agriculture news in marathi, ashok chavan press, pune, maharashtra | Agrowon

निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य ः अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली होती, परंतु यासंदर्भात राहुल गांधी आणि शरद पवार अंतिम निर्णय घेतील, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊन, निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, असे काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

पुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली होती, परंतु यासंदर्भात राहुल गांधी आणि शरद पवार अंतिम निर्णय घेतील, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊन, निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, असे काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सोमवारी (ता.२०) येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण बोलत होते. या वेळी ते म्हणाले, की कोणत्याही निवडणुकीत जिंकणारा उमेदवार असावा, असे प्रत्येक पक्षाचे मत असते, परंतु उमेदवारीच्या निर्णयावर अद्याप निर्णय झालेला नाही. पक्षांतर्गत चर्चा करून योग्य त्यावेळी निर्णय घेतला जाईल. सध्या राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या आघाडीसंदर्भात उच्चस्तरावरून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. स्थानिक पातळीवरील परिस्थिती विचारात घेऊन, तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल, परंतु जिंकणारा उमेदवार देण्यावर भर असेल, असे त्यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रात ३१ पासून जनसंघर्ष यात्रा
केंद्र व राज्य सरकारची खोटी आश्‍वासने आणि जाहिरातबाजीचा पर्दाफाश करण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता.३१) कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन या यात्रेला सुरवात होणार असून ७ किंवा ८ सप्टेंबरला यात्रेचा पुण्यात समारोप केला जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या वेळी दिली.


इतर ताज्या घडामोडी
कापूस उत्पादकांचे शोषण थांबवा: विजय...नागपूर: देशात कापसाचे दर कमी होत असतानाच...
फवारणीनंतर १८ एकरातील कपाशीने टाकल्या...अकोला ः जिल्ह्यातील म्हातोडी येथील शेतकऱ्याने...
खडसेंच्या पक्षांतराने बदलणार राजकीय...जळगाव ः भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे...
मक्याची लॉट एंट्री न झाल्याने ‘शोले...सटाणा, जि. नाशिक: हमीभावाने खरेदी केलेल्या...
परभणी जिल्ह्यात महावितरणची ६३७...परभणी :  जिल्ह्यातील वीजचोरीला आळा...
ला निनामुळे मान्सून प्रभावितलॉकडाऊनची परिस्थिती पाहता, महाराष्ट्रात...
तंत्रज्ञान हरभरा लागवडीचे...जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक...
शेतमालाची निर्यात वाढविण्यासाठी काम...नाशिक : ``सेंद्रिय कृषी उत्पादन कसे वाढेल....
पिकांच्या वाढीसाठी द्या शिफारशीत...प्रत्येक अन्नद्रव्याचे पिकांच्या शरीरात विशिष्ट...
परभणीत ६५३ शेतीशाळांद्वारे बांधावर...परभणी : ‘‘कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
सांगलीतील १५ साखर कारखान्यांची धुराडी...सांगली : कोरोना संकटाची तीव्रता कमी होत असतानाच...
सिंधुदुर्गाला पुन्हा पावसाने झोडपलेसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या बहुतांश भागात बुधवारी (...
पुणे विभागात अडीच लाख हेक्टरवर पिकांना...पुणे ः पिके काढणीच्या अवस्थेत असताना परतीच्या...
मका, ज्वारी, बाजरीची १ नोव्हेंबरपासून...जळगाव ः जिल्ह्यात शासकीय बाजरी, मका व ज्वारीची...
अकोल्यातील चराई क्षेत्रावरील...अकोला ः ग्रामीण भागात प्रत्येक गावातील गुरांना...
अमरावती जिल्ह्यात ६२ टक्के पीककर्ज वाटपअमरावती : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोलापूर जिल्ह्यात सरसकट भरपाई द्या,...सोलापूर ः ‘‘गेल्या आठवड्यात  दक्षिण...
नवरात्रीमुळे फुलांच्या दरात वाढपुणे ः नवरात्रीनिमित्त फुलांना वाढलेली मागणी...
शिरापूर बंधाऱ्यावर स्वयंचलित दारांचे...सोलापूर ः उत्तर सोलापूर तालुक्यातील शिरापूर...
खानदेशात पावसाची हजेरी, पिकांना फटकाजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. २१) दुपारी व...