agriculture news in Marathi, article regarding weather forecast | Agrowon

कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता

डॉ.रामचंद्र साबळे
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील हवेचा दाब कमी होत असून, तो १००८ हेप्टापास्कल इतका तर महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहिल्यामुळे वारे ईशान्येकडून वाहतील. या आठवड्याच्या सुरवातीचे टप्प्यात कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ मि.मी. तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. मात्र, दिनांक १३ ऑक्‍टोबर रोजी महाराष्ट्रावर समान हवेचा दाब राहील. तसेच १४ ऑक्‍टोबर रोजी हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१२ हेप्टापास्कलपर्यंत वाढेल, त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईल.

महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील हवेचा दाब कमी होत असून, तो १००८ हेप्टापास्कल इतका तर महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहिल्यामुळे वारे ईशान्येकडून वाहतील. या आठवड्याच्या सुरवातीचे टप्प्यात कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ मि.मी. तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. मात्र, दिनांक १३ ऑक्‍टोबर रोजी महाराष्ट्रावर समान हवेचा दाब राहील. तसेच १४ ऑक्‍टोबर रोजी हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१२ हेप्टापास्कलपर्यंत वाढेल, त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईल.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात या आठवड्याच्या सुरवातीपासूनच बऱ्याचशा जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील. मात्र, पावसात या आठवड्याचे सुरवातीपासून ते मध्यंतरापर्यंत उघडीप राहणे शक्‍य आहे. मात्र, दिनांक १७ ऑक्‍टोबर ते १९ ऑक्‍टोबर या काळात संपूर्ण महाराष्ट्रात परतीचा मान्सून चांगला होईल अशी स्थिती आहे. त्यामुळे अद्याप जिथे अपुरा पाऊस झाला असेल तेथे १७ ते १९ ऑक्‍टोबर दरम्यान दमदार पावसाची शक्‍यता आहे. या पावसाचा उपयोग रब्बी पिकांना होईल. मात्र, या आठवड्यात कोकणात होणारा पाऊस हळव्या भाताच्या जाती काढणीस आलेल्या असल्यास तसेच देशावर काढणीस आलेले सोयाबीन व भाजीपाला पिकांना नुकसानकारक ठरू शकेल.

 कोकण 
 कोकणावरील हवेचे दाब कमी होत आहेत, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवशी ३५ मि.मी., रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३० मि.मी. तर ठाणे जिल्ह्यात काही दिवशी १० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ टक्के तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ७८ ते ८६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ७० टक्के राहील.

 उत्तर महाराष्ट्र 
 नाशिक जिल्ह्यात या आठवड्यात अत्यअल्प म्हणजे २ मि.मी. पावसाची शक्‍यता असून, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा नाशिक जिल्ह्यात पूर्वेकडून, नंदूरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांत अग्नेयेकडून राहण्यामुळे पावसाची शक्‍यता नाही. मात्र दि. १७ व १८ ऑक्‍टोबर रोजी जळगाव, धुळे जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता आहे. धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस तर नाशिक जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४८ टक्के राहील.

मराठवाडा 
 उस्मानाबाद, लातूर व नांदेड या जिल्ह्यांत आठवड्याच्या सुरवातीचे दोन दिवसांत २ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, उर्वरित बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता नाही. मात्र, दिनांक १७ ते १९ ऑक्‍टोबर या कालावधीत सर्वच जिल्ह्यांत चांगल्या पावसाची शक्‍यता आहे. नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत ताशी ४ ते ५ किलोमीटर, लातूर, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत ताशी ६ किलोमीटर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत ताशी ८ कि. राहील. नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर जिल्ह्यात ८२ टक्के व उर्वरीत सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांत ५५ ते ५८ टक्के राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ती ४४ ते ४६ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ 
पश्‍चिम विदर्भात सुरवातीचे काळात पावसाची शक्‍यता नाही. मात्र दिनांक १७ ते १९ ऑक्‍टोबर या कालावधीत पावसाची शक्‍यता आहे. बुलढाणा व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर अमरावती व अकोला जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. अकोला जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ टक्के तर उर्वरित जिल्ह्यांत ती ७० टक्के राहील. अकोला जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के व वाशीम जिल्ह्यात ६० टक्के आणि अमरावती व बुलढाणा जिल्ह्यांत ती ५५ टक्के राहील.

मध्य विदर्भ 
 मध्य विदर्भात आठवड्याचे सुरवातीचे काळात पावसाची शक्‍यता नाही. मात्र, दिनांक १७ ते १९ ऑक्‍टोबर या काळात चांगल्या पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ४ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस सर्वच जिल्ह्यांत राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६५ टक्के राहील.

पूर्व विदर्भ 
 चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत अल्प म्हणजे १ मिलिमिटर पावसाची शक्‍यता असून, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत आठवड्याचे सुरवातीचे काळात पावसाची शक्‍यता नाही. मात्र, दिनांक १७ ते १९ ऑक्‍टोबर या काळात चांगल्या पावसाची शक्‍यता आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील तर गोंदिया जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६२ टक्के राहील.

दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र 
 कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी ३५ मि.मी., सांगली जिल्ह्यात ३१ मि.मी., सातारा व सोलापूर जिल्ह्यांत २५ मिलिमीटर तर नगर जिल्ह्यात २ ते ५ मिलीमीटर आठवड्याचे सुरवातीचे दोन दिवसांत प्रतिदिनी पावसाची शक्‍यता असून, त्यानंतर उघडीप राहील. मात्र दिनांक १७ ते १९ ऑक्‍टोबर या कालावधीत जोरदार पावसाची शक्‍यता आहे. पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअश राहील. सांगली व नगर जिल्ह्यांत ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील दर सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २१ ते २५ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९३ टक्के तर दुपारची ५० ते ६७ टक्के राहील.

कृषी सल्ला 

  • मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांची काढणी तातडीने करावी. पुढील काळात पावसाची शक्यता आहे.   दिनांक १७ ते १९ ऑक्‍टोबर कालावधीत चांगल्या पावसाची शक्‍यता असल्याने जेथे अद्याप रब्बी पिकांच्या पेरण्या केल्या नसतील तेथे वाफसा येताच पेरणी करावी.  
  •  भाजीपाला व फुले काढणीस तयार असल्यास १४ ते १६ ऑक्‍टोबर या काळात काढणी करावी. 
     

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ., सदस्य,कृत्रिम पावसाचे प्रयोग सुकाणू समिती)


फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...
सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित...महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे...
माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लवकरच...पुणे  ः माथाडी आणि कामगार कायदा गुंतागुंतीचा...
नगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका ?नगर ः नगर, नाशिकसह राज्याच्या अनेक भागांत उशिरा...
धरण कालवा सल्लागार समितीची आज नगरला बैठकनगर  : मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या...
परभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूरपरभणी  ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...
सिंचन सुविधा बळकटीकरणावर भर देणार :...चंद्रपूर   ः ‘‘शेतकऱ्यांच्या जीवनात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत चार हजारांवर...नांदेड : किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत...
इराण–भारतादरम्यान कृषी उत्पादनांचा...मुंबई : महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक...
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे...कोल्हापूर  : या देशात राजे अनेक झाले, पण...
नाशिकच्या वैभवशाली इतिहासाला मिळणार...नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेस दीडशे वर्ष...
स्मार्टसिटी वादात शेतकऱ्यांवर अन्याय...नाशिक : नाशिक शिवारातील हनुमानवाडी व मखमलाबाद...
धुळे जिल्हा परिषदेत आता सभापती निवडीकडे...धुळे ः अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर जिल्हा...
सांगली जिल्ह्यात ९३८ कोटींची ऊसबिले थकीतसांगली ः जिल्ह्यातील बहुसंख्य साखर...
शेतमालाला मार्केटिंगची जोड दिल्याने...अकोला : जो शेतमाल पिकवला त्याची स्वतः विक्री...
पुण्यात कांदा, लसूण, बटाट्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात `कृषी, उद्योग, ऊर्जा’...पुणे : जिल्ह्याच्या २०२०-२१ च्या प्रारूप वार्षिक...
‘टेंभू’चे आवर्तन पुढील आठवड्यात...सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करा...
भंडारा : केवळ खरेदी केंद्रांवरच मिळतोय...भंडारा : महाविकास आघाडीकडून ५०० रुपयांचे बोनस आणि...
जळगाव जिल्ह्यात शासकीय धान्य खरेदीला...जळगाव : जिल्ह्यातील तीन केंद्रांमध्ये सोयाबीनची व...