agriculture news in marathi, Arunagrasta's migrant status remained stable | Agrowon

अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

७५ टक्के प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला. ८०० कुटुंबांना भूखंड वाटप करण्यात आले. पुनर्वसन गावठाणात तात्पुरत्या ४०० निवारा शेड बांधण्यात आल्या. त्या ठिकाणी प्राथमिक सुविधा देणेची जबाबदारी आहे. या शिवाय ज्यांना शेड नाही, त्यांना घरभाडे देण्याची व्यवस्थाही करण्यात येईल. पाऊस सुरू झाल्यामुळे धरणात पाणीसाठा होईल. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर करून प्रशासनास सहकार्य करावे.
-  मंगेश जोशी, उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.
 

सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा प्रशासनातील चर्चा पुन्हा एकदा निष्फळ ठरली. पुनर्वसन गावठाणांत नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, तोपर्यंत गाव सोडणार नाही, अशी भूमिका अरुणा प्रकल्पग्रस्तांनी घेतली. उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्यासमोर त्यांनी ही भमिका मांडली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या स्थलांतरांचा तिढा कायम राहिला. 

अरुणा प्रकल्प घळभरणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला. त्यामुळे धरणात पाणीसाठा होणार आहे. परंतु, बुडीत क्षेत्रातील आखवणे, भोम आणि नागपवाडीतील काही प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतराला विरोध दर्शविला आहे. आधी पुनर्वसन, मग धरण या कायद्यानुसार पुनर्वसन गावठणात २३ नागरी सुविधा निर्माण करा. कोणत्याही सुविधा नसताना गावठणात उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये स्थलांतरित होणार नाही, अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली. त्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान, प्रकल्पग्रस्तांची समजूत काढण्यासाठी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, तहसीलदार रामदास झळके, कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्यासह अन्य अधिकारी आखवणेत दाखल झाले. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. या वेळी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. 

प्रशासन स्थंलातरासाठी आग्रह धरीत आहे. परंतु आम्ही नेमके जायचे कुठे, हा प्रश्‍न आहे. पुनर्वसन गावठणात पत्र्याच्या शेड बांधण्यात आल्या आहेत. त्यांना पहिल्याच पावसात गळती लागली आहे. तिथे अजून पाणी, वीज या मूलभूत सुविधा नाहीत. अजूनही काही प्रकल्पग्रस्तांना भूखंड नाही. मोबदला नाही. २३ पैकी एखादा अपवाद वगळला, तर कोणत्याच सुविधा गावठणात निर्माण न करता प्रशासन स्थलांतराचा आग्रह का करीत आहे, असा प्रश्‍न प्रकल्पग्रस्तांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. मात्र तरीही अधिकाऱ्यांनी पाऊस सुरू झाला आहे. धरणात पाणीसाठा होणार असल्यामुळे स्थलांतराशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे स्थलांतर करावे. मागणीप्रमाणे अन्य सुविधाही पुरविण्यात येतील. परंतु स्थलांतर करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

 

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...