agriculture news in Marathi, Ashadi ekadashi today in Padharpur, Maharashtra | Agrowon

।। विठु माऊलीये हाचि वर देई ।  संचोरिनी राहीं हृदयामाजी ।।

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जुलै 2019

पंढरपूर : 
विठु माऊलीये हाचि वर देई । 
संचोरिनी राहीं हृदयामाजी ।
तुका म्हणे काही न मागे आणिक । 
तुझे पायी सुख सर्व आहे ।।

अशी कृतार्थतेची भावना मनात साठवत आषाढी यात्रेच्या अनुपम सोहळ्यात सहभागासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल झालेल्या वारकऱ्यांनी आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन घेतले. या सोहळ्यात दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने गुरुवारी (ता. ११) भल्या पहाटेपासूनच चंद्रभागा नदीच्या तीरावर स्नानासाठी वारकऱ्यांची एकच झुंबड उडाली. 

पंढरपूर : 
विठु माऊलीये हाचि वर देई । 
संचोरिनी राहीं हृदयामाजी ।
तुका म्हणे काही न मागे आणिक । 
तुझे पायी सुख सर्व आहे ।।

अशी कृतार्थतेची भावना मनात साठवत आषाढी यात्रेच्या अनुपम सोहळ्यात सहभागासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल झालेल्या वारकऱ्यांनी आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन घेतले. या सोहळ्यात दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने गुरुवारी (ता. ११) भल्या पहाटेपासूनच चंद्रभागा नदीच्या तीरावर स्नानासाठी वारकऱ्यांची एकच झुंबड उडाली. 

दरम्यान, आषाढी वारीची शासकीय महापुजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १२) पहाटे झाली. यावेळी लातूर जिल्ह्यातील सांगवी सुनेवाडी तांडा (ता. अहमदपूर) येथील विठ्ठल मारुती चव्हाण (वय ६१) आणि सौ. प्रयाग विठ्ठल चव्हाण ( वय ५५) यांना मानाचे वारकरी म्हणून यांना मान मिळाला.  क्षणोक्षणी वाढणारी वारकऱ्यांची गर्दी, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघ्या पंढरीत भक्तीचा मळा फुलून गेला आहे.

राज्यासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधूनही वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. शहरातील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळा आणि वारकऱ्यांच्या राहुट्यांमध्ये कीर्तन, प्रवचन आणि भजनाचे सूर आळवले जात आहेत. विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग, ६५ एकर, चंद्रभागा वाळवंट, गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेड, भक्तिमार्ग, कैकाडी महाराज मठ, तनपुरे महाराज मठ, रेल्वे स्टेशन परिसरात वारकऱ्यांची मोठी वर्दळ आहे. शहरातील मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रस्ता आदी प्रमुख मार्गावर प्रासादिक, खेळणी साहित्य, तुळशीमाळा, मृदंग, तबला, वीणा आदी भजनी साहित्याची दुकाने, सौंदर्य प्रसाधने, कपडे, घरगुती साहित्याच्या विक्रीसाठी व्यापारपेठाही सजल्या आहेत.

गेल्या वीस दिवसांपासून सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध संतांचे पालखी सोहळे आज पंढरीत दाखल झाले. तसेच एसटी रेल्वे आणि खासगी वाहनाद्वारे वारकरी दर मिनिटाला पंढरीत दाखल होत आहेत. तर प्रमुख मार्गावर ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने प्रदक्षिणा मार्गासह चंद्रभागा तिराकडे निघालेल्या दिंड्या आणि वारकऱ्यांमुळे चोहोबाजूंनी भक्तीचा प्रवाह पंढरीत एक होत असल्याचे चित्र आहे. 

दशमीच्या स्नानासाठी चंद्रभागा तिरी झुंबड
गुरुवारी दशमीच्या स्नानासाठी वारकऱयांनी भल्या पहाटेपासूनच चंद्रभागा नदीच्या तीरावर एकच गर्दी केली. चंद्रभागेतील स्नान आणि प्रदक्षिणामार्गावरील फेरी वारकरी आवर्जून पूर्ण करत होते. विठ्ठल मंदिरात पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूरच्या पत्राशेड भरून स्वेरी कॉलेजच्याही पुढे सात किलोमीटरपर्यंत पोचली. एका वारकऱ्याला दर्शनासाठी १८ ते २० तास लागत आहेत. तर प्रतिमिनिटाला ३० ते ४० वारकरी दर्शन घेऊन बाहेर पडत आहेत. 

क्षणचित्रे 

  • आंध्र प्रदेश, कर्नाटकातील वारकरीही पंढरीत
  • विविध संतांच्या पालख्यांचेही आगमन
  • दर्शनाची रांग पोचली सात किलोमीटरपर्यंत 
  • प्रतिमिनिटाला ३०-४० वारकऱ्यांना होतेय दर्शन
  • स्नानासाठी भक्तांची झुंबड
  • मंदिर, मठ, धर्मशाळांमध्ये प्रवचन, भारुड भजनाचे सूर

इतर बातम्या
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...