जांभळापासून बनवा जॅम, जेली, टॉफी,पावडर

जांभळाचा जॅम
जांभळाचा जॅम

जॅम 

  •    परिपक्व जांभळाची फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुवावीत. फळापासून गर वेगळा करावा.
  •    जॅमकरिता गराच्या वजनाएवढी साखर आणि प्रतिकिलो १.५ ग्रॅम सायट्रीक अॅसिड मिसळून एकजीव मिश्रण करावे. मंद आचेवर शिजवावे.
  •    मिश्रणाचा ब्रिक्स ६८.५ अंश इतका झाल्यावर उष्णता देणे बंद करावे. 
  •    तयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरणीत गरम भरावा. बाटल्याची साठवणूक थंड कोरड्या जागी करावी.
  • जेली 

  •    जांभळाचा शुद्ध रस घ्यावा. रसाच्या वजनाएवढी साखर आणि प्रती किलो १.५ ग्रॅम सायट्रीक अॅसिड मिसळावे. 
  •    जेलीला घट्टपणा येण्याकरिता ४ ग्रॅम पेक्टीन (फूड ग्रेड) वापरावे, मंद आचेवर तापवावे.
  •    ६७.५ अंश ब्रिक्सचे प्रमाण झाल्यावर जेली तयार झाली असे समजावे आणि उष्णता देणे बंद करावे.
  •    तयार जेली निर्जंतुक बाटल्यात भरून आणि झाकण लावून हवाबंद करावे. 
  •    तयार बाटल्या थंड कोरड्या ठिकाणी साठवाव्यात.
  • टॉफी 

  •    गरापासून टॉफी तयार करता येते. टाँफीकरिता जांभळाच्या एक किलो गराकरिता १.५ किलो साखर आणि १२० ग्रॅम वनस्पती तूप घ्यावे. हे मिश्रण एकत्र करून मंद आचेवर शिजवावे. 
  •    मिश्रणाचा ब्रिक्स ७० अंश झाल्यावर त्यात ५ ग्रॅम मीठ मिसळावे. शिजवायची क्रिया सुरू ठेवून ८३ अंश ब्रिक्स होईपर्यंत ठेवावे.
  •    एका पसरट भांड्यातील मिश्रण थंड झाल्यावर योग्य त्या आकाराचे तुकडे करावेत. साधारणपणे ५५ ते ६० अंश सेल्सिअस तापमानास वाळवावे. थंड कोरड्या ठिकाणी साठवण करावी.
  • बियांपासून पावडर 

  •    गर काढल्यानंतर शिल्लक बिया स्वच्छ पाण्याने धुवून उन्हात वाळवाव्यात किंवा ट्रे ड्रायरमध्ये (५५ ते ६० अंश सेल्सिअस तापमानास १८ ते २० तास) वाळवाव्यात. 
  •    वाळलेल्या बिया पॅल्व्हरायझर किंवा ग्राईंडरमध्ये दळून भुकटी तयार करावी. 
  •    भुकटी गुणकारी असते. भुकटीचा वापर डायरीया, मधुमेह उपचार आणि जनावरांच्या खाद्यामध्ये केला जातो. 
  •  - एस. डी. कटके, ९९७०९९६२८२ (अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com