agriculture news in Marathi article regarding medicinal use of Pavetta indica | Agrowon

पोटदुखीवर नाडुकली उपयुक्त

अश्विनी चोथे
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019
 • स्थानिक नाव     ः     नाडुकली, नेडुकली, पापट
 • शास्त्रीय नाव     ः     Pavetta indica L.   
 • कूळ     ः     Rubiaceae 
 • इंग्रजी नाव     ः     Indian Pavetta,      Indian Pellet Shrub 
 • संस्कृत नाव     ः     काकचडी        
 • उपयोगी भाग     ः     पांढरी फुले         
 • उपलब्धीचा काळ (फुले)     ः     मार्च-मे       
 •  झाडाचा प्रकार     ः     झुडूप 
 •   अभिवृद्धी     ः     बिया, शाकीय वाढ    
 •  वापर     ः     फुलांची भाजी  

 

आढळ 

 • स्थानिक नाव     ः     नाडुकली, नेडुकली, पापट
 • शास्त्रीय नाव     ः     Pavetta indica L.   
 • कूळ     ः     Rubiaceae 
 • इंग्रजी नाव     ः     Indian Pavetta,      Indian Pellet Shrub 
 • संस्कृत नाव     ः     काकचडी        
 • उपयोगी भाग     ः     पांढरी फुले         
 • उपलब्धीचा काळ (फुले)     ः     मार्च-मे       
 •  झाडाचा प्रकार     ः     झुडूप 
 •   अभिवृद्धी     ः     बिया, शाकीय वाढ    
 •  वापर     ः     फुलांची भाजी  

 

आढळ 

 • कोकण तसेच पश्चिम घाटातील जंगलात आणि डोंगरकपारीला आढळते.
 • कोकणातील जंगलात ओलसर ठिकाणी तसेच नदीकिनारी याचे झुडूप चांगले वाढते. 

वनस्पतीची ओळख 

 • झुडूपवर्गीय वनस्पती असून साधारण २ ते ४ मीटर किंवा त्यापेक्षाही जास्त वाढते. 
 • साल मऊ, करड्या रंगाची असून तिला अनेक लहान मोठ्या फांद्या असतात. जुन्या फांद्यांच्या सालीच्या खपल्या निघतात.
 • पाने साधी, एका आड एक येणारी, गडद हिरव्या रंगाची, लांबट आकाराची असून देठाला आणि टोकाला निमुळती होत गेलेली असतात. 
 •    पाने ६ ते १५ सेंमी लांब व ४ ते ५ सेंमी रुंद, चकाकणारी असून देठ ०.६ ते १.५ सेंमी लांब असतात.
 • फुले पांढऱ्या रंगाची, अनेक, सुगंधी, फांदीच्या टोकाशी गुच्छात (५० ते ६० फुले) येतात. एक गुच्छ साधारण ६ ते १० सें.मी. लांब असतो.
 • फुलांचे बाह्यदल अतिशय लहान पण दातेरी असून फुलांची नळी साधारण १.५ सें.मी. लांब आणि पाकळीयुक्त असते. फुले सुवासिक असल्यामुळे अनेक फुलपाखरे, मधमाश्या त्यावर घोंघावत असतात.
 •  फळे लहान हिरव्या रंगाची असून गोल ६ मिमी व्यासाची व झुपक्यात येतात. फळे सुकल्यावर काळी पडतात.
 •  मार्च ते मेदरम्यान फुले येऊन जून जुलैमध्ये फळे तयार होतात. 

औषधी उपयोग 

 •    साल तसेच पाने औषधात वापरतात.
 •    लहान मुलांच्या पोटातील घाण साफ करण्यासाठी सालीचा काढा किंवा चूर्ण दिला जातो.
 •    पानांचा काढा मूळव्याधीपासून होणाऱ्या त्रासावर आराम पडण्यासाठी देतात. पानाचा शेक ही आराम पडण्यास मदत करतो. 

टीप ः तज्ज्ञांच्या सल्याने औषधोपचार करावेत.

पाककृती 

फुलांची भाजी 
साहित्य ः
४ ते ५ वाट्या नाडुकलीची फुले, २ बारीक चिरलेले कांदे, १ ते २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ४ ते ५ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, अर्धा चमचा हळद, १ ते दीड चमचा लाल मिरची पावडर, फोडणीसाठी जिरे, चिमूटभर हिंग, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ.

कृती ः 
प्रथम नाडुकलीची फुले मुख्य दांड्यापासून काढून स्वच्छ धुऊन घ्यावीत. एका पातेल्यात पाणी घालून फुले वाफवून व नंतर पिळून घ्यावी. कढईत तेल गरम करून जिरे मोहरी हिंगाची फोडणी तयार करावी. नंतर तेलामध्ये कांदा व लसूण चांगला परतवून घ्यावा. त्यात हिरव्या मिरच्या, हळद, लाल मिरची पावडर व  वाफवलेली फुले टाकून चांगले हलवून घ्यावे. झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवून चवीपुरते मीठ मिसळावे.

- ashwinichothe7@gmail.com,
(क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर औषधी वनस्पती
जाणून घ्या बहुगुणी पळसाबद्दल..!शास्त्रीय नावः ब्युटीया मोनोस्पर्मा वनस्पतीचे...
तापावर गुणकारी गुळवेलजळजळ होणे, बारीक ताप येणे, उष्णता वाढणे या...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...
..अशी करा अश्‍वगंधाची लागवडअश्‍वगंधाची लागवड खरीप हंगामात करावी. लागवडीसाठी...
पोटदुखीवर नाडुकली उपयुक्त स्थानिक नाव     ः  ...
त्वचारोग, मधुमेह, संधिवातावर बोंडारा... स्थानिक नाव ः बोंडारा     ...
सूज, अतिसारावर मायाळू उपयोगी स्थानिक नाव    : मायाळू, भजीचा वेल...
पोटशूळ, इसब आजारांवर उपयुक्त काटेमाठ  स्थानिक नाव    : काटेमाठ...
दमा, खोकल्यावर गुणकारी घोळ स्थानिक नाव    :   ...
बहुगुणी तेलबिया पीक लक्ष्मीतरूलक्ष्मीतरू (शास्त्रीय नाव - Simarouba glauca...
त्वचारोगावर टाकळा उपयुक्त स्थानिक नाव    :  ...
अशक्तपणावर उपयुक्त हुम्भ स्थानिक नाव    :   ...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
आरोग्यदायी पुदिनापुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून,...
अशी करा अडुळसा लागवडअडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर...
अशी करतात गवती चहाची लागवड गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी...
अपचन, त्वचारोगावर उपयुक्त मोखा स्थानिक नाव     ः मोखा, मोकडी,...
औषधी, अन्न प्रक्रियेसाठी पुदिना उपयुक्तपुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, पाचक...