डाळिंब फळबागेचे हंगामनिहाय नियोजन

तेलकट डागासाठी, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील किडींचा प्रादुर्भाव विचारात घेऊन योग्य त्या जिवाणूनाशक किंवा कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. नंतर प्रत्येक फळाला पॉलिप्रोपीलीन नॉन ओव्हन किंवा बटर पेपर बॅगने झाकावे.
fruit sucking moth
fruit sucking moth

तेलकट डागासाठी, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील किडींचा प्रादुर्भाव विचारात घेऊन योग्य त्या जिवाणूनाशक किंवा कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. नंतर प्रत्येक फळाला पॉलिप्रोपीलीन नॉन ओव्हन किंवा बटर पेपर बॅगने झाकावे. मृग बहर अन्नद्रव्य व्यवस्थापन पिकाची अवस्था- फळ वाढ आणि पक्वता

  • ००:५२:३४ (मोनो पोटॅशिअम फॉस्फेट) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे १५-२० दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या कराव्यात.
  • मॅंगनिज सल्फेट ६ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे १०-१५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. 
  • विद्राव्य एन.पी.के. ००:५२:३४ (मोनो पोटॅशियम फॉस्फेट) १२.८० किलो प्रति हेक्टर अधिक युरिया ३१.४० किलो प्रति हेक्टर अधिक ००:००:५० हे ११.५० किलो प्रति हेक्टर याप्रमाणे ७ दिवसांच्या अंतराने १० वेळा ड्रीपद्वारे द्यावे.
  • कीड व्यवस्थापन पिकाची अवस्था- फळ पक्वता

  • वसन वेल व गुळवेल शेताच्या बांधावरून काढून टाकावेत.
  • तेलकट डागासाठी, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील किडींचा प्रादुर्भाव विचारात घेऊन योग्य त्या जिवाणूनाशक किंवा कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. नंतर प्रत्येक फळाला पॉलिप्रोपीलीन नॉन ओव्हन किंवा बटर पेपर बॅगने झाकावे.
  • बॅग लावण्यास उशीर होत असेल तर नीम तेल १ टक्का (ॲझाडिरेक्टीन १० हजार पी.पी.एम.) ३ मिली प्रति लिटर अधिक फिश ऑइल रेझिन सोप अर्धा ते एक मिलि प्रति लिटर प्रमाणे बांधाकडील झाडांवर फवारावे.
  • फळ माशी : पिकात १२ मॅकफेल सापळे किंवा टोरूला इस्ट सापळे/ बॅक्ट्रोसेरा ल्युर पाण्याच्या सछिद्र रिकाम्या बंद बाटलीत टांगते ठेवावेत. त्याखाली प्लॅस्टिकच्या टोपलीत पाणी भरून ठेवावे. ल्युर प्रत्येक १५-२० दिवसाला बदलावेत. 
  • सदर्न स्टींक बग (अंडी अवस्था) नियंत्रणासाठी, नीम तेल १ टक्का (ॲझाडिरेक्टीन १०,००० पीपीएम) ३ मिलि अधिक करंज बियाचे तेल ३ मिलि प्रति लिटर अधिक स्टीकर ०.२५ मिलि प्रति लिटर याप्रमाणे मिसळून फवारणी करावी.
  • हस्त बहर अन्नद्रव्य व्यवस्थापन बागेची अवस्था – फुलधारणा आणि फलधारणा

  • नॅप्थलिन ॲसिटिक ॲसिड( ४.५%) हे २२.५ मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारावे.
  • सूक्ष्म अन्नद्रव्याचे मिश्रण १ ते १.५ किलो प्रति हेक्टर याप्रमाणे फवारावे.
  • नत्र : स्फुरद : पालाश ००:५२:३४ (मोनोपोटॅशिअम फॉस्फेट) ८.५ किलो प्रति हेक्टर याप्रमाणे ७ दिवसांच्या अंतराने ३ वेळा ड्रीपमधून द्यावे.
  • जिप्सम १.७० ते १.८० किलो प्रति झाड आणि मॅग्नेशिअम सल्फेट हे ७०० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणे जमिनीतून द्यावे व पाणी द्यावे. मॅग्नेशिअम सल्फेट ड्रीपद्वारे देखील देता येऊ शकते.
  • बागेची अवस्था – फलधारणा पूर्ण झाल्यानंतर

  • नत्र : स्फुरद : पालाश ००:५२:३४ (मोनोपोटॅशिअम फॉस्फेट) ८.५० किलो, युरिया २२.५० किलो आणि ००:००:५० (सल्फेट ऑफ पोटॅश) १६.३० किलो प्रति हेक्टर याप्रमाणे ७ दिवसांच्या अंतराने ५ वेळा ड्रिपद्वारे द्यावे.
  • सुक्ष्म अन्नद्रव्यांची १-१.५ किलो प्रति हे. याप्रमाणे फवारणी करावी.
  • जिबरेलिक आम्ल ५० पीपीएम मात्रेमध्ये १५ दिवसांच्या अंतराने २ वेळा फवारावे.
  • कीड व रोग व्यवस्थापन  (फूलधारणा/फलधारणा/फळ वाढीचा काळ)

  • फुलधारणा : नीम तेल (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) किंवा करंज बियांचे तेल ३ मिली प्रति लिटर  किंवा स्पिनेटोरम (१२% एससी) १ मिली किंवा स्पिनोसॅड (४५% एससी) ०.५ मिली अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. 
  • फळधारणा/फळवाढ : सायॲण्ट्रानिलीप्रोल किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५% एससी) किंवा टोलफेनपायरॅड (१५% एससी) किंवा फ्लोनिकॅसिड (५०% डब्लूजी) ०.७५ ते १ मिली प्रति लिटर अधिक स्टिकर स्प्रेडर ०.२५ मिली प्रति लिटर.
  • आंबिया बहर अन्नद्रव्य व्यवस्थापन बागेची अवस्था- ताण आणि विश्रांती अवस्था सुरू आहे.  कीड व रोग व्यवस्थापन- ताण आणि विश्रांती खोड किडा, पिन होल बोरर, वाळवी आणि पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. प्रादुर्भावानुसार १५-२० च्या अंतराने योग्य कीटकनाशकाची फवारणी करावी. सूत्रकृमी प्रादुर्भावित बाग : 

  •  फ्लुएनसल्फोन (२% जीआर) ४० ग्रॅम प्रति झाड बागेला पहिले पाणी देताना प्रत्येक ड्रीपरखाली ५-१० सेंमी खोलवर टाकावे, किंवा ४० ग्रॅम प्रति ४-५ लिटर पाण्यात विरघळून झाडाभोवती गोलाकार ड्रेचिंग करावे.
  • मॉन्सूनच्या शेवटी सर्व बहारातील झाडांना खालील प्रकारे पेस्ट तयार करून लावावी.
  • लाल माती ४ किलो अधिक क्लोरपायरीफॉस (२० टक्के ईसी) २० मिली अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम प्रति १० लिटर याप्रमाणे जमिनीपासून २-२.५ फुटापर्यंत पेस्ट लावावी.
  • अन्नद्रव्य...............पानांमधील त्यांचे आवश्यक प्रमाण  नत्र (%) ................१.३२-२.१५ स्फुरद (%) ............०.१८-०.२४ पालाश (%) ...........१.२९-१.९९ कॅल्शिअम (%).......०.६४-१.२० मॅग्नेशिअम (%).....०.२३-०.४५ टीप   वरील नत्र, स्फुरद, पालाशच्या शिफारशी पाने परीक्षण अहवालाच्या इष्टतम श्रेणीप्रमाणे आहेत. जर एखादा घटक इष्टतम श्रेणीपेक्षा कमी असल्यास, वरील शिफारस २५ टक्क्यांनी वाढविण्याचा सल्ला दिला जातो. सर्व बहरांतील रोगांच्या व्यवस्थापनासाठी तेलकट डागासाठी फळ पिकाच्या कालावधीत फवारणी (७ ते १० दिवसांच्या अंतराने)

  • बोर्डो मिश्रण (फक्त ०.५%, छाटणीनंतर १ टक्का वगळता)
  • त्यानंतर स्ट्रेप्टोमायसीन* (५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) किंवा 
  • २-ब्रोमो, २-नायट्रो प्रोपेन -१, ३-डायओल (ब्रोनोपोल) ५ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड २०-२५ ग्रॅम किंवा कॉपर हायड्रोक्साइड २०-२५ ग्रॅम प्रति १० लिटर अधिक स्प्रेडर स्टिकर (५मिलि प्रति १० लिटर )
  • फळबागेत असलेल्या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावानुसार कॉपर फॉर्मूलेशनवर आधारित बुरशीनाशकात योग्य बदल केले जाऊ शकतात.
  • सॅलिसीलिक ॲसिड ०.३ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे ४ फवारण्या करा.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या ४ फवारण्या करा.
  • तेलकट डाग रोगासाठी तातडीच्या फवारण्या  हिरव्या लिंबाच्या अवस्थेतील फळांवर दिसणारे तेलकट डागाच्या प्रादुर्भावानंतर लवकरच ४ दिवसांच्या अंतराने १-२ फवारण्या घ्या.

  • स्ट्रेप्टोमायसीन* ५ ग्रॅम अधिक ब्रोनोपोल ५ ग्रॅम अधिक कोसाइड २० ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ५ मिलि प्रति १० लिटर
  • स्ट्रेप्टोमायसीन ५ ग्रॅम अधिक ब्रोनोपोल ५ ग्रॅम अधिक कार्बेंडाझिम १० ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ५ मिलि प्रति १० लिटर पाणी.
  • विश्रांती कालावधीत १०-१५ दिवसांच्या अंतराने १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्यावी. 
  • किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कॉपर हायड्रोक्साइड २०-२५ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ५ मिलि प्रति  १० लिटर.
  • टीप 

  • वरीलपैकी कोणत्याही २ बुरशीनाशकाच्या फुलधारणा आणि फळधारणेच्या कालावधीत १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या केल्यास चांगला फायदा होतो. तसेच पुढील काळात अनेक फवारण्या टाळता येतात.
  • बोर्डो मिश्रण वगळता नेहमीच्या फवारणीमध्ये स्प्रेडर स्टीकरचा वापर करावा.
  • आवश्यकतेनुसारच फवारण्या कराव्यात. 
  • हंगामात कॉपरयुक्त बुरशीनाशकांशिवाय कोणत्याही कीटकनाशकाचा वापर २ पेक्षा जास्त वेळा करू नये.
  • संपर्क : दिनकर चौधरी, ०२१७-२३५००७४ (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com