माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचं निधन

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचं निधन
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचं निधन

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली याचं दिर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला . ९ ऑगस्टपासून दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने संपुर्ण देशावर शोककळा पसरली आहे. जेटली यांच्या निधनाची बातमी समजताच अमित शहांनी हैद्राबाद दौरा अर्धवट सोडत ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अरुण जेटली यांच्या प्रकृतीत चढउतार पाहायला मिळत होते. फुफ्फुसांमध्ये पाणी झाल्यामुळे ९ ऑगस्टला सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते.  यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी जेटली यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. 

सहा महिन्यांपूर्वी जेटलींना कर्करोग झाल्याचंही निदान झालं होतं. त्यानंतर अमेरिकेत त्यांच्यांवर उपचार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. लठ्ठपणामुळे जेटलींनी बॅरिएटीक सर्जरीही केली होती. 

अरुण जेटली यांची राजकीय कारकीर्द नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यास ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तयार नव्हते. त्यावेळी जेटलींनी अडवाणींची नाराजी पत्करुन मोदींना पक्षाचा चेहरा म्हणून पुढे आणलं. मोदी बडोदा आणि वाराणसी मतदारसंघातून लढले. जेटलींसाठी त्यांनी अत्यंत सेफ अशी अमृतसरची जागा निवडली. तरीही जेटली पराभूत झाले होते. मात्र त्यानंतरही मोदींनी त्यांना केंद्रात संरक्षण आणि अर्थ खात्याची जबाबदारी सोपवली होती.

अरुण जेटली 1999 मध्येअटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री होते. त्यानंतर केंद्रीय कायदामंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे केंद्रात संरक्षण आणि अर्थ खात्याची जबाबदारी होती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com