agriculture news in Marathi, article regarding weather forecast | Agrowon

राज्यभरात पावसाची शक्‍यता

डॉ.रामचंद्र साबळे
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीलगत 
 हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, तेथे चक्राकार वारे वहात आहेत. अरबी समुद्रावर पश्‍चिम किनापट्टीलगत तयार झालेले वादळ अरबी समुद्रात पश्‍चिमेस जाईल. त्यामुळे या वादळाचा फटका कोकणास बसणार नाही.

महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीलगत 
 हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, तेथे चक्राकार वारे वहात आहेत. अरबी समुद्रावर पश्‍चिम किनापट्टीलगत तयार झालेले वादळ अरबी समुद्रात पश्‍चिमेस जाईल. त्यामुळे या वादळाचा फटका कोकणास बसणार नाही.

कोकण 
 कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवशी २४ मिलिमीटर तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत १० ते १२ मि.मी. तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यांत ८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. यावरून कोकणात पावसाचे प्रमाण कमी होत आहे असेच दिसून येते. प्रामुख्याने वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ किलोमीटर राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस राहील. मात्र, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९४ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६९ ते ८९ टक्के राहील.

 उत्तर महाराष्ट्र 
 उत्तर महाराष्ट्रात या आठवड्यात पावसात उघडीप राहील. किंबहुना उत्तर महाराष्ट्रात पाऊस थांबलेला असून, यापुढे पावसाची शक्‍यता नाही. धुळे व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तसेच नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ते ३१ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस तर नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८६ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ६० टक्के राहील.

 मराठवाडा 
 नांदेड व लातूर जिल्ह्यांत या आठवड्याचे सुरवातीचे काही दिवशी ६० ते ६८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. तसेच उस्मानाबाद, बीड व परभणी जिल्ह्यांत ११ ते १४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यात केवळ ४ मि.मी. पावसाची शक्‍यता असून, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता नाही. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान लातूर, बीड, परभणी जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. तसेच हिंगोली जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, जालना, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान १८ ते  २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९७ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८४ टक्के राहील.

 पश्‍चिम विदर्भ 
 बुलढाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्‍यता असून, २ ते ३ मि.मी. काही दिवशी पाऊस होईल. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ कि.मी. राहील. बुलढाणा जिल्ह्यात कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान २८ ते३० अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७४ टक्के राहील.

मध्य विदर्भ 
यवतमाळ जिल्ह्यात काही दिवशी पावसाची शक्‍यता आहे, तर नागपूर जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता असून, वर्ध्यात पावसात उघडीप राहील. यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९१ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७७ टक्के राहील.

पूर्व विदर्भ 
गडचिरोली जिल्ह्यात या आठवड्याचे सुरवातीस काही दिवशी २५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवशी १५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत काही दिवशी ८ ते १० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. तसेच किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९८ टक्के राहील. तसेच दुपारची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ८० टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र 
कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी ३५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे, तर सोलापूर जिल्ह्यात २२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. तसेच सांगली, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत काही दिवशी १२ ते १५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर कोल्हापूर, सातारा व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान १७ ते १९ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित जिल्ह्यांत किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ९० टक्के राहील.

कृषी सल्ला 

  • पावसात उघडीप होताच सोयाबीन व काढणीस आलेल्या भात पिकाची कापणी करून मळणी करून धान्य सुरक्षित स्थळी साठवावे. 
  • भुईमूग, सूर्यफूल पिकांची काढणी योग्यवेळी करावी. 
  • द्राक्ष तसेच अंजीरबागेत रोग नियंत्रणाचे उपाय अवलंबणे आवश्‍यक आहे. 
  • वापसा येताच जमिनीची पूर्वमशागत करून हरभरा व गव्हाची पेरणी सुरू करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, 
सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि सदस्य, कृत्रिम पावसाचे प्रयोग सुकाणू समिती)


फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात पुष्प प्रदर्शनास प्रारंभकोल्हापूर  : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर...
कळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती...नाशिक  : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी...
नुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान...
सटाणा शहरात कचऱ्यापासून होणार...नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत...
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज...पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कापूस...औरंगाबाद : आधी दुष्काळाचा ताण, त्यानंतर...
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या...पुणे ः जिल्ह्यात पुढील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२०...
काळ्या ज्वारीमुळे शासकीय खरेदीला ब्रेकअमरावती  ः अचलपूर खरेदी विक्री संघाला ज्वारी...
मराठवाड्यातील १४ लाख ५५ हजार हेक्‍टरवर...उस्मानाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १४ लाख...
अकोल्यात सोयाबीन पोचले ४१०० पर्यंतअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला...
माकडांच्या उच्छादामुळे बोराच्या बागेचे...मानोरा जि. वाशीम ः तालुक्यातील  कारखेडा...
वाळवा तालुक्‍यात द्राक्ष उलाढालीत सात...वाळवा, जि. सांगली : अतिवृष्टीने द्राक्षशेतीचे...
कोल्हापूर जिल्ह्यात बँकांना २५००...कोल्हापूर : ‘‘जिल्ह्यात सर्वच बॅंकांना २ हजार ४३०...
कांदा साठवणूक निर्बंधाचा फेरविचार करानाशिक : गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात...
नांदेड विभागातील १ लाख ८५ हजार टन उसाचे...नांदेड : चार जिल्ह्यांतील ८ कारखान्यांनी यंदाच्या...
चुकीच्या तापमान नोंदीमुळे रत्नागिरीतील...रत्नागिरी  : जिल्ह्यात आंबा, काजू पिकांसाठी...
जागते रहो... कांदाचोरांचा अजून सुळसुळाट...फलटण शहर, जि. सातारा   ः सध्या...
सांगली जिल्ह्यात हळद पिकावर कंदकुज,...सांगली  ः महापूर आणि अतिवृष्टीमुळे कंदकुज...
ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन करू...कोल्हापूर   ः दक्षिण महाराष्ट्रात ओला...
खानदेश, मराठवाडा, विदर्भातील काही...पुणे  ः राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान...