agriculture news in marathi, ashok chavan demands to declare compensation, mumbai,maharashtra | Agrowon

दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर करा ः अशोक चव्हाण
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 मे 2019

मुंबई  : राज्यातील बहुतांश दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्तांना ४ हजार ३०० कोटी रुपयांची मदत दिल्याचा सरकारचा दावा संशयाच्या गर्तेत सापडला आहे. सरकारने आजपर्यंत टॅंकर-चारा छावण्यांवर किती खर्च केला, शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत दिली, याची गावनिहाय यादी जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

मुंबई  : राज्यातील बहुतांश दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्तांना ४ हजार ३०० कोटी रुपयांची मदत दिल्याचा सरकारचा दावा संशयाच्या गर्तेत सापडला आहे. सरकारने आजपर्यंत टॅंकर-चारा छावण्यांवर किती खर्च केला, शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत दिली, याची गावनिहाय यादी जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

गांधी भवन येथे शुक्रवारी (ता. १७) पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांची पोलखोल केली. श्री. चव्हाण म्हणाले, की यंदाच्या दुष्काळाची स्थिती पाहता सरकारने एनडीआरएफच्या निकषांनुसार नव्हे, तर त्याहून अधिक मदतीची घोषणा करण्याची गरज होती. पण, सरकारने मुळातच कमी मदत जाहीर केली आणि ती देखील अजून मिळालेली नाही. दुष्काळी मदतीच्या नावाखाली सरकार केवळ शब्दच्छल करते असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले.

पाणी, रोजगार आणि चारा या दुष्काळी उपाययोजनांमधील तीन महत्त्वाच्या मुद्यांवर सरकार साफ अपयशी ठरले आहे. आज छोट्या टॅंकरचे दर २ हजार आणि मोठ्या टॅंकरचे दर ४ हजार रुपयांच्या घरात गेले आहेत. पाण्याचा एक हंडा ६० रुपयाला विकला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एवढी गंभीर परिस्थिती असताना सरकारला मागणीनुसार टॅंकरने पाणीपुरवठा करता आलेला नाही. रोजगार हमी योजनेतून दुष्काळग्रस्तांना काम मिळवून देण्यात सरकार अपयशी ठरल्याचाही आरोप त्यांनी केला.

आज एका-एका जिल्ह्यात लाखांच्या संख्येत कामे मागितली जात असताना कुठे ५ हजार अन् कुठे १० हजार लोकांना काम दिले जात आहे. पिण्यासाठी पाणी अन् हाताला काम नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असल्याचेही चव्हाण पुढे म्हणाले.

चारा छावण्यांबाबतही सरकारने घोळ घातला आहे. पूर्वी दीड हजार रुपये टनाने मिळणारा चारा आज ५ हजार रुपयांच्या घरात पोचला आहे. अशा परिस्थितीत चारा छावण्या चालतील कशा, हा प्रश्न आहे. प्रत्येक जनावरामागे किमान १२५ ते १३० रुपये अनुदान देण्याची आवश्यकता होती. मात्र, सरकारने केवळ १०० रुपये जाहीर केले आहेत. त्यातही झाल्याने चारा छावण्याचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान सरकारकडे थकलेले आहे. विदर्भात अजूनही चारा छावण्यांचा पत्ता नाही. इतर

जिल्ह्यांमध्येही मागणीनुसार छावण्या दिल्या जात नाहीत. बीड, उस्मानाबाद, सांगली, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेळी-मेंढी पालन होते. पण शेळ्या-मेंढ्यांना छावणीत घेतले जात नाही, या शब्दांत श्री. चव्हाण यांनी सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा समाचार घेतला.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या विभागात फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अजून सरकारने त्याचे पंचनामेही केलेले नाहीत. पंचनामेच होणार नसतील तर त्या बागा काढून तिथे खरिपासाठी पेरणी करायची कशी, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर असल्याचे श्री. चव्हाण यांनी या वेळी सांगितले. 

‘अनुदान, मदत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करा’
सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत पाहू नये. गेल्या खरिपापर्यंतचे पीककर्ज सरसकट माफ करावे, कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ५० हजार अन् फळबागांसाठी १ लाख रुपयांचे अनुदान तातडीने द्यावे, शेतकऱ्यांसाठी यापूर्वी जाहीर झालेली सर्व अनुदाने आणि मदत तातडीने बॅंक खात्यात जमा करावी, मागणीप्रमाणे टॅंकर व चारा छावण्या सुरू कराव्यात, रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत.

मंगळवारी काँग्रेस आमदारांची बैठक
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खासदार मल्लिकार्जून खरगे यांच्या उपस्थितीत येत्या मंगळवारी (ता.२०)  काँग्रेसच्या आमदारांची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड होणार आहे. 

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...