agriculture news in Marathi, article regarding sugar beet cultivation and management . | Agrowon

दुष्काळी स्थितीत आश्‍वासक ठरणारे ‘शुगरबीट’

डॉ. मिलिंद जोशी
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

सध्याच्या दुष्काळी स्थितीत वा बदलत्या हवामानात शर्कराकंद (शुगरबीट) हे पीक शेतकऱ्यांसाठी आश्‍वासक ठरणारे आहे. कमी पर्जन्यमानात ते चांगले उत्पादनक्षम आहे. त्यावर किडी- रोगांचा प्रादुर्भावही तुलनेने कमी असतो. कमी उत्पादन खर्चात हे पीक चांगले उत्पन्न व त्याचबरोबर चाराही देणारे आहे.  

भारतात १९६० च्या दशकात शुगरबीट पिकाची 
 लागवड झाली. केंद्रिय ऊस संशोधन केंद्र, लखनौ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे व विभागीय ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव या संस्था  शुगरबीटवर संशोधन करीत आहेत. देशात पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये लागवड केली जाते.

सध्याच्या दुष्काळी स्थितीत वा बदलत्या हवामानात शर्कराकंद (शुगरबीट) हे पीक शेतकऱ्यांसाठी आश्‍वासक ठरणारे आहे. कमी पर्जन्यमानात ते चांगले उत्पादनक्षम आहे. त्यावर किडी- रोगांचा प्रादुर्भावही तुलनेने कमी असतो. कमी उत्पादन खर्चात हे पीक चांगले उत्पन्न व त्याचबरोबर चाराही देणारे आहे.  

भारतात १९६० च्या दशकात शुगरबीट पिकाची 
 लागवड झाली. केंद्रिय ऊस संशोधन केंद्र, लखनौ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे व विभागीय ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव या संस्था  शुगरबीटवर संशोधन करीत आहेत. देशात पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये लागवड केली जाते.

सध्याच्या काळात होऊ शकते पर्यायी पीक 

 •  सध्याच्या बदलत्या हवामानात हे पीक शेतकऱ्यांसाठी आश्‍वासक ठरू शकते. त्याची कारणे पुढीलप्रमाणे. 
 •  कमी पाण्यात वा पर्जन्यमानात चांगले उत्पादन (साधारण एकरी ३५ ते ४० टन) 
 •  कीड व रोगांचा प्रादुर्भाव अन्य पिकांच्या तुलनेत कमी.
 •  पिकातील साखरेचे प्रमाण जवळपास १२ ते १५ टक्के .
 •  चोपण वा क्षारपड जमिनींमध्ये उत्कृष्ट उत्पादन 
 •  जमिनीतील क्षार व अन्य हानीकारक घटक शोषून घेऊन जमीन सुपीक बनवते.
 •  साखर, इथेनॉल व पशुखाद्य निर्मिती 
 •  दुभत्या जनावरांना खाद्य म्हणून दिल्यास साधारणपणे अर्धा लिटर प्रति दिन प्रति गाय उत्पादन वाढू शकते. 
 •  दुधाच्या गुणवत्तेत सुधारणा.
 •  पीक कालावधी सुमारे ४ ते ५ महिने 

लागवड तंत्रज्ञान 

 •  भारतात शुगरबीटची लागवड साधारणपणे ऑक्टोंबर व नोव्हेंबरमध्ये केली जाते. त्यासाठी पाण्याचा निचरा होणारी वाळूमिश्रीत जमीन योग्य असते.
 •  लागवडीचे अंतर ४० बाय १५ सेंटिमीटर ठेवावे. बऱ्याचदा ५० बाय १६ सेंटिमीटर, ५० बाय २० सेंमी,
 •  ४० बाय २० सेंमी. या पद्धतीनेही लागवड करतात. बी दोन सेंटिमीटर खोल टोकावे.
 •  एकरी साधारणपणे ४० हजार ते ४५ हजार बी लागते.
 • हवामान
 •  प्रखर सूर्यप्रकाश गरजेचा. साधारणपणे उगवणीसाठी २० ते २५ अंश सेल्सियस, वाढीसाठी ३० ते ३५ अंश तर साखर उत्पादनासाठी २५ ते ३५ अंश सेल्सियस तापमान पोषक असते.

सुधारित वाण
 भारतात विविध कंपन्यांचे विविध वाण उपलब्ध आहेत. तसेच इराण व युरोपातील काही कंपन्यांचे वाणही भारतात उपलब्ध आहेत. 

खत व्यवस्थापन 
पुढीलप्रमाणे एकरी खत व्यवस्थापन करावे. 

 • शेणखत    ५ टन- लागवडीपूर्वी
 • नत्र        ३० किलो
 • स्फुरद    ३० किलो
 • पालाश    ३० किलो

(नत्र, स्फुरद, पालाश एकरी ३० किलो लागवडीनंतर 
२५ व ५० दिवसांनी दोन वेळा द्यावे)
तसेच गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. 

पाणी व्यवस्थापन
 पिकाला पाणी खूप कमी लागते. पाणी जास्त झाल्यास पिकाची वाढ खुंटते व कंद कुजतात. लागवडीपूर्वी वाफसा आल्यावर, उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी गरजेनुसार पाणी द्यावे.

 तणनियंत्रण 
 लागवडीपासून ७५ दिवसांपर्यंत पीक तणमुक्त ठेवणे गरजेचे आहे. तणनाशकाचा वापर करू नये.

कीड-रोग नियंत्रण व्यवस्थापन 
 पिकावर तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिट्युरा) या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. शिवाय मावा, तुडतुडे, फुलकिडे आदी रसशोषक किडीही आढळतात. सध्या मक्यावर आढळणारी अमेरिकन लष्करी अळी या पिकाचेही नुकसान करू शकते. त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. या पिकावर मर, कंदकुज, मूळकुज, बुरशीजन्य ठिपके आदी रोगांचाही प्रादुर्भाव आढळतो.

काढणी 

 •  काढणीआधी २० ते २५ दिवस पाणी बंद करावे.
 •  काढणी यंत्राने किंवा मजुरांद्वारे करावी.
 •  काढणीनंतर बीट सावलीत ठेवावे.
 •  काढणीनंतर २४ तासांत त्यांचा वापर करावा.

उत्पादन व उत्पन्न 

 •  एकरी ३० ते ३५ टन उत्पादन (सुमारे साडेचार ते पाच महिन्यांत) (कमाल ४० टनही मिळू शकते.)
 •  उत्पादन खर्च - सुमारे २२ हजार रुपये. 
 •  उत्पादन - साधारण एकरी ३० टन
 •  उत्पन्न - ६० हजार रुपये. 
 •  दोन हजार रुपये प्रति टन दराने होऊ शकते खरेदी.

दुष्काळी स्थितीत होऊ शकतो पर्याय  
बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार म्हणतात, की सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यावर येणारे, चांगले उत्पादन देणारे उत्तम पर्यायी पीक म्हणून शुगरबीट ठरू शकते. कमी कालावधीत, कमी उत्पादन खर्चात चांगले उत्पन्न या पिकाद्वारे मिळू शकते. हे पीक मुख्य किंवा आंतरपीक म्हणूनही घेता येते. जनावरांना उत्तम खाद्य मिळून दूध उत्पादन व गुणवत्ता वाढ होऊ शकते. वर्ष २०१७-१८ मध्ये आम्ही युरोपात जाऊन या पिकाचा अभ्यास केला. तेथील वातावरण, परिस्थिती पाहून आपल्याकडे कोणते वाण योग्य ठरतील याचा अभ्यास केला. त्यादृष्टीने बारामती कृषी विज्ञान केंद्रामार्फत (केव्हीके) बेल्जियम व इराण येथील एकूण १७ वाणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील दोन वाण उत्कृष्ट ठरले. सन २०१८-१९ च्या हंगामात बारामती परिसरातील क्षारयुक्त जमिनीमध्ये निवड केलेल्या दोन वाणांची लागवड शेतकऱ्यांकडे केली. त्याचे एकूण क्षेत्र सुमारे ६० एकर होते. यामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेट आयोजित करण्यात आली. त्यांना तज्ज्ञांमार्फत वेळोवेळी थेट शेतावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यातून जमीन सुधारण्याबरोबर त्यांना चांगला आर्थिक फायदाही झाला. या वर्षी जवळपास ३०० एकर क्षेत्रावर शुगरबीट लागवडीचे नियोजन आहे.

शर्कराकंदाची (शुगरबीट) ओळख

 •  कित्येक दशकांपासून समशीतोष्ण देशांत साखर उत्पादन घेण्यासाठी शुगरबीटची लागवड केली जाते.
 •  हे उष्णकटीबंधीय, द्विवार्षिक साखर उत्पादन देणारे कंदवर्गीय पीक आहे.
 •  जगातील एकूण साखर उत्पादनापैकी ३० टक्के उत्पादन या पिकापासून मिळते.
 •  अमेरिका, बेल्जियम, फ्रान्स, स्पेन व अन्य देशांत या पिकाचे मोठे उत्पादन घेतले जाते.
 •  पिकापासून साखरेबरोबरच इथेनॉल, हिरवा चारा, पल्प व चोथा मिळतो. उर्वरित भाग खत म्हणून वापरता येतो.

- डॉ. मिलिंद जोशी, ९९७५९३२७१७,

(पीक संरक्षण तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती,जि.पुणे) 


फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
माळशिरस, करमाळ्यात मक्याची ३० हजार...सोलापूर  ः अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती...
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊसरत्नागिरी : जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या...
चंद्रपूर कृषी विभाग देणार रानभाज्यांची...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर ः अळू, काटवल, सूरण, टरोटा...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवातकोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून...
असे होते ग्लायफोसेट तणनाशकाचे निसर्गात...केंद्र सरकारकडून नुकताच मसुदा आदेश प्रसिध्द...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यात पावसाच्या अंदाजानुसार ऑगस्ट...एकंदरीत या वर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात...