Agriculture news in marathi Aruna Project affected people agitate, sindhudurg | Agrowon

अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले प्रकल्पस्थळी ठाण

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा अधिकार प्रशासनाचा आहे. त्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे. कंपनीचे कर्मचारी कंपनीच्या इमारतीत असताना तेथे येऊन प्रकल्पग्रस्तांनी हुज्जत घातली. हा प्रकार योग्य नाही
- किरण आढाव, अभियंता,  महालक्ष्मी इन्फ्राप्रोजेक्ट कंपनी.

सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’ आंदोलन छेडल्यानंतर अरुणा प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने धरणातील पाण्याचा विसर्ग सोडण्याचा प्रयत्न केला. तो प्रकल्पग्रस्तांनी हाणून पाडला. त्यानंतर प्रकल्पस्थळीच ठाण मांडून बसलेल्या प्रकल्पग्रस्त आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी सामजस्यांची भूमिका घेत प्रकरणावर पडदा टाकला. 

अरुणा प्रकल्पग्रस्तांनी गेल्या आठवड्यात कोकणभवन येथे आयुक्त कार्यालयावर देधडक बेधडक आंदोलन छेडले होते. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एस. आर. तिरूमनवार यांची भेट घेतली. त्यानंतर मात्र प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक रूप धारण केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुनर्वसन न करताच प्रकल्पाची घळभरणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने प्रकल्पग्रस्त करीत आहेत. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना २३ नागरी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या. या मागण्या जोपर्यंत पूर्ण केल्या जात नाहीत, तोपर्यंत प्रकल्पाचे उर्वरित काम करू देणार नाही, असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला.

पाटबंधारे विभागाला उर्वरित काम करण्यासाठी धरणातील काही पाण्याचा विसर्ग करायचा आहे. तसा प्रयत्न चार दिवसांपूर्वी करण्यात आला. मात्र, प्रकल्पग्रस्तांनी कालव्यात उतरून आंदोलन छेडले. तेव्हापासून प्रकल्पग्रस्त तिथे ठाण मांडून बसले आहेत. सोमवारी पुन्हा प्रकल्पग्रस्तांनी ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला. कपंनीच्या कार्यालयाचे दरवाजे बंद केले. या प्रकारामुळे प्रकल्पस्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

प्रकल्पाचे काम बंद पाडल्याचा दावा

प्रकल्पग्रस्तांनी अरुणा प्रकल्पाचे सुरू असलेले काम बंद पाडल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. परंतु, पुनर्वसन गावठाण वगळता प्रकल्पाचे कोणतेही काम प्रकल्पस्थळी सुरू नसल्याचा दावा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी केला.


इतर ताज्या घडामोडी
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...
 शेतकरी केंद्रित अर्थसंकल्पाचा दावा फोलकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १...
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...
कोकणासह नवा महाराष्ट्र घडवूया :...रत्नागिरी  ः आकडा सांगण्यापेक्षा कृतीला...
कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी आता...नाशिक  : केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने...
भाजपचे राज्यात २५ ला धरणे आंदोलन :...मुंबई : भारतीय जनता पक्ष येत्या मंगळवारी (ता. २५...
सांगलीत साडेसहा हजार शेतीपंपांच्या वीज...सांगली  ः  जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या...
‘वनामकृवि’त सोयाबीनच्या पैदासकार ...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...