agriculture news in Marathi, article regarding weather forecast | Agrowon

राज्यभरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

डॉ.रामचंद्र साबळे
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

महाराष्ट्रावरील हवेचे दाब पुन्हा कमी होत आहेत. उत्तरेस १००२ हेप्टापास्कल तर महाराष्ट्राचे मध्यावर १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे वारे मोठ्या प्रमाणात ढग लोटून आणतील, त्यामुळे सर्वच भागांत चांगल्या पावसाची शक्‍यता राहील.

महाराष्ट्रावरील हवेचे दाब पुन्हा कमी होत आहेत. उत्तरेस १००२ हेप्टापास्कल तर महाराष्ट्राचे मध्यावर १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे वारे मोठ्या प्रमाणात ढग लोटून आणतील, त्यामुळे सर्वच भागांत चांगल्या पावसाची शक्‍यता राहील.

दिनांक ५ ऑगस्टपर्यंत हीच स्थिती कायम राहील. ६ ऑगस्ट दरम्यान उत्तरेकडील भागावर जोरदार पावसाची शक्‍यता राहील व मध्य तसेच दक्षिण भागावर हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता राहील. तसेच ७ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह नाशिक व इतर भागांत अधिक पावसाचा जोर राहील. 
या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात ६६ मि.मी. अथवा त्याहून अधिक पाऊस राहील. मराठवाड्यात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाची तर विदर्भात काही दिवशी १५ ते २५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी ७१ मिलिमीटर सांगली, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात ३० ते ४५ मिलिमिटर व सोलापूर जिल्ह्यात हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे.

कोकण 
रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवशी ६६ मिलिमिटर पाऊस होईल आणि अतिवृष्टी होईल. तसेच सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत ५१ ते ५२ मिलिमीटर काही दिवशी पावसाची शक्‍यता असून, ठाणे जिल्ह्यात ४४ मिलिमिटर पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यांत २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. रायगड जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील तसेच सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. 

उत्तर महाराष्ट्र 
नाशिक जिल्ह्यात ३२ मि.मी. पावसाची शक्‍यता असून, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत १६ ते १८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १६ ते २५ किलोमीटर राहील. कमाल तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यांत २४ व २९ अंश सेल्सिअस प्रत्येकी राहील, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

मराठवाडा 
औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यांत काही दिवशी १० मिलिमिटर पावसाची शक्‍यता असून, उस्मानाबाद व जालना जिल्ह्यांत ८ ते ९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. परभणी व लातूर जिल्ह्यांत ३ ते ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील तर जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित जिल्ह्यांत ते ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील व उस्मानाबाद जिल्ह्यात ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील, तर लातूर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस आणि उर्वरित जिल्ह्यांत ते २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. 

पश्‍चिम विदर्भ
बुलढाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत १५ ते १८ मिलिमिटर पावसाची शक्‍यता असून, अमरावती जिल्ह्यात काही दिवशी ३० मिलिमिटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर अकोला व बुलढाणा जिल्ह्यांत ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. 

मध्य विदर्भ 
यवतमाळ जिल्ह्यात १५ मिलिमिटर तसेच वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २० मिलिमिटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १२ किलोमीटर राहील. कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळी सापेक्ष आर्द्रता वर्धा जिल्ह्यात ८१ टक्के तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ९० ते ९२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात ७५ टक्के व यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ८० ते ८९ टक्के राहील.

पूर्व विदर्भ 
गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २५ मिलिमिटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ते २९ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ९२ ते ९३ टक्के राहील, तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ९५ टक्के राहील. 

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र 
कोल्हापूर जिल्ह्यात ७१ मिलिमिटर पावसाची शक्‍यता असून, अतिवृष्टीची शक्‍यता आहे. सातारा, पुणे, नगर जिल्ह्यांत ४५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, सांगली जिल्ह्यात ३२ मिलिमिटर व सोलापूर जिल्ह्यात ९ मिलिमिटर पावसाची शक्‍यता आहे. सांगली व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील व सातारा जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. तसेच पुणे, सोलापूर जिल्ह्यांत ते ३१ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस सर्वच जिल्ह्यांत राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

 

कृषी सल्ला 

  •    भाताचे पीक फुटव्यांचे अवस्थेत असताना खाचरात २ ते ३ सें.मी. पाणीपातळी ठेवावी. मात्र, फुटव्यांची चांगली वाढ होताच पाणी पातळी वाढवून ५ सें.मी. ठेवावी.
  •    कोकण व कोल्हापूर जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्‍यता आहे ,तेथे शेतात साठलेल्या पाण्याचा निचरा करावा. जास्तीचे पाणी शेतात पाणी साचू देऊ नये.
  •    गोकूळ अष्टमीपूर्वी शेताची पूर्वमशागत करून गोकूळ अष्टमीनंतर रब्बी ज्वारीची पेरणी करावी.

 

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
दापोली कृषी विद्यापीठातर्फे बांधावर...रत्नागिरी ः दापोली कृषी विद्यापीठाच्या विस्तार...
अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या...अकोला ः जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ हजार क्विंटल...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात ३६ हजार...
मालेगाव बाजार समितीची मुख्यमंत्री...वाशीम ः कोरोनाविरुद्ध उपाययोजना करण्यास मदत...
भंडारा जिल्ह्यात ५० हजारांवर मजुरांना...भंडारा ः लॉकडाऊन काळात आर्थिक आधार म्हणून...
अकोल्यात अकरा कोटींच्या निविष्ठा...अकोला ः आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावर...
खानदेशातील टंचाईग्रस्त भागात बऱ्यापैकी...जळगाव : खानदेशात टंचाईच्या झळा बसणाऱ्या धुळ्यातील...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...जळगाव ः खरीप हंगाम तोंडावर आल्याने...
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
परभणीत सोयाबीन बियाण्यांचे नापासाच्या...परभणी  ः सोयाबीनमध्ये बियाणे नापासाचे प्रमाण...
अटीशर्तीविना मका खरेदी करा खासदार डॉ....नाशिक : केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी...
शेतकऱ्यांनो कृषी निविष्ठांची पावती...नांदेड : शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामासाठी खते,...
जालन्यात १२ हजारावर शेतकऱ्यांनी तपासली...जालना : कृषी विभागातर्फे जिल्ह्यात एकाच दिवशी...
नगर जिल्ह्यात ९३ टॅंकरव्दारे पाणीपुरवठानगर  ः नगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता...
नगर, पारनेर, नेवासेत कांदा लिलाव बंदचनगर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
नांदेड जिल्ह्यात ७० हजार क्विंटलवर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतंर्गंत...
अंबडमध्ये कापूस खरेदीसाठी दोन...अंबड, जि. जालना : येथील मे सुरज ॲग्रोटेकच्या...
सांगलीत साखरेचे उत्पादन १८ लाख...सांगली ः जिल्ह्यातील यंदा गाळप हंगाम नुकताच पंधरा...
कृषिमंत्री अकोल्यात उद्या घेणार खरीप...अकोला ः राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे बुधवारी (ता...