Agriculture news in marathi articles regarding management of worm in hens | Agrowon

वेळेवर करा कोंबड्यातील जंतनिर्मूलन

डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील
शुक्रवार, 12 जून 2020

कोंबड्यामध्ये गोलकृमी, चपटेकृमी व गेपवर्म प्रादुर्भाव आढळतो.मुक्तपणे बाहेर फिरून अन्न मिळवणाऱ्या कोंबड्यांमध्ये शेडमधील कोंबड्यांपेक्षा जास्त प्रमाणात जंत प्रादुर्भाव आढळतो. याची लक्षणे ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात.
 

कोंबड्यामध्ये गोलकृमी, चपटेकृमी व गेपवर्म प्रादुर्भाव आढळतो.मुक्तपणे बाहेर फिरून अन्न मिळवणाऱ्या कोंबड्यांमध्ये शेडमधील कोंबड्यांपेक्षा जास्त प्रमाणात जंत प्रादुर्भाव आढळतो. याची लक्षणे ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात.

कोंबड्यांमध्ये बऱ्याच वेळेस जंत प्रादुर्भाव आढळून येतो. यामध्ये विशेषतः जमिनीवर वाढणाऱ्या व परसबागेतील कोंबड्यांना जंतप्रादुर्भावाची शक्‍यता जास्त असते. मुक्तपणे बाहेर फिरून अन्न मिळवणाऱ्या कोंबड्यांमध्ये शेडमधील कोंबड्यांपेक्षा जास्त प्रमाणात जंत प्रादुर्भाव आढळतो. जंत कोंबड्याच्या आतड्यामध्ये, इतर अवयवांमध्ये आढळतात.

जंत प्रादुर्भावाची लक्षणे

 • जंत पचवलेले अन्न खाऊन किंवा रक्तावर जगतात. जंतप्रादुर्भावामुळे कोंबड्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते, परंतु वाढ खुंटते, निस्तेज दिसतात.
 • कोंबडीच्या पोटाचा खालचा भाग मोठा दिसतो. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते, रक्तक्षय होतो.
 • जंतप्रादुर्भाव प्रमाणापेक्षा जास्त असेल तर विष्ठेमध्येही जंत दिसू लागतात.
 • कोंबड्या अशक्त होतात, हगवण लागते, वजन कमी होते, अंडी उत्पादन कमी होते.

जंत प्रादुर्भाव
कोंबड्यामध्ये गोलकृमी, चपटेकृमी व गेपवर्म प्रादुर्भाव आढळतो.
तलंगा व वाढणाऱ्या कोंबड्यामध्ये मानमोडी (राणीखेत रोग) आजाराचे लसीकरण करण्यापूर्वी म्हणजेच वयाच्या ७ ते ८ आठवड्याला व १६ ते १७ व्या आठवड्याला जंतनिर्मूलन करून घ्यावे. सर्वसाधारणपणे गादीवरील मोठ्या कोंबड्यांमध्ये महिन्यातून एकदा तर पिंजऱ्यातील कोंबड्यांमध्ये ३ महिन्यातून एकदा जंतनिर्मूलन घ्यावे.

 • जंतनिर्मूलनासाठी तज्ज्ञांच्या सल्यानुसारच पायप्रॅझीन, अलबेंन्डॅझोल, लेव्हमिसॉल, टेटरामिसॉल इत्यादी औषधी वापरली जातात.
 • जंतनिर्मूलनादिवशी व नंतर दोन दिवस जीवनसत्त्व व इलेक्‍ट्रोलाईट पाण्यातून कोंबड्यांना द्यावी. जेणेकरून जंतनिर्मूलनाचा ताण होणार नाही.

प्रतिबंधात्मक उपाय 

 • शेडमध्ये स्वच्छता ठेवावी, तेथे पाणी सांडून होणारा ओलावा, कोंदटपणा अजिबात नसावा.
 • कोंबड्यांना भरपूर जागा, हवा व प्रकाश मिळावा.
 • सर्व वयोगटाच्या कोंबड्या एकमेकांत मिसळू नयेत. त्याऐवजी पिले व मोठ्या कोंबड्या वेगवेगळ्या ठेवाव्यात.
 • माशा, गोगलगाई, गांडूळ, कीटक इत्यादींचा नायनाट करावा.
 • कोंबड्यांचे खाद्य व पाणी, विष्ठेने बाधीत होणार नाही याची काळजी घ्यावी.
 • रोगी कोंबड्यांवर तात्काळ उपचार करावा.
 • कोंबड्यांना जीवनसत्वयुक्त टॉनीक आहारातून द्यावे.

जंतनाशनाचे वेळापत्रक 
पहिले जंतनाशन - ४ आठवडे वयात
दुसरे जंतनाशन - ८ आठवडे वयात
तिसरे जंतनाशन - १२ आठवडे वयात

संपर्क- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४
(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)


इतर कृषिपूरक
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन...
सामूहिक प्रयत्नातूनच प्राणिजन्य आजारावर...जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत,...
जनावरांमध्ये दिसतोय स्नोअरिंग आजारमराठवाड्यातील काही भागांमध्ये (विशेषतः औंढा...
कोंबड्यांतील रोगप्रसार टाळाआजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी...
विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गायहरियानातील गालीब खेरी (कर्नाल) येथील पशूपालक...
जनावरांच्या आरोग्याकडे नको दुर्लक्षपावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक...
शाश्‍वत दूध उत्पादनासाठी ‘टीएमआर'गायीला शरीर वजन तसेच दूध उत्पादनासाठी आवश्यक...
जातिवंत वंशवृद्धीसाठी भ्रूण प्रत्यारोपण...साधारणपणे जातिवंत दुधाळू गाय एका वर्षात एकाच...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज मिश्रणाच्या अभावामुळे होणारे...
स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वेदूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी...
संकरित गाईंची दूध उत्पादन वाढीची सूत्रेसद्यःस्थितीतील संकरित गाईंची दुसऱ्या-तिसऱ्या...
रेशीम कीटकांवर होणारा हवामानाचा परिणामरेशीम उत्पादनासाठी आवश्यक खर्चाचे प्रमाण अत्यल्प...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वशेती न करता नैसर्गिक स्थितीमध्ये उगवलेल्या...
दुधाळ जनावरांसाठी सॉर्डेड सीमेन...अलीकडच्या काळात पशुपालनामध्ये सेक्‍स ...
जनावरे, गोठ्याची ठेवा स्वच्छतापावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला असलेला धोका...
रेबीज’ची लक्षणे तपासा, उपाययोजना करामनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला...
जनावरांमध्ये होणारा शिंगाचा कर्करोगशिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील...
गवळाऊ संगोपनाचे पाऊल पडते पुढेविदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी...
जनावरांच्या आहारात मूरघासाचा वापरमूरघासामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करता...