agriculture news in marathi article regarding quail raring | Agrowon

सुधारीत पद्धतीने लाव्ही पक्षीपालन

डॉ. एम.आर. वडे
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

जपानी लाव्ही पक्षांची खाद्याची गरज फार कमी असते. हा पक्षी ५ ते ६ आठवड्यात मांस विक्रीकरिता तयार होतो. लाव्ही पक्षाचे मांस पौष्टिक, चवदार असते. याचे मांस गुणवत्तेच्या बाबतीत ब्रॉयलर कोंबडीच्या मांसासारखेच आहे

जपानी लाव्ही पक्षांची खाद्याची गरज फार कमी असते. हा पक्षी ५ ते ६ आठवड्यात मांस विक्रीकरिता तयार होतो. लाव्ही पक्षाचे मांस पौष्टिक, चवदार असते. याचे मांस गुणवत्तेच्या बाबतीत ब्रॉयलर कोंबडीच्या मांसासारखेच आहे. या पक्षाच्या मांसामध्ये चरबी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असल्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना उपयुक्त ठरते.

अलिकडच्या काळात महाराष्ट्रात कुक्कुटपालनासोबत लाव्ही पक्षी पालनसुद्धा वाढताना दिसत आहे. लाव्ही पक्षाला हिंदीमध्ये ‘बटेर’ नावाने ओळखले जाते. भारतात या पक्षाच्या दोन प्रजाती आढळतात. जंगलातील (कोटरनिक्स कोरोमॅन्डेलिका) आणि तपकिरी रंगाचे जपानी लाव्ही पक्षी (कोटर्निक्स कोटर्निक्स जपोनिका).

जपानी लाव्ही पक्षी वजनाला २५० ग्रॅम आणि वर्षाला २८० पेक्षा जास्त अंडी देतात. जपानी लाव्ही पक्षाची वाढ व लैंगिक परिपक्वता जलद होते. या पक्षाच्या एका वर्षात ३ ते ४ पिढ्या तयार होतात. एक चौ.फूट जागेत ५ ते ६ पक्षी पाळता येतात.
जपानी लाव्ही पक्षांची खाद्याची गरज फार कमी असते. हा पक्षी ५ ते ६ आठवड्यात मांस विक्रीकरिता तयार होतो. लाव्ही पक्षाचे मांस पौष्टिक, चवदार असते. याचे मांस गुणवत्तेच्या बाबतीत ब्रॉयलर कोंबडीच्या मांसासारखेच आहे. या पक्षाच्या मांसामध्ये चरबी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असल्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना उपयुक्त ठरते.

भारतीय प्रजाती 
कॅरी उत्तम, कॅरी उज्ज्वल, कॅरी ब्राऊन, कॅरी सुनहरी, कॅरी श्‍वेता, कॅरी पर्ल आणि नंदनम.

निवारा

 • शेडची दिशा पूर्व-पश्चिम असावी.
 • शेड समुद्राच्या बाजूने, किनारपट्टीच्या भागात आणि डोंगराच्या वरच्या बाजूला किंवा डोंगराळ भागात नसावे.
 • पक्षांवर शेडच्या लांबीचा प्रभाव पडत नाही. मात्र, शेडची रुंदी ९ मीटरपेक्षा जास्त नसावी. सज्जा १.५ मीटर इतकी असावी.
 • बाजूच्या भिंतीची उंची जमिनीपासून २.५ ते ३.० मीटर असावी. शेडची मध्यम उंची ४ ते ५ मीटर असावी.

संगोपनातील महत्त्वाच्या बाबी
लाव्ही पक्ष्यांचे संगोपन गादी व पिंजरा अशा दोन पद्धतीने केले जाते.

गादी पद्धत

 • या पद्धतीमध्ये १ चौरस फूट जागेत किमान ५ प्रौढ लाव्ही पक्षी पाळले जाऊ शकतात. एका पक्षास पहिल्या तीन आठवड्यांकरिता १५० चौ.सेंमी व नंतरच्या सहा आठवड्याकरिता २००-२५० चौ.सेंमी एवढी जागा लागते.
 • या पद्धतीत तांदळाचे तूस, लाकडी भुसा, भुईमुगाची टरफले इत्यादींचा वापर केला जातो.
 • खाद्याच्या भांड्यांसाठी प्रतिपक्षी पहिल्या ३ आठवड्याकरिता २ सेंमी तर ४-६ आठवड्याकरिता २.५ सेंमी जागा द्यावी.
 • पिण्याच्या भांड्यासाठी पहिल्या ३ व नंतरच्या ६ आठवड्याकरिता अनुक्रमे १ व १.५ ते २ सेंमी एवढी जागा द्यावी.

