कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम रेतनाची सुविधा

कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम रेतनाची सुविधा
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम रेतनाची सुविधा

कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची पैदास व्हावी, यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ व बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांत ३४ कृत्रिम रेतन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून ११० गावांत ही सुविधा मिळणार आहे. ज्या भागात पशुसंवर्धन विभाग पोचू शकत नाहीत त्या दुर्गम भागात बाएफचे कर्मचारी जाऊन कृत्रिम रेतन करणार आहेत. यामुळे जिल्ह्यात चांगल्या प्रतीच्या जनावरे निर्मितीला चालना मिळणार आहे.

पशुसंवर्धन विभागात तोकडे मनुष्यबळ आणि दवाखान्यांची संख्या मर्यादित असल्याने जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी कृत्रिम रेतन पद्धती एक तर सहकारी संघांच्या मार्फत राबविली जाते किंवा खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत महागडी सुविधा घ्यावी लागते. दुर्गम भागापर्यंत पशुसवंर्धन विभागाचे कर्मचारी पोचू शकत नाहीत. त्यांना मर्यादा येते. सहकारी संघाचे अधिकारी संघाला दूधपुरवठा करणाऱ्या सभासदांनाच प्राधान्य देतात. यामुळे अनेकदा रेतनासाठी पशुपालकांना फिरावे लागते. या समस्या दूर करण्यासाठी शासन व बाएफ संस्था एकत्र येऊन हा प्रकल्प राबवत आहेत.

आकडेवारी समजणार कृत्रिम रेतन केल्यानंतर वासराचा जन्म होइपर्यंत हे कर्मचारी संबंधित पशुपालकाच्या संपर्कात रहातील. यामुळे बाएफच्या माध्यमातून किती जनावरांची व कोणत्या जातीची पैदास झाली हे समजू शकणार आहे. कृत्रिम रेतन यशस्वी झाल्यानंतर बाएफला शासनाकडून मोबदला दिला जाईल. घरोघरी जावून हे कर्मचारी सेवा देणार असल्याने याचा फायदा दुर्गम भागातील पशुपालकांना होऊ शकेल.

असा आहे प्रकल्प दहा तालुक्‍यांमध्ये बाएफची ३४ सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये एक एरिया ऑफिसरची नियुक्ती केली जाईल. ३४ सेवा केंद्राच्या नियंत्रणाखाली ११० गावांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. शासकीय दरात पशुपालकांना कृत्रिम रेतनाची सोय उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी या गावांमध्ये बाएफचे कर्मचारी पशुपालकांच्या घरी जावून ही सेवा देतील. त्याची नोंद या कर्मचाऱ्यामार्फत ठेवण्यात येईल.

जिल्ह्यातील दुर्गम भागातही बाएफचे कर्मचारी जाऊन पशुपालकांना सेवा देणार आहेत. यामुळे शासनालाही जनावरांची किती पैदास झाली हे समजू शकेल. तसेच चांगल्या दर्जाचे पशुधनही उपलब्ध होऊ शकेल. -संजय शिंदे,  कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

बाएफच्या वतीने सूत्रबद्ध पद्धतीने आम्ही ही सेवा देणार आहोत. यासाठी केंद्रे, गावे व पुरेसे मनुुष्यबळ आम्ही सज्ज ठेवले आहे. घरपोच सेवा मिळणार असल्याने याचा फायदा पशुपालकांना होईल. - डॉ. निशिकांत भनांगळे, प्रकल्प अधिकारी, बाएफ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com