किमान तापमानात घट; विदर्भात थंडीत वाढ

weather report
weather report

महाराष्ट्रावरील हवेचा दाब वाढत आहे. या आठवडाच्या सुरुवातीस १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल. याचाच अर्थ असा की किमान व कमाल तापमानात घसरण होईल. किमान तापमान दररोज कमी नोंदवले जाईल. थंडी जाणवेल. २६ नोव्हेंबर रोजी पूर्व विदर्भावरील हवेचा दाब वाढेल आणि विदर्भात थंडीचे प्रमाण आणखी वाढेल. दिनांक २७ नोव्हेंबर रोजी पूर्ण विदर्भात व मराठवाड्याच्या पूर्वभागात थंडीमध्ये वाढ होईल.  उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राचा मध्य व उत्तर भाग, विदर्भामध्ये किमान तापमान घसरेल. थंडीत वाढ होईल. दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सह्याद्री घाटमाथा व त्यापुढील सर्व महाराष्ट्रातील उत्तर, मध्य, पूर्व भागावर १०१६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल. कोकण वगळता सर्व महाराष्ट्र थंडी वाढताना दिसेल. आकाश निरभ्र राहील. पावसाची शक्‍यता नाही.  कोकण  कोकणात कमाल तापमान रत्नागिरी जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस तर रायगड जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४६ टक्के राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.  उत्तर महाराष्ट्र धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, नाशिक व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३७ अंश सेल्सिअस राहील. पावसाची शक्‍यता नाही. या आठवड्यात थंडीत वाढ होईल. मराठवाडा परभणी, उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. तसेच नांदेड व औरंगाबादमधील कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. लातूर व बीड जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. मात्र, जालना जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. मात्र याच आठवड्यात किमान तापमानात आणखी घसरण होईल. लातूर व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. परभणी व जालना जिल्ह्यांत ते १७ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६५ टक्के राहील. तर बीड, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ५९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ३६ टक्के राहील.  पश्‍चिम विदर्भ  अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. तर बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ टक्के राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता अकोला जिल्ह्यात ६५ टक्के राहील. अमरावती जिल्ह्यात ५० टक्के आणि बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ४० टक्के राहील.  मध्य विदर्भ   वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ७० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ५० टक्के राहील.  पूर्व विदर्भ   चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. तर गोंदिया जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ७१ ते ७८ टक्के राहील. तर भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांत ५६ ते ६३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५० टक्के राहील.  दक्षिण- पश्‍चिम महाराष्ट्र    पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा  जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस, पुणे जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ७१ ते ७२ टक्के राहील. सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४५ टक्के राहील. 

कृषी सल्ला 

  • कोकणात जेथे पाण्याची सोय आहे तेथे रब्बी भुईमुगाची पेरणी करावी. कोकण गौरव जातीची निवड करावी. हेक्‍टरी ७० ते ८० किलो बियाणे वापरावे. 
  •  गव्हाची पेरणी करावी. हेक्‍टरी १०० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाणास अॅझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. आंतरपीक म्हणून मोहरी लागवड करावी. 
  •  जेथे दोन पाणी देणे शक्‍य आहे तेथे हरभरा पेरणी करावी. बियाणास रायझोबियम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,  सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि सदस्य, कृत्रिम पावसाचे प्रयोग सुकाणू समिती)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com