गादीची निगा 

 • गादी नेहमी कोरडी राहील, याची काळजी घ्यावी. गादीची आर्द्रता २४ टक्के पेक्षा जास्त नसावी.
 • जास्त आर्द्रतेमुळे कोक्सिडीओसीस (रक्ती हगवण) या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्याकरिता दर तीन दिवसांनी गादीचे थर वर-खाली करावेत.
 • पाण्याची भांडी गळत नसल्याची खात्री करावी.

बॅटरी सिस्टम/पिंजरा पद्धत

 • या पद्धतीमध्ये प्रत्येक युनिट ६ फूट लांब व १ फूट रुंद असते.
 • पिंजऱ्याच्या तळाची विष्ठा काढण्यासाठी लाकडी किंवा लोखंडी ट्रे असणे आवश्‍यक आहे.
 • पिंजऱ्याच्या समोरील भागात नालीच्या आकाराची खाद्याची भांडी ठेवावीत. आणि मागील बाजूस पाण्याची भांडी लटकावीत.
 • व्यावसायिकदृष्ट्या एका पिंजऱ्यामध्ये १०-१२ पक्षी ठेवता येतात.
 • एक ते दोन आठवड्याच्या १०० पक्षांसाठी ३×२.५×१.५ फुटांचा पिंजरा पुरेसा आहे. तर ३ ते ५ आठवड्याच्या ५० पक्षांसाठी ४ ×२.५×१.५ फुटांचा पिंजरा आवश्‍यक आहे.

ब्रूडींग व्यवस्थापन 

 • एक दिवस वयाच्या लाव्ही पक्षांच्या पिल्लांचे वजन ६-७ ग्रॅम असते. ब्रूडींग काळात लहान पिल्लांच्या मरतुकीचे प्रमाण जास्त असते. मात्र, ३ आठवड्यांपर्यंत पिल्ले बॅटरी ब्रूडरमध्ये वाढवल्यास सुरुवातीला होणारी मरतूक कमी केली जाऊ शकते.
 • गादी पद्धतीमध्ये प्रति पक्षी ७५ सेंमी आणि धावण्यासाठी ७५ सेंमी अशी १५० सेंमी अशी जागा दिली जाते.
 • या पक्षासाठी ब्रुडरचे शिफारशीत तापमान सुरुवातीस ३७ अंश सेल्सिअस आहे. पिल्ले ४ आठवड्यांची होईपर्यंत तापमान दर आठवड्याला २.७ अंश सेल्सिअसने कमी केले पाहिजे.
 • पाणी पिण्याच्या भांड्यात लहान पक्षी पडून मरण्याची शक्यता असते. पिल्ले बुडू नयेत यासाठी संगमरवरी, गुळगुळीत छोटे दगड किंवा गारगोटीने भरलेल्या उथळ भांड्यात पाणी ठेवावे.
 • पिल्ले २ आठवड्याची झाल्यानंतर त्यातील संगमरवरी किंवा खडे काढून टाकावेत.
 • खाद्य आणि पाणी पिण्याच्या भांड्याची जागा अनुक्रमे २ ते १ सेंमी प्रतिपक्षी असावी.

खाद्य व्यवस्थापन 

 • एक आठवडा वयाच्या पक्षास चांगले बारीक केलेले खाद्य द्यावे. जेणेकरून सहज सेवन करता येईल.
 • पहिल्या आठवड्याच्या लाव्ही पक्षाच्या एका पिल्लास दिवसाकाठी ५ ग्रॅम खाद्य लागते. ३०-४० दिवसांच्या एका पक्षास दररोज २५ ते ३० ग्रॅम खाद्य लागते.
 • विक्रीसाठी ३५ दिवसांत मांसल लाव्ही पक्षी तयार होतात. त्यास एकूण ४०० ते ५०० ग्रॅम खाद्य लागते.

