agriculture news in Marathi, article regarding sweet potato cultivation | Agrowon

रताळे लागवड
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

रताळे लागवडीसाठी साधारण उतार असलेली व उत्तम निचऱ्याची जमीन लागवडीसाठी निवडावी. उतारावरील वरकस जमिनीत हे पीक घेता येते. 

रताळे लागवडीसाठी साधारण उतार असलेली व उत्तम निचऱ्याची जमीन लागवडीसाठी निवडावी. उतारावरील वरकस जमिनीत हे पीक घेता येते. 

  • लागवडीकरिता जमीन १५ ते २५ सें. मी. खोलीपर्यंत नांगरून किंवा खोदून घ्यावी. ६० सें. मी. अंतरावर वरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करावेत. 
  • लागवडीसाठी कोकण अश्‍विनी, वर्षा किंवा श्रीवर्धनी या जातींचा वापर करावा. पावसाळी पिकाची लागवड जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण करावी. लागवडीसाठी वेलांच्या शेंड्याकडील व मधल्या भागातील बेणे निवडावे. बेण्याची लांबी २० ते ३० सें. मी. असावी व त्यावर तीन ते चार डोळे असावेत. एक गुंठा क्षेत्रासाठी वेलाचे ८०० तुकडे लागतात. 
  • लागवड करताना बेणे वरंब्यावर २५ सें. मी. अंतरावर लावावे. प्रत्येक ठिकाणी एक फाटा (बेणे) लावावे. बेण्याचा मधला भाग जमिनीत पुरावा व दोन्ही टोके उघडी ठेवावीत. बेण्याच्या मधल्या भागावरील दोन डोळे मातीत पुरले जातील अशी काळजी घ्यावी. सऱ्या करण्यापूर्वी पुरेसे शेणखत मिसळावे, तसेच लागवडीच्या वेळी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ७५ किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावे. लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी ४० किलो नत्र प्रतिहेक्‍टरी द्यावे.      
  • लागवड केल्यानंतर १५ दिवसांनी पहिली बेणणी करावी. दुसरी बेणणी लागवड केल्यापासून ३० दिवसांनी करावी. त्याच वेळी वेलांना रासायनिक खतांचा दुसरा हप्ता देऊन भर द्यावी. जमिनीत टेकलेल्या वेलांच्या डोळ्यांतून मुळे फुटतात. अशा वेळी लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांच्या दरम्यान शेंड्याकडील भागाचा गुंडाळा करून ठेवल्यास मुळे फुटत नाहीत. लागवडीनंतर सुमारे साडेतीन ते चार महिन्यांनी पाने पिवळी पडू लागल्यानंतर रताळ्याची काढणी करावी. 

- ०२३८५-२८०२३८
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

 

टॅग्स

इतर प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची
रताळे लागवडरताळे लागवडीसाठी साधारण उतार असलेली व उत्तम...
शेवगा लागवड तंत्रज्ञानशेवगा लागवड हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे...
एरंडी लागवड तंत्रएरंडी लागवड हलक्‍या व मध्यम जमिनीवर जून ते...
फणस उत्पादनासाठी झाडाचे व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
नारळ बागेत मसाला पिकांची लागवड    नारळ बागेमध्ये नारळाच्या...
मोगरा लागवडमोगरा लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा...
ट्रायकोकार्ड, कामगंध सापळ्याचा कीड...कीड नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा वापर...
पानवेल, लवंग, जायफळ, काजू लागवड कशी...पानवेल लागवड कशी करावी? - व्ही. के. देवकर,...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
पानवेल लागवड पानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी जमीन...
नारळ जाती आणि लागवडीबाबत माहिती नारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत....
अशी करतात कणगर लागवडकणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व...
अशी करा ॲस्टर लागवड ॲस्टर लागवडीचे नियोजन करताना हंगाम, जातींची निवड...
अशी करा अडुळसा लागवडअडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर...
अशी करतात गवती चहाची लागवड गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
शेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...