agriculture news in marathi, artificial rain practical on tuesday, mumbai, maharashtra | Agrowon

कृत्रिम पावसाचा मंगळवारी तीन ठिकाणी प्रयोग

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जुलै 2019

मुंबई   ः पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग तसेच मराठवाड्यात पावसाने दिलेली ओढ लक्षात घेऊन या भागात मंगळवारी (ता. २३) कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थांनी दिली. सोलापूर, औरंगाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एकाचवेळी हा प्रयोग होईल, असे सांगण्यात आले.

मुंबई   ः पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग तसेच मराठवाड्यात पावसाने दिलेली ओढ लक्षात घेऊन या भागात मंगळवारी (ता. २३) कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थांनी दिली. सोलापूर, औरंगाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एकाचवेळी हा प्रयोग होईल, असे सांगण्यात आले.

गेल्या वर्षी राज्यात पावसाचा मोठा खंड पडला. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच दुष्काळाची तीव्रता वाढू लागली. राज्यात १९७२ पेक्षाही गंभीर दुष्काळी स्थिती होती. पिण्यासाठी पाणी आणि जनावरांकरिता चाऱ्याची देखील टंचाई आहे. शेती, विशेषतः दुष्काळग्रस्त भागात फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यातच यंदाही दुष्काळग्रस्त विदर्भ, मराठवाड्यात प्रतिकूल पावसाचा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेने व्यक्त केला आहे.

राज्यात पावसाचे आगमन उशिरा झाले आहे. जुलै महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला, तरी राज्यातील काही भागांत अद्याप पाऊस सुरू झालेला नाही. पावसाने पाठ फिरविल्याने मराठवाड्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यातच येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. येत्या हंगामातही दुष्काळी स्थिती कायम राहिली, तर शेतकरी आणि नागरिकांच्या तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. याचे पडसाद आगामी निवडणुकीतही उमटू शकतात.

पावसाचा खंड लक्षात घेऊन सरकारने या भागात कृत्रिम पावसाचा निर्णय याआधीच घेतला होता. त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर २३ जुलै रोजी सोलापूर, औरंगाबाद आणि शेगाव येथे एकाच वेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाईल. राज्यातील पावसाचा अंदाज येताच राज्य शासनाकडून कृत्रिम पाऊस पाडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तिन्ही भागांत कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या कंपन्यांची विमाने आकाशात झेपावून ढगांवर फवारणी करतील. हा पाऊस तलाव क्षेत्रात व्हावा, असा सरकारचा प्रयत्न आहे. तलाव क्षेत्रात पाऊस झाला तर तो फायदेशीर ठरेल, असे सांगण्यात आले.

 


इतर अॅग्रो विशेष
संघर्ष येथील संपणार कधी? शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा...
`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या...पुणे: पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून प्रभावी...
साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’मुंबई ः सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत ‘...
कृषी परिषदेने विद्यापीठांसाठी नेमले...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ,...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
कांद्यावरील निर्यातबंदी हटविली;...नवी दिल्ली : चार महिन्यापूर्वी कांद्यावर...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...