मांसल लाव्ही पक्षांसाठी पोषक मूल्य
 

पोषक तत्त्व स्टार्टर खाद्य (० ते ३ आठवडे) फिनिशर खाद्य (४ ते ६ आठवडे)
ऊर्जा (कि.कॅलरी/किलो) २७५० २७५०
प्रथिने (%) २७ २४
कॅल्शिअम (%) १.० ०.८
फॉस्फरस (%) ०.४५ ०.४५

 
रोगाचा प्रादुर्भाव

 • लाव्ही पक्षांची रोगप्रतिकार क्षमता मजबूत असते. त्यामुळे त्यांना कोणत्याही लसीची आवश्‍यकता नसते. कुक्कुटपालनामध्ये आढळणारे सामान्य आजार या पक्षामध्ये क्वचितच आढळतात.
 • या पक्षामध्ये अल्सरेटिव्ह एन्टरायटिस या आजार क्वचित येण्याची शक्यता असते. मात्र, पशुवैद्यकाच्या उपचाराने लवकर ठीक होतो.

कायदेशीर बाब

 • सन १९७२ पर्यंत जपानी लाव्ही पक्षी वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाअंतर्गत येत होते. पर्यावरण व वन मंत्रालय (भारत सरकार) यांच्या पत्र क्रमांक ३-२२/८४ एफआरवाय (डब्ल्यूएल) दि. २७/०६/१९९७ च्या पत्रानुसार जपानी लाव्ही पक्षी हॅचरीसाठी परवाना देण्याचा अधिकार केंद्र व राज्य शासनाच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या खालील पदाच्या अधिकाऱ्यास सदर परवाना देण्याचा अधिकारी नाही.
 • पर्यावरण आणि वन मंत्रालयाने त्यांच्या अधिसूचना एसओ ३६५३ (ई) आणि ६ डिसेंबर, २०१३ रोजीच्या एफ. नं .१-१५/ २०१३ डब्ल्यूएल या पत्रानुसार जपानी लाव्ही पक्षी वन्यजीव अधिनियमातून हटवण्यात आले आहेत. इतर कुक्कुटपक्षाप्रमाणे लाव्ही पक्षाचे पालन करू शकतो. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून परवाना घेण्यात यावा.

संपर्क- डॉ. एम.आर. वडे, ८६००६२६४००
(सहाय्यक प्राध्यापक, कुक्कुट संशोधन केंद्र, कुक्कुटपालनशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)


इतर कृषिपूरक
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
डेहराडून येथील हिरेशा वर्मा अळिंबी...अळिंबी उत्पादनामुळे उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनसततच्या पावसाचा मोठ्या जनावरांना त्रास होत नसला,...
तेलबिया पिके अन् मधमाशीपालनामध्ये संधीसर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाश्‍या व त्याद्वारे...
कोंबडीखाद्यामधील मायकोटॉक्सिन्सवर...मायकोटोक्सिकोसिस हा एक रोग आहे. हा रोग...
मत्स्य संवर्धनामध्ये चांगली संधीमत्स्य संवर्धनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
वासरांसाठी योग्य प्रमाणात जंतनाशकाची...जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे  ...
शेळीपालनातील महत्त्वाची सुत्रेशेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय...
जनावरांतील कॅल्शिअम विषबाधेवर उपाययोजनासंकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले...
वासरांच्या आहारात काफ स्टार्टरचा वापरपशुपालकाला गोठ्यामध्ये जातिवंत वासरांची उत्तम...
शेळी व्यवस्थापनाच्या पद्धतीशेळी व्यवस्थापनामध्ये मुक्त व्यवस्थापन, बंदिस्त...
कांदळवन संवर्धनातून रोजगारनिर्मितीकांदळवन हे एक वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनाऱ्याजवळील...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
शेतीपूरक व्यवसाय : डंखविरहित मधमाशीपालनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती असून,...
मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्रशेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे...
कोंबड्यांना वेळेवर लसीकरण महत्त्वाचे...कोंबड्यांना आजार होऊ नये म्हणून लसीकरण करावे....
पशुपालन सल्लापावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
जंतनाशकाप्रती प्रतिकार तयार होण्याची...जनावरांच्यामध्ये जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...