सारोळेत आष्टी योजनेचे ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

सारोळेत आष्टी योजनेचे ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन
सारोळेत आष्टी योजनेचे ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

सोलापूर  : ‘‘आष्टी उपसा सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळेल. त्यातून शेती उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल,’’ असे मत जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले. मोहोळ तालुक्‍यातील सारोळे येथे आष्टी उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

जलसंधारण मंत्री प्रा. तानाजी सावंत, जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे, माजी आमदार लक्ष्मण ढोबळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे, आमदार नारायण पाटील, माजी आमदार शहाजी पाटील, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विलास राजपूर, कार्यकारी संचालक खलील अन्सारी, भीमा कालवा मंडळाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले, ‘‘आष्टी उपसा सिंचन योजनेमुळे मोहोळ तालुक्‍यातील पोखरापूर, खवणी व सारोळे गावांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. या गावातील ५८५ हेक्‍टर क्षेत्र ओलीताखाली येईल. ही योजना बंदिस्त नलिकेव्दारे राबविण्यात येईल. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीसाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा.’’

ठाकरे यांनीही शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी कायम आग्रही असल्याचे सांगितले. शिंदे यांनी आष्टी उपसा सिंचन टप्पा क्र.२  या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. या वेळी या योजनेचे माहितीपटाद्वारे सादरीकर करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com