‘कोरोना’च्या लढ्यासाठी अशोक चव्हाण यांच्याकडून ५० लाखांचा निधी

नांदेड ः आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघात ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजना अंतर्गत वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी ५० लाख रुपयांच्या निधीचा धनादेश आणि आमदार अमर राजूरकर यांनी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात समान स्वरुपात वाटप करण्यासाठी ५० लाख रुपये निधीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
Ashok Chavan Funded Rs 50 lakhs for 'Corona' fight’

माहूरगड येथील श्री दत्तात्रय संस्थान शिखरचे अध्यक्ष तथा महंत मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती आणि विश्वस्त मंडळातर्फे ११ लाख रुपये रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द करण्यात आला. 

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-१९ हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक ३९२३९५९१७२० आहे. उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड १९ या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे ः Chief Minister’s Relief Fund-COVID १९, Savings Bank Account number ३९२३९५९१७२०, State Bank of India,Mumbai Main Branch, Fort Mumbai ४०००२३,Branch Code ००३००, IFSC CODE- SBIN००००३०० .

खात्याची माहिती मराठीत ः मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड १९, बँकेचे बचत खाते क्रमांक- ३९२३९५९१७२०, स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई ४०००२३, शाखा कोड ००३००, आयएफएससी कोड SBIN००००३०० या देणग्यांना आयकर अधिनियम १९६१ च्या ८० (G) नुसार आयकर कपातीतून १०० टक्के सूट देण्यात येते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com