agriculture news in marathi, ashok chavan says government will try to finish agriculture, co-operation sector,pune, maharashtra | Agrowon

शेती, सहकार संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न ः अशोक चव्हाण
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

इंदापूर, जि. पुणे  ः ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्यांनी चार वर्षे फसवे राजकारण करीत शेती, सहकार, साखर कारखानदारी संपविण्याचा प्रयत्न केला. खोटे बोला, पण रेटून बोला ही त्यांची संस्कृती आहे. ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, जनतेत मात्र दारिद्य्र’ अशी बिकट स्थिती सर्वसामान्यांची झाली आहे. त्यामुळे इंदापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

इंदापूर, जि. पुणे  ः ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्यांनी चार वर्षे फसवे राजकारण करीत शेती, सहकार, साखर कारखानदारी संपविण्याचा प्रयत्न केला. खोटे बोला, पण रेटून बोला ही त्यांची संस्कृती आहे. ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, जनतेत मात्र दारिद्य्र’ अशी बिकट स्थिती सर्वसामान्यांची झाली आहे. त्यामुळे इंदापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने देश व राज्यातील भाजप-शिवसेना सरकारविरोधात काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेस इंदापुरात बुधवारी (ता.५) सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रामहरी रूपनवर व जयकुमार गोरे, दीपक जाधव आदी उपस्थित होते.

या वेळी माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभा उमेदवारीची सर्व वक्‍त्यांनी उत्स्फूर्त घोषणा केली. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी इंदापूरच्या जागेवर काँग्रेस व हर्षवर्धन पाटील यांचा हक्क असून यासंदर्भात पक्षाध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली जाईल, असे सूतोवाच केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरी, सहकारविषयक धोरणांवर कडकडून टीका करण्यात आली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की १२६ राफेल विमानांची ६२३ कोटी रुपयांनी खरेदी करण्याचे काँग्रेस राजवटीत ठरले. मात्र त्यानंतर भाजप सरकारने केवळ ३६ विमानांची खरेदी १६६० कोटींना केली. यामध्ये ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव नाही, युवकांना रोजगार नाही. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या या सरकारला त्यांची जागा दाखवावी.’’

या वेळी राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, रामहरी रूपनवर, जयकुमार गोरे, दीपक जाधव यांची भाषणे झाली. रघुनाथ पन्हाळकर यांनी सूत्रसंचालन केले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव यांनी आभार मानले.

इतर ताज्या घडामोडी
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीवर अमेरिकन...परभणी : जिल्ह्यातील पेडगाव (ता. परभणी) येथील दोन...
सोलापूर जिल्ह्यात रब्बीची उरकली ३१...सोलापूर : खरिपामध्ये पावसाने हुलकावणी दिली. पण,...