परतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण

साबळे सल्ला
साबळे सल्ला

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे पावसाच्या प्रमाणात घट होईल. तशीच स्थिती दोन दिवस राहील. मात्र, या काळात वाढीव हवेचे दाब उत्तरेकडील बाजूस सरकतील. महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब होईल तेव्हा पावसात उघडीप झालेली असेल.

दिनांक १९ सप्टेंबर रोजी उत्तरेकडील भागावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब कायम राहील. संपूर्ण उत्तर भारतातील हवेचे दाब वाढतील. राजस्थानमधील पाऊस थांबताच परतीच्या मॉन्सूनला हवामान अनुकूल बनेल. वारे दिशा बदलतील. दिनांक १७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या काळात महाराष्ट्रातील मध्य व उत्तरेकडील भागात पावसाची शक्‍यता राहील. मात्र, पावसाचे प्रमाण साधारणच राहील. त्यानंतर दक्षिणेकडून उत्तरेकडे हवेचे दाब वाढतच जातील. उत्तर भारतात पावसाचे प्रमाणे कमी होत जाऊन उत्तरेकडे हवेचे दाब मोठ्या प्रमाणावर वाढण्यासाठी आणि राजस्थानमधला पाऊस थांबण्यास या आठवड्यापासून सुरवात होऊन २० सप्टेंबरपर्यंत उत्तर भारतातील हवेचे दाब वाढून तसेच ईशान्य भारतावरील हवेचे दाब वाढून ईशान्य मॉन्सून सुरू होईल. भारताच्या ईशान्य व पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिण दिशेने वारे मोठ्या प्रमाणावर ढग लोटून आणतील. त्या वेळी परतीचा मॉन्सून सुरू होण्यास अनुकूल वातावरण होईल. कोकण  रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवशी १८ ते २२ मि.मी. तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत काही दिवशी ७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तसेच ठाणे जिल्ह्यात ते ३१ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात किमान तापमानात वाढ होऊन ते २६ अंश सेल्सिअस राहील. रायगड जिल्ह्यात ते २४ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ८१ टक्के राहील.  उत्तर महाराष्ट्र धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. तर नाशिक, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात ते ३० अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील, तर नंदूरबार जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस व धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ९२ ते ९४ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ८० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १५ किलोमीटर राहील.  मराठवाडा लातूर जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील; तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. परभणी जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील तर जालना जिल्ह्यात ते २३ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित जिल्ह्यात ते २१ ते २२ अंश सेल्सिअस आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९२ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ७५ टक्के राहील.  बाष्पीभवनाचा वेग वाढणार आहे. पश्‍चिम विदर्भ वाशीम जिल्ह्यात काही दिवशी पावसाची शक्‍यता आहे. बुलढाणा जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील; तर अकोला वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८३ टक्के राहील.  मध्य विदर्भ पावसाचे प्रमाण कमी होत जाणार आहे. सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७७ टक्के राहील.  पूर्व विदर्भ  गोंदिया जिल्ह्यात अत्यल्प पावसाची शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील तर भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता८५ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८३ टक्के राहील. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र   कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर नगर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील तर पुणे जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. तर पुणे जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत किमान   तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ७२ टक्के राहील.

कृषी सल्ला 

  •    जमिनीत पुरेशी ओल असल्यास करडई, ज्वारीची पेरणी करावी. 
  •    हळद, आले व बटाटा पिकास मातीची भर द्यावी. 
  •    जमिनीची पूर्वमशागत करावी. एक नांगराची पाळी देऊन त्यानंतर कुळवाची पाळी द्यावी. लागवडीपूर्वी शेणखत विस्कटून कुळवाची पाळी द्यावी. 
  • (ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ,सदस्य, संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. सदस्य, कृत्रिम पाऊस प्रयोग सुकाणू समिती)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com