‘आर्यन शुगर्स’कडून शेतकऱ्यांचे २२ कोटी येणे बाकी

'Aryan Sugar' has left 22 crores of farmers
'Aryan Sugar' has left 22 crores of farmers

सोलापूर : बार्शी तालुक्‍यातील खामगाव येथील आर्यन शुगर्स कारखान्यात ऊस गाळप केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप २२ कोटी ५२ लाख रुपये आणि वाहतुकीचे दोन कोटी ७५ लाख रुपये अद्याप जमा झालेले नाहीत. ‘आर्यन''ला पाच एकर जमिनीसाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिलेच कसे, याच्या चौकशीच्या मागणीसाठी बार्शी तहसील कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसांपासून जनहित शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे सुरू आहे . 

आर्यन कारखान्याला बेकायदेशीर १३२ कोटी रुपयांचे कर्ज कसे दिले, याची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन डीसीसी बॅंक प्रशासकीय अधिकारी शैलेश कोतमिरे व तहसीलदार प्रदीप शेलार यांना देण्यात आले आहे. आर्यन कारखान्यात आजूबाजूच्या सहा तालुक्‍यांतील शेतकऱ्यांचा ऊस गाळप केला आहे. मात्र, त्यांना अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही. आर्यन कारखान्याची जमीन ९७ एकर आहे. त्यापैकी पाच एकर जमीन शासनाने जप्त केली आहे. उर्वरित जमीन खासगी आहे. 

एक एकर जमिनीची किंमत एक लाख रुपये, तर पाच एकर जमिनीसाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज कसे दिले, याची चौकशी तत्काळ करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. जनहित शेतकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन मागील चार दिवसांपासून सुरू केले. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच असेल, असे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. 

जनहितचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल जाधव, रवींद्र मुठाळ, अंकुश वाघमारे, अजित भोसले, परांड्याचे हेमंत देशमुख, विजय मोरे, सुभाष खटाळ, समाधान आतकरे, मनोज पोतदार, सुखदेव डोरले, दादा पाटील, बब्रुवान गौरे आदी शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com