agriculture news in Marathi, artificial recession in cotton seed future market explore, Maharashtra | Agrowon

कापसातील कृत्रिम मंदीचा फुगा फुटला
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

जळगाव ः सरकीच्या वायदे बाजारातील सटोडियांनी निर्माण केलेल्या कृत्रिम मंदीचा फुगा फुटला असून, सरकीचे दर दोन वर्षांमधील उच्चांकी पातळीवर, २६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. मागील ९२ दिवसांत सरकीचे दर क्विंटलमागे तब्बल एक हजार रुपयांनी वधारले आहेत. कापूस निर्यातबंदीसंबंधी दाक्षिणात्य लॉबीने केलेल्या पत्रव्यवहाराला केंद्राने प्रतिसाद दिलेला नाही. याचवेळी, केंद्र सरकार हे जिनर्स, छोटे व्यापारी शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचा मुद्दा कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने मांडला आहे. 
 

जळगाव ः सरकीच्या वायदे बाजारातील सटोडियांनी निर्माण केलेल्या कृत्रिम मंदीचा फुगा फुटला असून, सरकीचे दर दोन वर्षांमधील उच्चांकी पातळीवर, २६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. मागील ९२ दिवसांत सरकीचे दर क्विंटलमागे तब्बल एक हजार रुपयांनी वधारले आहेत. कापूस निर्यातबंदीसंबंधी दाक्षिणात्य लॉबीने केलेल्या पत्रव्यवहाराला केंद्राने प्रतिसाद दिलेला नाही. याचवेळी, केंद्र सरकार हे जिनर्स, छोटे व्यापारी शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचा मुद्दा कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने मांडला आहे. 
 

देशांतर्गत बाजारात कापसाचे दर (रुई) मागील ४० दिवसांपासून ४८ हजार रुपये खंडी (३५६ किलो रुई) असे आहेत. चीनध्ये कापसाचे दर १६५ किलो रुई असे आहेत. तेथील सरकार रोज रुईचे लिलाव करीत आहे. चीनच्या तुलनेत देशांतर्गत बाजारात रुईला सुमारे १५ टक्के दर कमी आहेत. १३२ ते १३५ रुपये प्रतिकिलो, असे दर देशातील सूतगिरण्या, मिलांना रुईसंबंधी सध्या पडत आहेत. देशात मागणी कायम असल्याने निर्यात मागील दीड महिन्यात कमी झाली आहे. जूनअखेरपर्यंत सुमारे ७४ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्यात झाली. नंतर निर्यात फारशी गतीने झालेली नसल्याची माहिती मिळाली. 

निर्यातबंदीबाबत सरकार सकारात्मक नाहीच
मध्यंतरी दाक्षिणात्य सूतगिरण्यांच्या संघटनेने सरकारला कापूस निर्यातबंदीबाबत पत्र दिले होते. परंतु, केंद्राने या पत्रासंबंधी कोणतेही स्पष्टीकरण अजून दिलेले नाही. कापूस ही बाब जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये नाही. त्यामुळे निर्यातबंदीची गरज नाहीच. देशातील मिलांना पुरेशी रुई मिळत आहे. त्यांना चीनपेक्षा कमी दरात देशात रुई उपलब्ध आहे. चीमधील मिलांना तेथे ५७ ते ६० हजार रुपयात खंडी (रुपयाच्या मूल्यानुसार) पडत आहे. भारतात मात्र ४७ हजार रुपयांपासून खंडी मिळते. कुठलीही टंचाई नाही आणि अलीकडे निर्यात कमी झाली आहे. केंद्र सरकार आमच्या बाजूने असल्याचे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य अनिल सोमाणी यांनी ॲग्रोवनशी बोलताना सांगितले.

सटोडियांच्या करामतीमुळेच कृत्रिम मंदी
२० मे, २०१८ रोजी सरकीला १५०० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते. वायदे बाजारात सटोडियांच्या करामतीमुळे सरकी दरांची कृत्रिम मंदी तयार करण्यात आली. एप्रिलमध्ये या बाजारात सरकीचा साठा एक लाख ३० हजार टनपर्यंत दाखविला जात होता. कृत्रिम मंदीचा फुगा फुटला असून, दरवाढ सुरूच आहे. आजघडीला फक्त ३५ हजार टनांचा साठा या बाजारात दिसत आहे. सरकीसह ढेपचे व्यवहार जोमात असून, दरवाढ कायम राहिल. परिणामी, रुई व कापसाचे दरही चांगले राहतील, असे जाणकारांनी सांगितले. 

इतर अॅग्रो विशेष
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...
इथेनॉल उत्पादन घटणारपुणे:  देशाच्या इथेनॉलनिर्मितीत मोठी घट...
अकोला जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीअकोला ः परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठ्या...
पीकविम्यासाठी शासकीय पातळीवर धावपळपुणे: अतिपावसामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना...
देशात मागणीच्या तुलनेत ४० टक्केच कांदा...पुणे: देशभरात ऑगस्ट महिन्यातील खरीप कांद्याच्या...
किमान तापमानात घटपुणे: राज्यात होत असलेले ढगाळ हवामान निवळल्यानंतर...