Agriculture news in Marathi Artificial scarcity of urea in Gadchiroli | Agrowon

गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाई

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

शेतकऱ्यांची युरियाची मागणी वाढली असतानाच युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करीत काळाबाजार होत आहे. यावर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रामदास जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

गडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या पावसामुळे धान रोवणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची युरियाची मागणी वाढली असतानाच युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करीत काळाबाजार होत आहे. यावर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रामदास जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

कृषिमंत्री दादा भुसे गेल्या महिन्यात जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना थेट बांधावरच निविष्ठांची उपलब्धता होईल, असे जाहीर केले. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून समाधानकारक पाऊस झाला नाही परिणामी सर्वदूर रोवणीचे काम रखडले. आता पावसाने हजेरी लावल्याने रोवणीच्या कामाला देखील वेग आला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना युरियाची गरज असताना कृत्रिम टंचाईआड युरियाचा काळाबाजार केला जात आहे. त्यामुळे बांधावर नाही तर निदान कृषी सेवा केंद्रात तरी युरियाची उपलब्धता व्हावी, अशी मागणी जराते यांनी केली आहे.

युरियाची बॅग २६६ रुपयाला मिळते. परंतु टंचाईआड शेतकऱ्यांकडून तीनशे ते साडेतीनशे रुपये आकारले जात आहेत. सेवा सहकारी सोसायटी, बचत गट आदींकडून युरियाची मागणी करूनही डीलरकडून पुरवठा होत नाही. त्याचाही परिणाम युरियाच्या उपलब्धतेवर झाला आहे या प्रकाराकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही जराते यांनी केला आहे.  या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून युरिया डीलर तसेच किरकोळ विक्रेते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...