Agriculture news in marathi Ashte, action against sand thieves in Mangoli | Agrowon

आष्टे, मनगोळीत वाळू चोरांवर पोलिसांकडून कारवाई

टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील आष्टे येथून सीना नदीपात्रातून अवैद्य वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर ग्रामीणच्या विशेष पोलिस पथकाने कारवाई केली.

सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील आष्टे येथून सीना नदीपात्रातून अवैद्य वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर ग्रामीणच्या विशेष पोलिस पथकाने कारवाई केली. त्यातून २४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आष्टे येथील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मनगोळी येथे भोगावती नदीपात्रातून वाळू वाहतूक करत असताना एका ट्रॅक्टरवर कारवाई करून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करून एकावर गुन्हा दाखल केला. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक विनय बहिर, पोलिस शिपाई शैलेश जाधव, मदने यांना आष्टे शिवारात सीना नदीपात्रातून अवैद्य वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. पहाटे चार वाजता सीना नदीपात्रातून वाळू उपसा करून ट्रॅक्टरद्वारे त्याची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. 

पोलिसांनी सूरज संभुदेव मासाळ, कुंडलिक काशिनाथ सोंडगे, नवनाथ सुरेश नरोटे, जहांगीर नसरुद्दीन शेख व सागर दादाराव नरोटे (सर्व रा. आष्टे) अशा पाच जणांना पकडले. एम.एच. १३, जे. ७९०९, एम.एच. १३, डी. ई. १६३१, एम. एच. १३, ए. जे. ८८०१ व एक नंबर नसलेला अशा चार ट्रॅक्टरला वाळूसह ताब्यात घेतले. एकूण २४ लाख ३२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

मनगोळीत मोहोळ पोलिसांनी ट्रॅक्टर पकडला

मोहोळ पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई सत्यवान जाधव, गणेश पोफळे, शरद ढावरे व गणेश दळवी यांच्या पथकाने मनगोळी गावच्या हद्दीत भोगावती नदीपात्रातून वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडले. मैफल जालीक शेख (रा. वैराग) याला ताब्यात घेत पाच लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...