agriculture news in marathi, artificial rain seeding from today in marathawada | Agrowon

मराठवाड्यात आजपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

औरंगाबाद : मराठवाड्यात शुक्रवारपासून (ता.९) कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. त्यासंबंधीची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती महसूल उपायुक्‍त सतीश खडके यांनी गुरूवारी (ता.८) पत्रकार परिषदेत दिली. मराठवाडा वगळता राज्यात सर्वदूर पावसाचे प्रमाण अपेक्षेनुरूप वा त्याही पुढे जाऊन आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात शुक्रवारपासून (ता.९) कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. त्यासंबंधीची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती महसूल उपायुक्‍त सतीश खडके यांनी गुरूवारी (ता.८) पत्रकार परिषदेत दिली. मराठवाडा वगळता राज्यात सर्वदूर पावसाचे प्रमाण अपेक्षेनुरूप वा त्याही पुढे जाऊन आहे.

 मराठवाड्यात मात्र पावसाने ओढ दिल्याने भर पावसाळ्यात शेकडो टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. याआधी मराठवाड्यात झालेला कृत्रिम पावसाचा प्रयोग लक्षात घेता पुन्हा तो प्रयोग नैसर्गिकरित्या पाउस पडत नसल्याने केला जाण्याची मागणी पुढे आली होती. त्यासाठी शासनाने जवळपास 30 कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही केली होती. पण प्रयोग प्रत्यक्षात येत नव्हता. रविवारी (ता. 4) विभागीय आयुक्‍तालयाच्या इमारतीवर रडार फिट केल्यानंतर कृत्रिम पावसाचा प्रयोग होईल अशी आशा निर्माण झाली होती. अखेर या प्रयोगासाठी मुहूर्त मिळाला आहे.

उद्यापासून चाचणीरूपात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरवात केली जाणार आहे. अजून 52 दिवसांचा कालावधी आपल्या हातात आहे. सप्टेबरपर्यंत व त्यानंतर वाढीव पंधरा दिवस अशा कालावधीत मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाईल. या प्रयोगासाठी लागणाऱ्या पंधरा परवानग्या मुख्यत्र्यांच्या पुढाकारातून विक्रमी वेळात केवळ पंधरवड्यात मिळविण्यात आल्या. रडारची स्थापना विभागीय आयुक्‍तालयाच्या इमारतीवर करण्यात आल्यानंतर आयुक्‍तालयाच्या तिसऱ्या माळ्यावर त्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. रडार, एअर क्राफ्ट, फ्लेअर्स आदीचा समन्वय साधून हा प्रयोग केला जाणार आहे. प्रयोगाच्या कालावधीदरम्यान दररोज सकाळी पावसाचे ढग नेमके कोणत्या भागात आहेत, त्या भागातील प्रत्यक्ष पावसाचे प्रमाण किती, तेथे पावसाची गरज आहे का याची तपासणी करूनच ढगांमध्ये पावसासाठीचे बीजारोपण करायचे किंवा नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. 


इतर अॅग्रो विशेष
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...
मुगावर काय फवारायचे?अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
दूध दर आंदोलनाचा राज्यभर एल्गारपुणे: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व...
पीकविमा नोंदणीत महाराष्ट्राची आघाडीपुणे: डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा...