agriculture news in Marathi, article regarding poisonous effect of lantana camara in animals | Page 2 ||| Agrowon

जनावरांना होते घाणेरीची विषबाधा

डॉ. रवींद्र जाधव
बुधवार, 31 जुलै 2019

मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती खाण्यामध्ये आल्यास विषबाधेमुळे बाधित जनावरांमध्ये यकृतबाधा, कावीळ आजार निर्माण होतो. विशेषतः शेळ्या व मेंढ्यांच्या कळपामध्ये या विषबाधेची तीव्रता जास्त असते. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने औषधोपचार करून बाधित जनावरे सावलीमध्ये ठेवावीत.

मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती खाण्यामध्ये आल्यास विषबाधेमुळे बाधित जनावरांमध्ये यकृतबाधा, कावीळ आजार निर्माण होतो. विशेषतः शेळ्या व मेंढ्यांच्या कळपामध्ये या विषबाधेची तीव्रता जास्त असते. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने औषधोपचार करून बाधित जनावरे सावलीमध्ये ठेवावीत.

पावसाळी हंगामात गवत व काही वनस्पतींची वाढ ही खूप मोठ्या प्रमाणात होत असते. चराऊ क्षेत्रामध्ये काही विषारी वनस्पती मोठ्या जोमाने वाढतात. यामध्ये घाणेरी, गुणगुणी किंवा बीर या नावांनी ओळखली जाणारी विषारी वनस्पती प्रामुख्याने चराऊ कुरणांमध्ये आढळून येते. ग्रामीण भागामध्ये सर्रासपणे शेळ्या,मेंढ्या व काही प्रमाणात गायी,म्हशी या रानात चारावयास नेतात. अजाणतेपणे जर जनावरांच्या आहारात अशा विषारी वनस्पती आल्या तर विषबाधा होण्याची शक्यता असते.

 •     शेळ्या व मेंढ्या चरताना रानामध्ये उपलब्ध गवत व वनस्पती यांमधून निवडक घटक आपल्या आहारात घेतात. या सवयीमुळे विषारी वनस्पतीपासून विषबाधा होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मरतुक होऊ शकते. 
 •     घाणेरी वनस्पती खाल्ल्यानंतर बाधित जनावरांमध्ये यकृतबाधा, कावीळ आजार निर्माण होतो.
 •     वनस्पतीतील लेंटाडीन नामक विषारी घटक रक्तामध्ये मिसळल्यानंतर असे जनावर सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आल्यास त्यास या विषबाधेची लागण होते. अशा जनावरांत दिसून येणाऱ्या विषबाधेस प्रकाशसंवेदनशीलता असे म्हणतात. या आजाराची लागण प्रामुख्याने दुष्काळ किंवा पावसाळ्याच्या सुरवातीस आढळून येते. विशेषतः शेळ्या व मेंढ्यांच्या कळपामध्ये या विषबाधेची तीव्रता जास्त असते. त्यातून आर्थिक नुकसान होते. 

 

प्रकाशसंवेदनशीलता आजाराची लक्षणे 

 • शेळ्या व मेंढ्या कळपाने चारावयास जात असल्याने घाणेरी वनस्पती खाण्यात आल्यास कळपामधील बऱ्याचशा जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येतात. 
 • विषबाधेमध्ये प्रामुख्याने जनावरांच्या त्वचेचा जो भाग सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात येतो त्या भागामध्ये सूज येते, जोराची खाज सुटणे. त्यामुळे जनावरे झाडाला किंवा भिंतीला शरीर घासतात.
 •   कान, डोळ्याच्या बाजूची कातडी, नाक व शेपटी या भागांमध्ये भरपूर सूज आलेली दिसून येते. 
 •   लघवी गडद पिवळ्या रंगाची होते तसेच डोळ्यातील श्लेष्मपटल त्वचा पिवळ्या रंगाची होते. श्लेष्मपटल त्वचा ही कावीळ आजारामुळे पिवळ्या रंगाची होते. 
 •   बाधित जनावरांत ताप यणे, पोटाची हालचाल मंदावते, खाणे पिणे मंदावणे किंवा बंद होते.
 •   शरीराची खाज शमविण्यासाठी जनावरे शरीराचा बाधित भाग भिंत किंवा झाडाचे खोड यावर वारंवार रगडतात. त्यामुळे घर्षण झालेल्या भागातील कातडी निघून जाते. 
 •    विषबधेची तीव्रता जास्त असल्यास बाधित जनावर दगावण्याची शक्यता असते. त्यातून पशुपालकाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
 •   पावसाळ्यादरम्यान घाणेरी वनस्पती खाण्यामुळे मेंढ्या व बैलवर्गीय जनावरांमध्ये प्रकाशसंवेदनशीलता आजाराची बाधा झाल्याचे नियमितपणे आढळून येते. 
   

उपचार आणि प्रतिबंध  

 •   चारावयास नेलेल्या जनावरांमध्ये प्रकाशसंवेदनशीलतेची लक्षणे दिसून आल्यास तत्काळ अशी जनावरे सूर्यप्रकाशापासून दूर दाट सावलीमध्ये ठेवावीत. त्यामुळे प्रकाशसंवेदनशीलतेमुळे निर्माण होणाऱ्या सूज येणे, खाज सुटणे अशा लक्षणांची तीव्रता कमी करता येऊ शकते. 
 •   पशुवैद्यकांच्या सल्ल्याने औषधोपचार करून बाधित जनावरे सावलीमध्ये ठेवावीत. योग्य उपचाराचा अवलंब केल्यास आजाराची तीव्रता कमी होऊन जनावरे लवकर बरी होण्यास मदत होते. 
 •   जनावरे चारावयास घेऊन जाणाऱ्या पशुपालकांनी चराऊ क्षेत्रात घाणेरी वनस्पती नसल्याची खात्री करावी. मगच जनावरे चरावयास सोडवीत. 
 •   कोणत्याही परिस्थितीत चरावयास गेलेल्या शेळ्या मेंढ्या किंवा मोठी जनावरे चरताना घाणेरी वनस्पती खाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 

  -  डॉ. रवींद्र जाधव, ९४०४२७३७४३  

  (पशुवैद्यक महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)


फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
स्वच्छ दूध उत्पादनासाठी उपयुक्त यंत्रणा...दुधामध्ये स्निग्धांश, प्रथिने, मेद, जीवनसत्त्वे...
अळिंबीचे विविध प्रकार जागतिक बाजारात सध्या विविध प्रकारच्या अळिंबी (...
शाश्‍वत भविष्यासाठी मृदा संवर्धनाकडे...मृदा दिन या संकल्पनेचे एक प्रमुख उद्‌गाते व...
गुणवंत मेंढी पैदाशीसाठी नर, मादीची निवडमेंढ्यांमध्ये निवड पद्धतीने करावयाच्या आनुवंशिक...
तंत्र दर्जेदार मुरघास निर्मितीचेमुरघास तयार करताना एकदल चारा आणि द्विदल चारा...
दूध संकलन केंद्रावर घ्यावयाची दक्षतादूध संकलन केंद्र स्वच्छ आणि हवेशीर असावे. जमिनीवर...
स्वच्छ, सुरक्षित दूध उत्पादनाचे तंत्रअसुरक्षित दुधापासून क्षय, विषमज्वर, अतिसार, कॉलरा...
औषधी अळिंबीचे आहारातील महत्त्वअळिंबीमध्ये मॉइश्‍चरायझिंग गुणधर्म असतात. हे...
शेळ्या, मेंढ्यांचे हिवाळ्यातील संगोपनशेळी-मेंढीची निवड करताना किंवा व्यवसाय सुरू...
जनावरांतील विषाणूजन्य आजार ः तिवातिवा आजार होण्याचे प्रमाण सुदृढ प्रकृतीच्या, अधिक...
कोणत्या गुणधर्माच्या पीकजातींची पैदास...एखाद्या पिकातील योग्य ते गुणधर्म पुढील पिढीमध्ये...
थंडीमध्ये द्या जनावरांना पोषक आहार हिवाळ्यात जनावरांना शारीरिक तापमान संतुलित...
लाळ्या खुरकूत नियंत्रणासाठी लसीकरण हाच...लाळ्या खुरकूत हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्याचा...
चिंचेपासून जॅम, जेली, स्क्वॅशमहाराष्ट्रात चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...
कासदाहाकडे नको दुर्लक्ष... कासदाहाचा प्रसार दूषित पाणी, दूषित उपकरणे तसेच...
जनावरांतील पोटाचे आजार कसे ओळखाल?जनावरांना रवंथ करण्यासाठी दिवसातून किमान ८-१०...
नवीन प्राणिजन्य आजार ः क्रिमियन काँगो...क्रिमियन काँगो हिमोरेजिक फीवर या आजाराचा प्रसार...
ओळख अळिंबी उत्पादनाची...अळिंबीची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक...
काळपुळी आजाराबाबत दक्ष राहा...साधारणपणे २ ते ३ तास आधी निरोगी दिसणाऱ्या...
दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रेगोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत...