काही भागांत ढगाळ हवामान; काही ठिकाणी पावसाचा अंदाज

हवामान सल्ला
हवामान सल्ला

महाराष्ट्राच्या मध्यावर १००४, उत्तर भागावर १००२ हवेचा दाब असल्यामुळे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रात तयार होत असून, उत्तरेकडील भागावर पावसाचा जोर अधिक तर मध्यापासून दक्षिण भागावर पावसाचा जोर कमी राहील. दिनांक २८ जुलै रोजी, तसेच २९ जुलै रोजी ती स्थिती कायम राहील, त्यामुळे पावसाचे प्रमाण २७ जुलै ते २९ जुलै या काळात महाराष्ट्रात चांगले राहील.

दिनांक ३० जुलै रोजी महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होईल. त्यामुळे ३० ते ३१ जुलै काळात पावसाचे प्रमाण कमी होईल. तीच स्थिती १ ऑगस्टपर्यंत राहील. दिनांक २ ऑगस्ट रोजी पुन्हा हवेचे दाब कमी होतील. पावसाचे प्रमाणात वाढ होईल. सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यांत काही दिवशी ४५ ते ५० मिलिमीटर तर रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवशी १०० मिलिमीटर पाऊस होऊन अतिवृष्टी होईल. उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात काही दिवशी ४५ मिलिमीटर तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत १५ मिलिमिटर पावसाची शक्‍यता आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात व परभणी जिल्ह्यात काही दिवशी ३० ते ३२ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित मराठवाड्यात १० ते २० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत काही दिवशी ३५ मिलिमीटर, पुणे व नगर जिल्ह्यांत काही दिवशी ४० ते ४५ मिलिमीटर तर सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत काही दिवशी ५० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. विदर्भातील नागपूर जिल्ह्यात काही दिवशी २५ मिलिमीटर तर वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत २० मिलिमीटर व उर्वरित विदर्भात ८ ते १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. 

 कोकण   ठाणे जिल्ह्यात काही दिवशी ४५ मिलिमिटर, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही दिवशी ५० मिलिमीटर व रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवशी आणि विशेषतः २७ व २८ जुलै रोजी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३० अंश व ठाणे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९६ ते ९७ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ९५ ते ९६ टक्के राहील. भातपिकास हवामान अनकूल राहील. 

  उत्तर महाराष्ट्र   नाशिक जिल्ह्यात काही दिवशी ४५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे, तर धुळे, जळगाव व नंदूरबार जिल्ह्यांत १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. नाशिक जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ९ किलोमीटर राहील तर उर्वरित जिल्ह्यांत तो १४ ते १७ किलोमीटर राहील. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर धुळे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. तसेच धुळे व जळगाव जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९६ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ८५ टक्के व उर्वरित जिल्ह्यांत ७२ ते ७६ टक्के राहील. 

 मराठवाडा  बीड व परभणी जिल्ह्यांत काही दिवशी ३० ते ३२ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, लातूर व नांदेड जिल्ह्यांत काही दिवशी २० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित काही जिल्ह्यांत १० ते १७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २३ ते २५ किलोमीटर राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १७ किलोमीटर राहील. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर हिंगोली, बीड व लातूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३३ अंश व परभणी जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, लातूर, बीड या जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील तर नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ९० टक्के राहील. 

 पश्‍चिम विदर्भ   बुलढाणा व अकोला जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण ८ ते १० मिलिमीटर राहील. अमरावती व वाशिम जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण १५ ते २० मिलिमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. बुलढाणा व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील तसेच अकोला व वाशीम जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस व अमरावती जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. वाशीम जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ टक्के राहील. बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के राहील. अमरावती जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ७४ टक्के राहील तर उर्वरित जिल्ह्यांत ती ६२ ते ६८ टक्के राहील. 

 मध्य विदर्भ   नागपूर जिल्ह्यात काही दिवशी २५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत ती १२ ते १५ मिलिमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस सर्वच जिल्ह्यांत राहील तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस सर्वच जिल्ह्यांत राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ किलोमीटर राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात ७५ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात ७९ टक्के तर वर्धा जिल्ह्यात ८० टक्के राहील. हवेत आर्द्रतेचे प्रमाण चांगले राहील.   पूर्व विदर्भ  चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांत काही दिवशी २० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, भंडारा जिल्ह्यात काही दिवशी १७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. भंडारा जिल्ह्यात व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील, तर चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ७० ते ७८ टक्के व भंडारा जिल्ह्यात ८४ टक्के राहील. पावसाचे प्रमाण मध्यम राहील. 

  दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र   कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत प्रतिदिनी काही दिवशी ५० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत काही दिवशी ३५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. तसेच नगर व पुणे जिल्ह्यांत काही दिवशी ४० ते ४५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. पुणे, नगर व कोल्हापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १४ किलोमीटर राहील. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३० ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित जिल्ह्यांत ते २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९७ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ८३ ते ८८ टक्के व कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ९० ते ९४ टक्के राहील. 

(ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com