राज्यात १५ जुलै ते १९ जुलै दरम्यान पावसात उघडीपीची शक्यता

१५ जुलै ते १९ जुलै काळात पावसात उघडीपीची शक्यता
१५ जुलै ते १९ जुलै काळात पावसात उघडीपीची शक्यता

राज्यातील हवामानाचा विचार करता उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचे प्रमाण वाढेल. तर दक्षिण महाराष्ट्रात कमी राहील. १५ जुलैनंतर पावसात उघडीप राहील. १३ व १४ जुलै रोजी चांगल्या पावसाची शक्‍यता तर दिनांक १५ जुलै ते १९ जुलै या काळात पावसात उघडीप राहाण्याची शक्यता आहे. काही भागांत तुरळक ठिकाणी अल्पशा पावसाची शक्‍यता आहे.   या आठवड्याच्या सुरवातीच्या काळात कोकणात पावसाचा जोर कायम राहील. याचबरोबरीने नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी ३० मिलिमीटर तर सातारा - पुणे १२ ते १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित जिल्ह्यात ४ ते ६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. विदर्भातील बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यांत १० ते १५ मिलिमीटर व उर्वरित जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे.

कोकण  रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत काही दिवशी ५४ ते ६३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्‍यता आहे. एकूणच हे पावसाचे प्रमाण दिनांक १३ ते १५ जुलै दरम्यान अधिक राहील. तर ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही दिवशी ३५ ते ४० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. एकूणच या आठवड्याचे सुरवातीचे काळात पावसाचे प्रमाण अधिक राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात ते ३१ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान२७ अंश सेल्सिअस राहील तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. 

उत्तर महाराष्ट्र  उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण प्रतिदिनी ३ ते ७ मिलिमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २५ ते २८ किलोमीटर, तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २० किलोमीटर राहील. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. तर नंदूरबार जिल्ह्यात ते २९ अंश सेल्सिअस राहिल. धुळे व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील.आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ८४ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ६८ टक्के राहील.

मराठवाडा   लातूर जिल्ह्यात काही दिवशी १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी या जिल्ह्यांत प्रतिदिनी ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. जालना व हिंगोली जिल्ह्यांत प्रतिदिनी ४ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. लातूर जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस व नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्‍य आहे. बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. लातूर, बीड या जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. तर परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत ते ३३ अंश सेल्सिअस राहील. नांदेड व जालना जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. 

पश्‍चिम विदर्भ  अकोला व वाशीम जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहील. तर बुलढाणा व अमरावती जिल्ह्यांत प्रतिदिनी काही दिवशी १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. बुलढाणा, अकोला वाशीम व अमरावती भागांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतके राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. बुलढाणा व  अकोला जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८९ टक्के तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ८० ते ९० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ७८ टक्के राहील.

मध्य विदर्भ  यवतमाळ जिल्ह्यात काही दिवशी ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून वर्धा व नागपूर जिल्ह्यांत प्रतिदिनी १ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. यवतमाळ, वर्धा व नागपूर परिसरात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस व वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८२ टक्के असेल.

पूर्व विदर्भ  चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवशी १५ मिलिमीटर, भंडारा जिल्ह्यात काही दिवशी १० मिलिमीटर, गोंदिया जिल्ह्यात २ मिलिमीटर व गडचिरोली जिल्ह्यात ६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८० टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ८० टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी ३० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून सातारा व पुणे जिल्ह्यांत काही दिवशी १२ ते १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यांत काही दिवशी ४ ते ६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यांत कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत ते ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील तर सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ९१ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ७८ टक्के राहील.

कृषी सल्ला 

  •   ज्वारी, बाजरी, मका या पिकांना नत्र खताचा दुसरा हफ्ता द्यावा. 
  •   पावसाची उघडीप होताच खुरपणी व कोळपणी करून उभ्या पिकातील तणे काढून घ्यावीत. 
  •   जेथे पाऊस अधिक झाला आहे आणि जमिनीत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक ओलावा आहे तेथे वापसा येताच सोयाबीन व घेवडा लागवड करावी. 
  •   फळबाग लागवडीचे काम पूर्ण करावे. लागवड केलेल्या रोपांना आधार द्यावा.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com