयुक्त काटेमाठ  स्थानिक नाव    : काटेमाठ...
दमा, खोकल्यावर गुणकारी घोळ स्थानिक नाव    :   ...
बहुगुणी तेलबिया पीक लक्ष्मीतरूलक्ष्मीतरू (शास्त्रीय नाव - Simarouba glauca...
त्वचारोगावर टाकळा उपयुक्त स्थानिक नाव    :  ...
अशक्तपणावर उपयुक्त हुम्भ स्थानिक नाव    :   ...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
आरोग्यदायी पुदिनापुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून,...
अशी करा अडुळसा लागवडअडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर...
अशी करतात गवती चहाची लागवड गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी...
अपचन, त्वचारोगावर उपयुक्त मोखा स्थानिक नाव     ः मोखा, मोकडी,...
औषधी, अन्न प्रक्रियेसाठी पुदिना उपयुक्तपुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, पाचक...
जुलाब, हगवणीवर टेंभुरणी उपयुक्तटेंभुरणीचे झाड शेताच्या बांधावर तसेच माळरानावर...
अशक्तपणा, त्वचा रोगावर उंबर उपयुक्त स्थानिक नाव    : उंबर, औदुंबर...
पोटदुखीवर गुणकारी वाघेटीवाघेटीच्या काटेरी वेली जंगलात डोंगरकपारीला मोठ्या...
औषधी करटोली१. शास्त्रीय नाव :- Momordica dioica Roxb.ex....
कोवळी भाजी- एक पौष्टिक रानभाजीशास्त्रीय नाव : Chlorophytum borivilianum...
कोरफड, वाळा लागवडीविषयी माहिती द्यावी.स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा...